पतसंस्थांत आता ‘क्रास’ प्रणाली सक्तीची पुणे - कर्ज मागणाऱ्या ग्राहकाची अन्य पतसंस्था अथवा बॅंकेकडे नेमकी किती थकबाकी आहे, याची माहिती पतसंस्थांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही महाभाग एका वेळी चार-चार पतसंस्थांकडून कर्ज घेतात. परिणामी संस्थांची फसवणूक होते. मात्र आता यासाठी पतसंस्थांत ‘क्रास’ प्रणाली सक्तीची करण्यात येणार असून, त्यामुळे फसवणूक टळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या याबाबतच्या प्रस्तावाला सहकार विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. बॅंकांच्या कर्जदारांसाठी क्रेडिट रेटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सिबिल’च्या धर्तीवर आता पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी ‘क्रास’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. कर्ज मागणाऱ्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे अन्य कुठे कर्ज आहे का, कर्ज देण्यास ती पात्र आहे का, हे या प्रणालीमुळे कळणार आहे. राज्यातील सुमारे साडेचारशे पतसंस्थांकडून सध्या या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.  टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि.... काही कर्जदार राष्ट्रीयकृत किंवा नागरी बॅंकांकडून कर्ज न मिळाल्यास पतसंस्थांकडे धाव घेतात. पतसंस्थांच्या विश्‍वासार्हतेमुळे ठेवींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पतसंस्थांनाही कर्ज वाटप करणे गरजेचे आहे.  अशा परिस्थितीत चुकीच्या व्यक्तीला कर्जवाटप झाल्यास पतसंस्थांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो, असे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सांगण्यात आले. अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांनो तयारीत राहा   आईला रुग्णालयात उपचारासाठी २० हजारांची गरज होती. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत चौकशी केली. तेथेही उद्या या, परवा या असे उत्तर मिळाले. त्यानंतर समता पतसंस्थेत गेल्यानंतर त्यांनी ‘क्रास’ प्रणालीमध्ये अहवाल तपासला. त्यात यापूर्वी मी दुचाकीसाठी घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे मला पतसंस्थेतून दुसऱ्याच दिवशी कर्ज मिळाले. - मानतेश ब्याळी, कर्जदार, हडपसर विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा दोन वर्षांपूर्वी एक कर्जदार जागा बदलून दुसरीकडे गेला; परंतु ‘क्रास’ प्रणालीमध्ये त्या कर्जदाराचे नाव टाकून पाहिले. तो मुंबईत एका कंपनीत कामाला असून, त्या ठिकाणी त्याने कर्ज घेतल्याचे दिसून आले. शिवाय, त्या व्यक्‍तीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळाल्यामुळे त्याचा शोध घेणे शक्‍य झाले. - यतिनकुमार हुले, अध्यक्ष, संत ज्ञानेश्‍वर पतसंस्था, मंचर, ता. आंबेगाव ‘क्रास’ प्रणालीचा वापर सक्तीचा करण्याबाबत प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पतसंस्थांकडील थकबाकीचे प्रमाण कमी होईल. पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या कर्जदारांवर चाप बसणार आहे. तसेच सहकारी पतसंस्था चळवळीला चांगले वळण लागणार आहे. - काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/34HmNtz - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, August 29, 2020

पतसंस्थांत आता ‘क्रास’ प्रणाली सक्तीची पुणे - कर्ज मागणाऱ्या ग्राहकाची अन्य पतसंस्था अथवा बॅंकेकडे नेमकी किती थकबाकी आहे, याची माहिती पतसंस्थांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही महाभाग एका वेळी चार-चार पतसंस्थांकडून कर्ज घेतात. परिणामी संस्थांची फसवणूक होते. मात्र आता यासाठी पतसंस्थांत ‘क्रास’ प्रणाली सक्तीची करण्यात येणार असून, त्यामुळे फसवणूक टळणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या याबाबतच्या प्रस्तावाला सहकार विभागाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. बॅंकांच्या कर्जदारांसाठी क्रेडिट रेटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सिबिल’च्या धर्तीवर आता पतसंस्थांच्या कर्जदारांसाठी ‘क्रास’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. कर्ज मागणाऱ्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे अन्य कुठे कर्ज आहे का, कर्ज देण्यास ती पात्र आहे का, हे या प्रणालीमुळे कळणार आहे. राज्यातील सुमारे साडेचारशे पतसंस्थांकडून सध्या या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.  टेंपो चालक रस्त्याच्या कडेला थांबून लघुशंकेसाठी खाली उतरला आणि.... काही कर्जदार राष्ट्रीयकृत किंवा नागरी बॅंकांकडून कर्ज न मिळाल्यास पतसंस्थांकडे धाव घेतात. पतसंस्थांच्या विश्‍वासार्हतेमुळे ठेवींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पतसंस्थांनाही कर्ज वाटप करणे गरजेचे आहे.  अशा परिस्थितीत चुकीच्या व्यक्तीला कर्जवाटप झाल्यास पतसंस्थांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो, असे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून सांगण्यात आले. अकरावी अॅडमिशन : पहिली गुणवत्ता यादी उद्या होणार जाहीर; विद्यार्थ्यांनो तयारीत राहा   आईला रुग्णालयात उपचारासाठी २० हजारांची गरज होती. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत चौकशी केली. तेथेही उद्या या, परवा या असे उत्तर मिळाले. त्यानंतर समता पतसंस्थेत गेल्यानंतर त्यांनी ‘क्रास’ प्रणालीमध्ये अहवाल तपासला. त्यात यापूर्वी मी दुचाकीसाठी घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते भरल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे मला पतसंस्थेतून दुसऱ्याच दिवशी कर्ज मिळाले. - मानतेश ब्याळी, कर्जदार, हडपसर विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा दोन वर्षांपूर्वी एक कर्जदार जागा बदलून दुसरीकडे गेला; परंतु ‘क्रास’ प्रणालीमध्ये त्या कर्जदाराचे नाव टाकून पाहिले. तो मुंबईत एका कंपनीत कामाला असून, त्या ठिकाणी त्याने कर्ज घेतल्याचे दिसून आले. शिवाय, त्या व्यक्‍तीचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक मिळाल्यामुळे त्याचा शोध घेणे शक्‍य झाले. - यतिनकुमार हुले, अध्यक्ष, संत ज्ञानेश्‍वर पतसंस्था, मंचर, ता. आंबेगाव ‘क्रास’ प्रणालीचा वापर सक्तीचा करण्याबाबत प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पतसंस्थांकडील थकबाकीचे प्रमाण कमी होईल. पतसंस्थांची फसवणूक करणाऱ्या कर्जदारांवर चाप बसणार आहे. तसेच सहकारी पतसंस्था चळवळीला चांगले वळण लागणार आहे. - काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/34HmNtz


via News Story Feeds https://ift.tt/34R0yS5

No comments:

Post a Comment