गलवान संघर्षात निकृष्ट वाहनांमुळे चिनी सैनिकांचा बळी; अशी अफवा उठवली आणि... बीजिंग - लष्करी वाहनांचा खराब दर्जा तसेच अंतर्गत भ्रष्टाचारामुळे सीमेवर भारतीय जवानांविरुद्धच्या संघर्षात आपले सैनिक मारले गेले असा खळबळजनक दावा ऑनलाईन माध्यमावर करणाऱ्या एका चिनी नागरिकाला अटक करण्यात आली. ऑनलाईन माध्यमातून अफवा पसरविल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पीपल्स लिबरेशन आर्मीच्या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळावर  संक्षिप्त वृत्त देण्यात आले आहे. त्यानुसार झोऊ लियींग असे त्याचे नाव आहे. त्याने म्हटले होते की, डाँगफेंग ऑफ-रोड व्हेइकल ही कंपनी लष्कराला वाहने पुरविते. त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या वाहनांमुळे फटका बसला. भारत व चिनी सैनिकांमधील संघर्षाचे ठिकाण किंवा तारीख असा कोणताही उल्लेख या वृत्तात करण्यात आलेला नाही. उभय देशांचे सैनिक १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात आमनेसामने आले होते. भारताने २० जवान हुतात्मा झाल्याचे म्हटले आहे, चीनने मात्र कोणत्याही हानीचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. वुइचॅटवरील कमेंटमध्ये झोऊ याने हा दावा केल्याचे तीन ऑगस्ट रोजी डाँगफेंग कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना कळविले. मग एक विशेष कार्यकारी पथक तयार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी झोऊला अटकही झाली. झोऊ याने अफवा पसरविण्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि लेखी माफीही मागितली असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 8, 2020

गलवान संघर्षात निकृष्ट वाहनांमुळे चिनी सैनिकांचा बळी; अशी अफवा उठवली आणि... बीजिंग - लष्करी वाहनांचा खराब दर्जा तसेच अंतर्गत भ्रष्टाचारामुळे सीमेवर भारतीय जवानांविरुद्धच्या संघर्षात आपले सैनिक मारले गेले असा खळबळजनक दावा ऑनलाईन माध्यमावर करणाऱ्या एका चिनी नागरिकाला अटक करण्यात आली. ऑनलाईन माध्यमातून अफवा पसरविल्याचा आरोप पोलिसांनी त्याच्यावर ठेवला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पीपल्स लिबरेशन आर्मीच्या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळावर  संक्षिप्त वृत्त देण्यात आले आहे. त्यानुसार झोऊ लियींग असे त्याचे नाव आहे. त्याने म्हटले होते की, डाँगफेंग ऑफ-रोड व्हेइकल ही कंपनी लष्कराला वाहने पुरविते. त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या वाहनांमुळे फटका बसला. भारत व चिनी सैनिकांमधील संघर्षाचे ठिकाण किंवा तारीख असा कोणताही उल्लेख या वृत्तात करण्यात आलेला नाही. उभय देशांचे सैनिक १५ जून रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात आमनेसामने आले होते. भारताने २० जवान हुतात्मा झाल्याचे म्हटले आहे, चीनने मात्र कोणत्याही हानीचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. वुइचॅटवरील कमेंटमध्ये झोऊ याने हा दावा केल्याचे तीन ऑगस्ट रोजी डाँगफेंग कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांना कळविले. मग एक विशेष कार्यकारी पथक तयार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी झोऊला अटकही झाली. झोऊ याने अफवा पसरविण्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि लेखी माफीही मागितली असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kqLDDc

No comments:

Post a Comment