रक्ताचे नाते दुरावले; पण इरफानभाई-साबीरभाई मदतीला धावले !  ‘‘शहरातील एखाद्या कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास बरेचदा त्यांचे रक्ताचे नातेवाईकदेखील मृतदेह ताब्यात घेण्यास आणि त्यावर अंत्यविधी अथवा दफन करण्यास नकार देतात. काही नातेवाईक तर मृतदेहाच्या जवळही फिरकत नाहीत; परंतु कोरोनाची कसलीही भीती न बाळगता येथील एका सेवाभावी संस्थेचे मसीहा शेख इरफानभाई आणि मोहंमद साबीरभाई हे मात्र तब्बल ४० सहकाऱ्यांसोबत २४ तास कसलाही मोबदला न घेता कोरोनाग्रस्त रुग्णांचे दफनविधी करण्याचे पवित्र कार्य पार पाडत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इरफानभाई आणि साबीरभाई हे कोरोनाबाधित मृतांवर दफनविधी करून एकप्रकारे देशसेवाच करीत आहेत. आपल्या जवळपासच्या एखाद्या जिवंत व्यक्तीला कोरोना झाल्याचे कळले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, ‘भाईं’ची टीम कोरोनाची कसलीही भीती न बाळगता हे महान कार्य चार महिन्यांपासून करीत आहे.’’  पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   घाटीसह मिनी घाटी, कमलनयन बजाज रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी मृतदेह घेऊन जाण्यासाठी इरफानभाई आणि साबीरभाई यांना फोन करून पाचारण करण्यात येते. लगेच त्यांची टीम मृतदेह घेऊन जाते व दफनविधीचे सोपस्कार अगदी नातेवाइकांप्रमाणेच कसलीही उणीव बाकी न ठेवता पार पाडतात.  राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   तब्बल ४० जणांची टीम दफनविधीसाठी सदैव तत्पर    रुग्णांच्या नातेवाइकांची तसेच रुग्णालयाची गैरसोय होऊ नये यासाठी इरफानभाई आणि साबीरभाई यांनी प्रत्येकी आठ सहकाऱ्यांची एक अशा एकूण पाच स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. कोणत्याही वेळेत कोणत्याही रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी फोन आला तरी ही टीम लगेच तिथे धाव घेते व मृतदेह कब्रस्तानात घेऊन जाते.  वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश बाहेरगावच्या मृतदेहांचे बायजीपुरा, चिताखाना कब्रस्तानात होते दफन  शहरातील एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर शहरातील त्यांच्या नातेवाइकांच्या प्रथेनुसार किंवा नातेवाइकांच्या सोयीच्या ठिकाणी असलेल्या कब्रस्तानामध्ये दफनविधी केला जातो. बाहेरगावच्या मृताचा दफनविधी बायजीपुरा येथील व महापालिका परिसरातील चिताखाना कब्रस्तानामध्ये पार पाडला जातो. थोडेथोडके नव्हे, तर ४ ऑगस्टपर्यंत इरफानभाई आणि साबीरभाई यांच्या टीमने १४४ कोरोनाबधित मृतांवर दफनविधी केले आहेत. यासाठी संस्थेच्या टीमला महापालिकेतर्फे पीपीई किट, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी साहित्य मोफत मिळते. तर घाटी रुग्णालयातून १०८ नंबरवरून रुग्णवाहिका मागविली जाते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 6, 2020

रक्ताचे नाते दुरावले; पण इरफानभाई-साबीरभाई मदतीला धावले !  ‘‘शहरातील एखाद्या कोरोनाबधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास बरेचदा त्यांचे रक्ताचे नातेवाईकदेखील मृतदेह ताब्यात घेण्यास आणि त्यावर अंत्यविधी अथवा दफन करण्यास नकार देतात. काही नातेवाईक तर मृतदेहाच्या जवळही फिरकत नाहीत; परंतु कोरोनाची कसलीही भीती न बाळगता येथील एका सेवाभावी संस्थेचे मसीहा शेख इरफानभाई आणि मोहंमद साबीरभाई हे मात्र तब्बल ४० सहकाऱ्यांसोबत २४ तास कसलाही मोबदला न घेता कोरोनाग्रस्त रुग्णांचे दफनविधी करण्याचे पवित्र कार्य पार पाडत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून इरफानभाई आणि साबीरभाई हे कोरोनाबाधित मृतांवर दफनविधी करून एकप्रकारे देशसेवाच करीत आहेत. आपल्या जवळपासच्या एखाद्या जिवंत व्यक्तीला कोरोना झाल्याचे कळले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र, ‘भाईं’ची टीम कोरोनाची कसलीही भीती न बाळगता हे महान कार्य चार महिन्यांपासून करीत आहे.’’  पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं   घाटीसह मिनी घाटी, कमलनयन बजाज रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास दफनविधीसाठी मृतदेह घेऊन जाण्यासाठी इरफानभाई आणि साबीरभाई यांना फोन करून पाचारण करण्यात येते. लगेच त्यांची टीम मृतदेह घेऊन जाते व दफनविधीचे सोपस्कार अगदी नातेवाइकांप्रमाणेच कसलीही उणीव बाकी न ठेवता पार पाडतात.  राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   तब्बल ४० जणांची टीम दफनविधीसाठी सदैव तत्पर    रुग्णांच्या नातेवाइकांची तसेच रुग्णालयाची गैरसोय होऊ नये यासाठी इरफानभाई आणि साबीरभाई यांनी प्रत्येकी आठ सहकाऱ्यांची एक अशा एकूण पाच स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. कोणत्याही वेळेत कोणत्याही रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी फोन आला तरी ही टीम लगेच तिथे धाव घेते व मृतदेह कब्रस्तानात घेऊन जाते.  वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश बाहेरगावच्या मृतदेहांचे बायजीपुरा, चिताखाना कब्रस्तानात होते दफन  शहरातील एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला तर शहरातील त्यांच्या नातेवाइकांच्या प्रथेनुसार किंवा नातेवाइकांच्या सोयीच्या ठिकाणी असलेल्या कब्रस्तानामध्ये दफनविधी केला जातो. बाहेरगावच्या मृताचा दफनविधी बायजीपुरा येथील व महापालिका परिसरातील चिताखाना कब्रस्तानामध्ये पार पाडला जातो. थोडेथोडके नव्हे, तर ४ ऑगस्टपर्यंत इरफानभाई आणि साबीरभाई यांच्या टीमने १४४ कोरोनाबधित मृतांवर दफनविधी केले आहेत. यासाठी संस्थेच्या टीमला महापालिकेतर्फे पीपीई किट, हॅन्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी साहित्य मोफत मिळते. तर घाटी रुग्णालयातून १०८ नंबरवरून रुग्णवाहिका मागविली जाते.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XADfaE

No comments:

Post a Comment