निसर्गरम्य वातावरणात शिवपूजेचा आनंद, या शिवमंदिरात भाविकांची मांदियाळी केळवद (जि. नागपूर)  : सावनेर तालुक्यातील केळवद येथील कपिलेश्वर तीर्थस्थळ व पर्यटनाला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी येऊन कृतार्थ होऊन माघारी फिरतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनाची रीघ असते. यंदा कोरोनामुळे भक्तांची संख्या कमी झालेली असली तरी येथील निसर्गसौदर्य भाविकांना भुरळ पाडते. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या तीर्थस्थळावर भक्तांची गर्दी दिसून येत नाही. अशातच श्रावण महिन्यातील दर श्रावण सोमवारी शिवलिंगाच्या ठिकाणी श्रद्धाळू आपली श्रध्दा जोपासण्यासाठी या ठिकाणी येत असतात. कपिलमुनींनी केलेली तपश्चर्या तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे एकनिष्ठ उपासक रामस्वामी महाराजांच्या सहवासाने या स्थळाला एक वेगळे महत्त्व आहे. अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा   याशिवाय पुरातन शिवलिंग सदैव भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते. नजीकच्या रायबासा तलावातून वाहणाऱ्या खळखळत्या पाण्याचा प्रवाह येथे धबधब्यात रूपांतरीत होत १५ फूट उंचीवरून पडणारा नैसर्गिक धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. यंदा कोरोनाचे सावट असले तरी पाऊस मुबलक झाल्याने निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. येथील धबधबेही पूर्ण प्रवाहित झाल्याने सौदर्यात भर पडली आहे.  या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बैतुल या जिल्ह्यासह विदर्भातील पर्यटक आणि भाविक येथे येतात. तर पचमढी येथील महादेव याञेला जाणारे भाविक आवर्जुन या ठिकाणी येतात. यावर्षी कोरोना रोगाची साथ असल्याने पचमढी याञा होऊ शकली नाही. तर येथे साजरा करण्यात येत असलेला रामस्वामी महाराजांचा पुण्यतिथी मोहत्सव यावर्षी साजरा करण्यात आला नाही. या ठिकाणी असलेले पुरातन शिवलिंग रामस्वामी महाराजांचे समाधीस्थळ, दत्त मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, ओसांडून वाहणारा धबधबा याच बाजूला स्थापलेली २१ फुट उंच शंकराची मूर्ती आणि या परिसरातील असलेले निसर्गाची हिरवळ येथील सौंदर्यात भर घालते.   भक्ताच्या नवसाला पावणारा शंभू महादेव निसर्गरम्य परिसरात असणारा हा शंभू महादेव भाविकांच्या नवसाला पावणारा आहे, असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात दररोज भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात शंकराच्या पिंडी पूजेला अनन्यसाधारण महत्व असल्याने महिनाभर मंदिरात भाविकांची रेलचेल असते. श्रावण महिन्यात मनोभावे शंकराची आराधना करणाऱ्यास इच्छित फळाची प्राप्ती होते, असेही सांगितले जाते.  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 16, 2020

निसर्गरम्य वातावरणात शिवपूजेचा आनंद, या शिवमंदिरात भाविकांची मांदियाळी केळवद (जि. नागपूर)  : सावनेर तालुक्यातील केळवद येथील कपिलेश्वर तीर्थस्थळ व पर्यटनाला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी अनेक श्रद्धाळू दर्शनासाठी येऊन कृतार्थ होऊन माघारी फिरतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची दर्शनाची रीघ असते. यंदा कोरोनामुळे भक्तांची संख्या कमी झालेली असली तरी येथील निसर्गसौदर्य भाविकांना भुरळ पाडते. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे जिल्ह्यातील बहुतांश महत्त्वाच्या तीर्थस्थळावर भक्तांची गर्दी दिसून येत नाही. अशातच श्रावण महिन्यातील दर श्रावण सोमवारी शिवलिंगाच्या ठिकाणी श्रद्धाळू आपली श्रध्दा जोपासण्यासाठी या ठिकाणी येत असतात. कपिलमुनींनी केलेली तपश्चर्या तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे एकनिष्ठ उपासक रामस्वामी महाराजांच्या सहवासाने या स्थळाला एक वेगळे महत्त्व आहे. अधिक माहितीसाठी - नोकरी हवी तर धावा, पळा, चला भरा अर्ज, महावितरणमध्ये निघाल्या तब्बल सात हजार जागा   याशिवाय पुरातन शिवलिंग सदैव भाविकांच्या दर्शनासाठी खुले असते. नजीकच्या रायबासा तलावातून वाहणाऱ्या खळखळत्या पाण्याचा प्रवाह येथे धबधब्यात रूपांतरीत होत १५ फूट उंचीवरून पडणारा नैसर्गिक धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. यंदा कोरोनाचे सावट असले तरी पाऊस मुबलक झाल्याने निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. येथील धबधबेही पूर्ण प्रवाहित झाल्याने सौदर्यात भर पडली आहे.  या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा, बैतुल या जिल्ह्यासह विदर्भातील पर्यटक आणि भाविक येथे येतात. तर पचमढी येथील महादेव याञेला जाणारे भाविक आवर्जुन या ठिकाणी येतात. यावर्षी कोरोना रोगाची साथ असल्याने पचमढी याञा होऊ शकली नाही. तर येथे साजरा करण्यात येत असलेला रामस्वामी महाराजांचा पुण्यतिथी मोहत्सव यावर्षी साजरा करण्यात आला नाही. या ठिकाणी असलेले पुरातन शिवलिंग रामस्वामी महाराजांचे समाधीस्थळ, दत्त मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, ओसांडून वाहणारा धबधबा याच बाजूला स्थापलेली २१ फुट उंच शंकराची मूर्ती आणि या परिसरातील असलेले निसर्गाची हिरवळ येथील सौंदर्यात भर घालते.   भक्ताच्या नवसाला पावणारा शंभू महादेव निसर्गरम्य परिसरात असणारा हा शंभू महादेव भाविकांच्या नवसाला पावणारा आहे, असे सांगितले जाते. श्रावण महिन्यात दररोज भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात शंकराच्या पिंडी पूजेला अनन्यसाधारण महत्व असल्याने महिनाभर मंदिरात भाविकांची रेलचेल असते. श्रावण महिन्यात मनोभावे शंकराची आराधना करणाऱ्यास इच्छित फळाची प्राप्ती होते, असेही सांगितले जाते.  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2DXUiwE

No comments:

Post a Comment