उपराजधानीतील तलावांमध्ये नेमके काय झाले? वाचा नागपूर : शहरात असलेल्या तलावांमधील ऑक्सिजनमध्ये चांगलीच घट झाली असून भोसलेकालीन ऐतिहासिक सक्करदार तलावाची जलवनस्पतीच्या जाळ्यामुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे शहरातील जलस्रोतच नव्हे तर सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांबाबत पुतना मावशीचे प्रेम असल्याचे अधोरेखित झाले आहे. मागील आठ वर्षांपासून पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनतर्फे शहरातील तलावांतील ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी केली जाते. फेब्रुवारीमध्ये तसेच गणेश विसर्जनापूर्वी आणि नंतर ग्रीन व्हिजिलचे स्वयंसेवक तलावातील पाण्याची तपासणी करतात. आज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांच्या नेतृत्त्वात टिम लिडर सुरभी जैस्वाल यांनी सहकाऱ्यांसोबत फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागर तलाव आणि सक्करदरा तलावातील पाण्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान भोसलेकालीन सक्करदरा तलावाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. या तलावात पाण्यावर चहूबाजूंनी जलपर्णी वाढली आहे. परिणामी या तलावातील ऑक्सिजनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे तलावातील मासे व इतर जलचर नष्ट होण्याची शक्यता आहे. या तलावात ३ एमजी प्रती लीटर ऑक्सिजन आहे. या तलावात विसर्जन केल्यास जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता सुरभी जैस्वाल यांनी व्यक्त केली.  तलावात ६ एमजी प्रती लीटर एवढ्या ऑक्सिजनची मात्रा आवश्यक असते. परंतु, शहरातील प्रमुख तलावांत हे प्रमाण अतिशय कमी आहे. गांधीसागर, सोनेगाव व फुटाळा तलावाची स्थिती सुधारली होती. परंतु पुन्हा येथील पाण्यातील ऑॅक्सिजनमध्ये घट झाली. या तिन्ही तलावातील पाण्यात ४.५ एमजी प्रती लीटर ऑक्सिजन आहे.   डेप्युटी टिम लिडर मेहुल कोसुरकर यांनी उन्हाळ्यात सक्करदरा व गांधीसागर तलाव कोरडा होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. अर्थ इको इंटरनॅशनल ही संस्था दरवर्षी विविध देशातील नद्या व तलावांच्या स्थितीची आकडेवारी गोळा करते. फाऊंडेशनर्तफे आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. तलावातील पाण्यात साधारणपणे ६ एमजी प्रती लीटर ऑक्सिजनची मात्रा आवश्यक आहे. परंतु, प्रमुख तलावांमधील पाण्याच्या तपासणीतून ऑक्सिजनमध्ये घट झाल्याचे दिसून आले. विसर्जनानंतर ही स्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख तलावांत ऑक्सिजन वाढविण्यासाठी कृत्रिम एरिएशन सिस्टिमसाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. सुरभी जैस्वाल, टिम लिडर, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 10, 2020

उपराजधानीतील तलावांमध्ये नेमके काय झाले? वाचा नागपूर : शहरात असलेल्या तलावांमधील ऑक्सिजनमध्ये चांगलीच घट झाली असून भोसलेकालीन ऐतिहासिक सक्करदार तलावाची जलवनस्पतीच्या जाळ्यामुळे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे शहरातील जलस्रोतच नव्हे तर सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांबाबत पुतना मावशीचे प्रेम असल्याचे अधोरेखित झाले आहे. मागील आठ वर्षांपासून पर्यावरणप्रेमी संस्था ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनतर्फे शहरातील तलावांतील ऑक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी केली जाते. फेब्रुवारीमध्ये तसेच गणेश विसर्जनापूर्वी आणि नंतर ग्रीन व्हिजिलचे स्वयंसेवक तलावातील पाण्याची तपासणी करतात. आज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी यांच्या नेतृत्त्वात टिम लिडर सुरभी जैस्वाल यांनी सहकाऱ्यांसोबत फुटाळा तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागर तलाव आणि सक्करदरा तलावातील पाण्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान भोसलेकालीन सक्करदरा तलावाची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे पुढे आले. या तलावात पाण्यावर चहूबाजूंनी जलपर्णी वाढली आहे. परिणामी या तलावातील ऑक्सिजनमध्ये घट झाली आहे. त्यामुळे तलावातील मासे व इतर जलचर नष्ट होण्याची शक्यता आहे. या तलावात ३ एमजी प्रती लीटर ऑक्सिजन आहे. या तलावात विसर्जन केल्यास जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता सुरभी जैस्वाल यांनी व्यक्त केली.  तलावात ६ एमजी प्रती लीटर एवढ्या ऑक्सिजनची मात्रा आवश्यक असते. परंतु, शहरातील प्रमुख तलावांत हे प्रमाण अतिशय कमी आहे. गांधीसागर, सोनेगाव व फुटाळा तलावाची स्थिती सुधारली होती. परंतु पुन्हा येथील पाण्यातील ऑॅक्सिजनमध्ये घट झाली. या तिन्ही तलावातील पाण्यात ४.५ एमजी प्रती लीटर ऑक्सिजन आहे.   डेप्युटी टिम लिडर मेहुल कोसुरकर यांनी उन्हाळ्यात सक्करदरा व गांधीसागर तलाव कोरडा होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. अर्थ इको इंटरनॅशनल ही संस्था दरवर्षी विविध देशातील नद्या व तलावांच्या स्थितीची आकडेवारी गोळा करते. फाऊंडेशनर्तफे आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. तलावातील पाण्यात साधारणपणे ६ एमजी प्रती लीटर ऑक्सिजनची मात्रा आवश्यक आहे. परंतु, प्रमुख तलावांमधील पाण्याच्या तपासणीतून ऑक्सिजनमध्ये घट झाल्याचे दिसून आले. विसर्जनानंतर ही स्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. शहरातील प्रमुख तलावांत ऑक्सिजन वाढविण्यासाठी कृत्रिम एरिएशन सिस्टिमसाठी महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे. सुरभी जैस्वाल, टिम लिडर, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30J5WE3

No comments:

Post a Comment