आला रे आला बाप्पा आला! घराघरात गणरायाचे होणार आगमन.. कोरोनाच्या सावटातही उत्साह कायम  नागपूर : अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आज घराघरांत आगमन होणार आहे. कोरोनाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असून अनेकांनी काही दिवसांपासून बाप्पाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी विविध बाजारांत गर्दी केली. आज  मंगलध्वनी, आरती आदी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना होणार असून पुढील दहा दिवस उत्तरोत्तर उत्सव रंगत जाणार आहे. लाडक्या गणरायाचे आज शहरातील तब्बल दोन लाख घरांमध्ये आगमन होणार असून दिवसभर बाप्पासाठी घराघरांत लगबग असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे बाजारात मर्यादित गर्दी असली तरी त्यात मोठा उत्साह दिसून आला. अनेकांनी गणेश मूर्ती प्रदर्शनी तसेच दुकानांमध्ये गणरायाची आवडती मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली. ज्येष्ठ नागरिकांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वांनीच गणरायाच्या आगमनासाठी घरात सजावट केली.आहे.  अवश्य वाचा - राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण! नातेवाईकांनी दिली ही महत्त्वाची माहिती.. गुंता अधिकच वाढला.. चार पथकांची नियुक्ती गणरायासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, मखर, विद्युतमाळा आदी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचे संकट असूनही बाजारांमध्ये गर्दी दिसून आली. अनेक जण कालच गणरायाला घरी घेऊन गेले. मात्र दरवर्षी प्रमाणे वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे अनेकांनी टाळले. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती घरी आणली.  पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळशी, पत्री आदी साहित्य अनेकांनी खरेदी केले. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही भाविकांनी खरेदी केली. सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना असल्यामुळे कालपासूनच घरोघरी प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशमूर्ती चितारओळीतून नेल्या जात होत्या. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज बाप्पाचे आगमन होणार असले तरी घरातील मंडळींनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेश मंडळाच्या उत्साहाला लगाम दरवर्षी १५०० सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु कोरोनामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपासाठी पोलिसांकडे केवळ ११० गणेश मंडळाकडूनही परवानगीसाठी अर्ज आले आहे. त्यामुळे कोरोनाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या उत्साहाला लगाम घातल्याचे दिसून येत आहे. यावेळी पुरीच्या गणेशोत्सव मंडळाला सतरंजीपुरा झोनने परवानगी नाकारली. सविस्तर वाचा - मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ... दोनपेक्षा अधिक व्यक्ती नको गणेशाचे आगमन होताना दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी बाहेर जाऊ नये, स्वतःच स्वतःचे विघ्नहर्ता बना, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन घरीच करावे. ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही मनपा राबवीत असल्याचे आयुक्त म्हणाले. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 21, 2020

आला रे आला बाप्पा आला! घराघरात गणरायाचे होणार आगमन.. कोरोनाच्या सावटातही उत्साह कायम  नागपूर : अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पाचे आज घराघरांत आगमन होणार आहे. कोरोनाच्या संकटातही नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत असून अनेकांनी काही दिवसांपासून बाप्पाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी विविध बाजारांत गर्दी केली. आज  मंगलध्वनी, आरती आदी भक्तिमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना होणार असून पुढील दहा दिवस उत्तरोत्तर उत्सव रंगत जाणार आहे. लाडक्या गणरायाचे आज शहरातील तब्बल दोन लाख घरांमध्ये आगमन होणार असून दिवसभर बाप्पासाठी घराघरांत लगबग असणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे बाजारात मर्यादित गर्दी असली तरी त्यात मोठा उत्साह दिसून आला. अनेकांनी गणेश मूर्ती प्रदर्शनी तसेच दुकानांमध्ये गणरायाची आवडती मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली. ज्येष्ठ नागरिकांपासून तर चिमुकल्यांपर्यंत सर्वांनीच गणरायाच्या आगमनासाठी घरात सजावट केली.आहे.  अवश्य वाचा - राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण! नातेवाईकांनी दिली ही महत्त्वाची माहिती.. गुंता अधिकच वाढला.. चार पथकांची नियुक्ती गणरायासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, मखर, विद्युतमाळा आदी खरेदीसाठी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे कोरोनाचे संकट असूनही बाजारांमध्ये गर्दी दिसून आली. अनेक जण कालच गणरायाला घरी घेऊन गेले. मात्र दरवर्षी प्रमाणे वाजत-गाजत गणरायाला घरी नेण्याचे अनेकांनी टाळले. साध्या पद्धतीने गणरायाची मूर्ती घरी आणली.  पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळशी, पत्री आदी साहित्य अनेकांनी खरेदी केले. प्रसादासाठी पेढे, मोदक यांचीही भाविकांनी खरेदी केली. सकाळी गणपतीची प्रतिष्ठापना असल्यामुळे कालपासूनच घरोघरी प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेशमूर्ती चितारओळीतून नेल्या जात होत्या. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर आज बाप्पाचे आगमन होणार असले तरी घरातील मंडळींनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेश मंडळाच्या उत्साहाला लगाम दरवर्षी १५०० सार्वजनिक गणेश मंडळाद्वारे गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु कोरोनामुळे यंदा सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपासाठी पोलिसांकडे केवळ ११० गणेश मंडळाकडूनही परवानगीसाठी अर्ज आले आहे. त्यामुळे कोरोनाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या उत्साहाला लगाम घातल्याचे दिसून येत आहे. यावेळी पुरीच्या गणेशोत्सव मंडळाला सतरंजीपुरा झोनने परवानगी नाकारली. सविस्तर वाचा - मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ... दोनपेक्षा अधिक व्यक्ती नको गणेशाचे आगमन होताना दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींनी बाहेर जाऊ नये, स्वतःच स्वतःचे विघ्नहर्ता बना, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवसांच्या गणपती मूर्तीचे विसर्जन घरीच करावे. ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही मनपा राबवीत असल्याचे आयुक्त म्हणाले. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Yoog46

No comments:

Post a Comment