रंगसंवाद : नकारात्मकतेत सकारात्मकता कलावंत हे समाजमनाचे अभ्यासक असतात. जे काही घडत असते, त्यावर ते नजर ठेवून आपले विचार कलाकृतीतून मांडतात. ठाण्यातील युवा चित्रकार जुईली महाजन यांनीही लॉकडाउनच्या परिस्थितीवर त्यांच्या कलाकृतीद्वारे थेट भाष्य करून समाजमनात सकारात्मकता जागवली आहे. कोरोनाचा भारतात संसर्ग सुरू झाला तेव्हापासून जुईली महाजन बदलत्या समाजजीवनावर लक्ष ठेवून होत्या. मुंबईसारख्या महानगरात शाळा कॉलेज, कार्यालय, वाहतूक, दुकाने सर्व काही बंद होणे अस्वस्थ करणारे होते. अशा अवस्थेतही जुईली यांनी सकारात्मकता दर्शवणारे चित्र रेखाटले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  रोज नकारात्मक बातम्या ऐकून मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होण्यापेक्षा त्यांनी ‘उद्याचा दिवस लख्ख सूर्यप्रकाशाप्रमाणे उजळून निघणार आहे,’ असा आशावाद जागवणारे ‘यलोस्काय’ हे पेंटिंग साकारले. कॅनव्हासवर साकारलेल्या या पेंटिंगमध्ये पिवळ्या रंगाच्या खूप साऱ्या छटा दाखवून पिवळे धमक आकाशाचे नव्याने उभे राहिलेले शहर त्यांनी ॲबस्ट्रॅक्‍ट शैलीतून दाखवले आहे. उद्याचा उष:काल दाखवणारे हे चित्र नकारात्मकता विसरून सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लॉकडाउनच्या आधी प्लास्टिकबंदीची चळवळ जोरात होती. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी, कागदी पिशव्यांना महत्त्व आले. सर्व ठिकाणी दुकानात कागदी बॅग आणि कापडी बॅगचा वापर दिसू लागला; कोरोनाच्या काळात कापडी बॅग शिवणारे हात कापडी मास्क बनवू लागले. त्यावर जुईली यांनी जलरंगात ‘मास्क मेड माय डे’ ही कलाकृती साकारली. आकृतिबंधातील ही कलाकृती अनेकांनी मास्क बनवून निवडलेल्या उपजीविकेच्या साधनावर भाष्य करणारे आहे. ठाणे स्कूल ऑफ आर्ट आणि करंदीकर कला अकादमीतून एटीडी आणि जीडी आर्टचे शिक्षण घेतलेल्या जुईली एक कलावंत म्हणून निसर्गावर प्रेम करणाऱ्या कलावंत आहेत. त्यामुळे लॉकडाउनचा काळात काही प्रमाणात का होईना प्रदूषणमुक्त झालेली वसुंधरा, मुक्तपणे संचार करणाऱ्या पक्ष्यांचे जगणे आनंददायी वाटले. अशा आनंदाचे क्षण त्या रंग आणि विविध पोताच्या माध्यमातून ॲबस्ट्रॅक फॉर्ममधून चित्रात व्यक्त करत असतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 20, 2020

रंगसंवाद : नकारात्मकतेत सकारात्मकता कलावंत हे समाजमनाचे अभ्यासक असतात. जे काही घडत असते, त्यावर ते नजर ठेवून आपले विचार कलाकृतीतून मांडतात. ठाण्यातील युवा चित्रकार जुईली महाजन यांनीही लॉकडाउनच्या परिस्थितीवर त्यांच्या कलाकृतीद्वारे थेट भाष्य करून समाजमनात सकारात्मकता जागवली आहे. कोरोनाचा भारतात संसर्ग सुरू झाला तेव्हापासून जुईली महाजन बदलत्या समाजजीवनावर लक्ष ठेवून होत्या. मुंबईसारख्या महानगरात शाळा कॉलेज, कार्यालय, वाहतूक, दुकाने सर्व काही बंद होणे अस्वस्थ करणारे होते. अशा अवस्थेतही जुईली यांनी सकारात्मकता दर्शवणारे चित्र रेखाटले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  रोज नकारात्मक बातम्या ऐकून मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होण्यापेक्षा त्यांनी ‘उद्याचा दिवस लख्ख सूर्यप्रकाशाप्रमाणे उजळून निघणार आहे,’ असा आशावाद जागवणारे ‘यलोस्काय’ हे पेंटिंग साकारले. कॅनव्हासवर साकारलेल्या या पेंटिंगमध्ये पिवळ्या रंगाच्या खूप साऱ्या छटा दाखवून पिवळे धमक आकाशाचे नव्याने उभे राहिलेले शहर त्यांनी ॲबस्ट्रॅक्‍ट शैलीतून दाखवले आहे. उद्याचा उष:काल दाखवणारे हे चित्र नकारात्मकता विसरून सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारे आहे. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा लॉकडाउनच्या आधी प्लास्टिकबंदीची चळवळ जोरात होती. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी, कागदी पिशव्यांना महत्त्व आले. सर्व ठिकाणी दुकानात कागदी बॅग आणि कापडी बॅगचा वापर दिसू लागला; कोरोनाच्या काळात कापडी बॅग शिवणारे हात कापडी मास्क बनवू लागले. त्यावर जुईली यांनी जलरंगात ‘मास्क मेड माय डे’ ही कलाकृती साकारली. आकृतिबंधातील ही कलाकृती अनेकांनी मास्क बनवून निवडलेल्या उपजीविकेच्या साधनावर भाष्य करणारे आहे. ठाणे स्कूल ऑफ आर्ट आणि करंदीकर कला अकादमीतून एटीडी आणि जीडी आर्टचे शिक्षण घेतलेल्या जुईली एक कलावंत म्हणून निसर्गावर प्रेम करणाऱ्या कलावंत आहेत. त्यामुळे लॉकडाउनचा काळात काही प्रमाणात का होईना प्रदूषणमुक्त झालेली वसुंधरा, मुक्तपणे संचार करणाऱ्या पक्ष्यांचे जगणे आनंददायी वाटले. अशा आनंदाचे क्षण त्या रंग आणि विविध पोताच्या माध्यमातून ॲबस्ट्रॅक फॉर्ममधून चित्रात व्यक्त करत असतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34h5dMI

No comments:

Post a Comment