आयुक्त मुंढेंनी तयार केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये नव्हे तर येथे तयार होणार कोव्हीड रुग्णालय, सविस्तर वाचा नागपूर : कोरोनाग्रस्तांना तातडीने बेड उपलब्ध होऊन वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मानकापूर येथील स्पोर्ट्‍स कॉम्प्लेक्सची कोव्हीड जम्बो रुग्णालयासाठी निवड केली. ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियमवर व आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यासमधील कोव्हीड सेंटरबाबत विचार करण्यात आला. परंतु डॉ. राऊत यांनी मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे सांगितले. कोरोनाग्रस्तांसाठी मुंबई तसेच पुणे येथे तयार करण्यात आलेल्या ‘जम्बो हॉस्पिटल’च्या धर्तीवर शहरात एक हजार रुग्णांसाठी हॉस्पिटलची स्थापना करण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. वाढत्या कोरोनाग्रस्तांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करून शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे.’ जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोरोनाग्रस्तांशिवाय इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. याशिवाय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास येथे तयार केलेल्या कोव्हीड केअर सेंटरबाबतही विचारणा केली. परंतु आयुक्तांच्या संकल्पनेला मागे टाकत पालकमंत्री डॉ. राऊत यांनी मानकापुरातील स्पोर्टस कॉम्प्लेक्सला प्राधान्य दिले. आयुक्तांनी तयार केलेल्या कळमेश्वर मार्गावरील कोव्हीड केअर सेंटरचा तूर्तास पावसामुळे बोजवारा उडाला आहे. मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले.. या कोव्हीड सेंटरचे रुपांतर रुग्णालयात करण्यात येणार होते. बैठकीत एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 16, 2020

आयुक्त मुंढेंनी तयार केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये नव्हे तर येथे तयार होणार कोव्हीड रुग्णालय, सविस्तर वाचा नागपूर : कोरोनाग्रस्तांना तातडीने बेड उपलब्ध होऊन वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मानकापूर येथील स्पोर्ट्‍स कॉम्प्लेक्सची कोव्हीड जम्बो रुग्णालयासाठी निवड केली. ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियमवर व आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन तयार केलेल्या कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यासमधील कोव्हीड सेंटरबाबत विचार करण्यात आला. परंतु डॉ. राऊत यांनी मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे सांगितले. कोरोनाग्रस्तांसाठी मुंबई तसेच पुणे येथे तयार करण्यात आलेल्या ‘जम्बो हॉस्पिटल’च्या धर्तीवर शहरात एक हजार रुग्णांसाठी हॉस्पिटलची स्थापना करण्यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. वाढत्या कोरोनाग्रस्तांसाठी अतिरिक्त तसेच तातडीची आरोग्य सुविधा निर्माण करून शासकीय रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची निर्मिती करण्यात येत आहे.’ जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोरोनाग्रस्तांशिवाय इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. याशिवाय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास येथे तयार केलेल्या कोव्हीड केअर सेंटरबाबतही विचारणा केली. परंतु आयुक्तांच्या संकल्पनेला मागे टाकत पालकमंत्री डॉ. राऊत यांनी मानकापुरातील स्पोर्टस कॉम्प्लेक्सला प्राधान्य दिले. आयुक्तांनी तयार केलेल्या कळमेश्वर मार्गावरील कोव्हीड केअर सेंटरचा तूर्तास पावसामुळे बोजवारा उडाला आहे. मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले.. या कोव्हीड सेंटरचे रुपांतर रुग्णालयात करण्यात येणार होते. बैठकीत एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3h4uDkj

No comments:

Post a Comment