धक्कादायक, १४० वर्षांची कोणती परंपरा यंदा खंडीत होणार ? वाचा नागपूर : समाजातील कुप्रथा, भ्रष्टाचार, अत्याचारावर प्रहार करण्यासाठी निमित्त असलेल्या देशातील एकमेव मारबत उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पिवळी मारबतीनिमित्त निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे केवळ दहनाची परवानगी मागण्यात आली असली तरी नागरिकांच्या संभाव्य गर्दीमुळे ती मिळण्याची शक्यता कमी असल्याने यंदा मारबतही विलगीकरणातच राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी व पिवळी मारबतीसह शहरात बडग्याचीही दरवर्षी मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीचे यंदा १४० वे वर्ष असून पिवळ्या मारबतीचे १३६ वे वर्ष आहे. मात्र चौदा दशकात कधीही खंड न पडलेल्या मारबतीच्या मिरवणुकीत यंदा कोरोनामुळे खंड पडणार आहे. एकूणच शहराच्या संस्कृतीचे प्रतिक ठरलेला मारबत उत्सवाचा नागपूरकरांना आनंद लुटता येणार नाही. शहरात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. शहराच्या हद्दीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शहराबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना ते वारंवार एकत्र येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन करीत आहे. त्यामुळे या उत्सवाला ते परवानगी देणार नाही. परंतु पिवळी मारबत काढणाऱ्या तऱ्हाणे तेली समाजातर्फे पोलिस उपायुक्तांना मारबतीचे दहन करण्याची परवानगी मागितली आहे. विश्वास बसेल का? तडफदार निर्णय घेणारे तुकाराम मुंढेच संभ्रमात.. नक्की काय आहे कारण..वाचा सविस्तर शहराबाबत निर्णयासाठी मनपा आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आयुक्त मुंढे यासंबंधी दहनाची परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे १८८१ पासून सुरू झालेला काळी मारबत उत्सव तसेच १८८५ पासून सुरू झालेला पिवळी मारबत उत्सवात यंदा खंड पडणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी होणारी गर्दी, कर्णकर्कश संगीत, विविध नृत्यावर ठेका धरणारी तरुणाई, या सोहळ्याला नागपूरकरांना मुकावे लागणार आहे. ‘कोरोनाला घेऊन जा...' घोषणेला मुकणार दरवर्षी ‘घेऊन जा गे मारबत`च्या घोषणांनी दुमदुमणारे नागपूर आणि या घोषणा देणारे व ऐकणाऱ्यांना पुढील वर्षीच दिलासा मिळणार आहे. समाजातील कुप्रथांसह सद्यस्थितीतील रोगराई, दृष्ट प्रवृत्तीला घेऊन जागे मारबत अशा घोषणा दिल्या जातात. यंदा कोरोनाला घेऊन जा गे मारबत, अशा घोषणांची शक्यता होती. परंतु मिरवणूक निघणार नसल्याने तसेच दहनासाठीही मारबत रस्त्यावर येणार की नाही, याबाबत शंका असल्याने या घोषणेला नागपूरकर मुकणार आहे.   यंदा मिरवणुकीचा बेत नाही. जानेवारीपासून पिवळी मारबत तयार करण्यात आली. त्यामुळे तिचे दहन व्हावे, एवढी इच्छा आहे. याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पोलिसांनी परवानगी न दिल्यास त्यांनी मारबतीचे सुरक्षेत दहन करावे. पिवळी मारबत चौक ते दहनस्थळ असलेल्या नाईक तलावापर्यंतचा मार्ग दहा मिनिटांचा आहे. त्यामुळे पोलिस परवानगी देतील, अशी अपेक्षा आहे. प्रकाश गौरकर, अध्यक्ष, तऱ्हाणे तेली समाज व आयोजक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 7, 2020

धक्कादायक, १४० वर्षांची कोणती परंपरा यंदा खंडीत होणार ? वाचा नागपूर : समाजातील कुप्रथा, भ्रष्टाचार, अत्याचारावर प्रहार करण्यासाठी निमित्त असलेल्या देशातील एकमेव मारबत उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पिवळी मारबतीनिमित्त निघणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. साथरोग प्रतिबंधक कायद्यामुळे केवळ दहनाची परवानगी मागण्यात आली असली तरी नागरिकांच्या संभाव्य गर्दीमुळे ती मिळण्याची शक्यता कमी असल्याने यंदा मारबतही विलगीकरणातच राहणार असल्याचे चिन्हे दिसत आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी व पिवळी मारबतीसह शहरात बडग्याचीही दरवर्षी मिरवणूक काढण्यात येते. काळ्या मारबतीचे यंदा १४० वे वर्ष असून पिवळ्या मारबतीचे १३६ वे वर्ष आहे. मात्र चौदा दशकात कधीही खंड न पडलेल्या मारबतीच्या मिरवणुकीत यंदा कोरोनामुळे खंड पडणार आहे. एकूणच शहराच्या संस्कृतीचे प्रतिक ठरलेला मारबत उत्सवाचा नागपूरकरांना आनंद लुटता येणार नाही. शहरात साथरोग प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. शहराच्या हद्दीत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर शहराबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांना ते वारंवार एकत्र येऊ नये, गर्दी टाळावी, असे आवाहन करीत आहे. त्यामुळे या उत्सवाला ते परवानगी देणार नाही. परंतु पिवळी मारबत काढणाऱ्या तऱ्हाणे तेली समाजातर्फे पोलिस उपायुक्तांना मारबतीचे दहन करण्याची परवानगी मागितली आहे. विश्वास बसेल का? तडफदार निर्णय घेणारे तुकाराम मुंढेच संभ्रमात.. नक्की काय आहे कारण..वाचा सविस्तर शहराबाबत निर्णयासाठी मनपा आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आयुक्त मुंढे यासंबंधी दहनाची परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे १८८१ पासून सुरू झालेला काळी मारबत उत्सव तसेच १८८५ पासून सुरू झालेला पिवळी मारबत उत्सवात यंदा खंड पडणार आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी होणारी गर्दी, कर्णकर्कश संगीत, विविध नृत्यावर ठेका धरणारी तरुणाई, या सोहळ्याला नागपूरकरांना मुकावे लागणार आहे. ‘कोरोनाला घेऊन जा...' घोषणेला मुकणार दरवर्षी ‘घेऊन जा गे मारबत`च्या घोषणांनी दुमदुमणारे नागपूर आणि या घोषणा देणारे व ऐकणाऱ्यांना पुढील वर्षीच दिलासा मिळणार आहे. समाजातील कुप्रथांसह सद्यस्थितीतील रोगराई, दृष्ट प्रवृत्तीला घेऊन जागे मारबत अशा घोषणा दिल्या जातात. यंदा कोरोनाला घेऊन जा गे मारबत, अशा घोषणांची शक्यता होती. परंतु मिरवणूक निघणार नसल्याने तसेच दहनासाठीही मारबत रस्त्यावर येणार की नाही, याबाबत शंका असल्याने या घोषणेला नागपूरकर मुकणार आहे.   यंदा मिरवणुकीचा बेत नाही. जानेवारीपासून पिवळी मारबत तयार करण्यात आली. त्यामुळे तिचे दहन व्हावे, एवढी इच्छा आहे. याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. पोलिसांनी परवानगी न दिल्यास त्यांनी मारबतीचे सुरक्षेत दहन करावे. पिवळी मारबत चौक ते दहनस्थळ असलेल्या नाईक तलावापर्यंतचा मार्ग दहा मिनिटांचा आहे. त्यामुळे पोलिस परवानगी देतील, अशी अपेक्षा आहे. प्रकाश गौरकर, अध्यक्ष, तऱ्हाणे तेली समाज व आयोजक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3a7bAD6

No comments:

Post a Comment