...अशी होते खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची लूट कोल्हापूर : कोरोनाची लक्षणे नाहीत, पण कोरोना बाधित असणाऱ्यांना दोन ते अडीच लाख रुपये. कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्यांना 3 ते 4 लाख रुपये आणि व्हेंटिलेटर लावल्यास 5 ते 6 लाख रुपये. याशिवाय इतर औषधांचा खर्च वेगळाच असे सांगून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी पॅकेज सिस्टीम तयार केली आहे. दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णाला बेड शिल्लक नाहीत म्हणून सांगितले जाते, नाहीतर पॅकेजचा दरपत्रक तोंडी सांगून त्यांना ऍडमिट करुन घेतले जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी लुबाडणूक थांबणार तर कधी, असा सवाल केला जात आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाला सरासरी 400 रुग्ण आढळून येत आहे. यामधील सुमारे 80 ते 85 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. तरीही, कोरोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरलेल्या रुग्णांकडून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात असणाऱ्या इतर ठिकाणच्या दवाखान्यात चौकशी केली जाते. बहुतांशी रुग्ण सरळ रुग्णालयात जातात. पण त्यांना बेड शिल्लक नाहीत म्हणून उत्तर दिले जाते. रुग्णाकडून गयावया केल्यानंतर त्यांना 2 ते 3 लाखपासून 5 ते 6 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज सांगितले जाते. कोरोना संसर्गाचा आणि रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून जिल्ह्यातील अनेक नामवंत आणि नावाजलेल्या दवाखान्यांकडून रुग्णांची लुट केली जात आहे. ज्या-ज्या दवाखान्यांकडून अशी लुट होत आहे. त्या दवाखान्याविरुध्द लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर टीका होत आहे.  एकीकडे शासकीय दवाखान्यात कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे खासगी दवाखान्यातील पॅकेज ऐकूण रुग्णांना दाद कोणाकडे मागायची हा प्रश्‍न पडला आहे.  जिल्हा प्रशासनाकडून खासगी दवाखान्यातील बिलासंदर्भात ऑडिट करणारी समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीपर्यंत हे सर्व विषय पोचत नाहीत. अधिकारी कोण, कोणाला भेटावे, कोणाकडे दाद मागावी याची कोणतीही माहिती रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांकडे नाही. त्यामुळे उपचार घ्यावे तर एक आणि न घ्यावेत तर एक अशी अवस्था होवून बसली आहे. त्यामुळे अशा खासगी दवाखान्याकडून होणारी लुट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशीही मागणी होत आहे.  हे पण वाचा - कसा कोरोना व्हायरस आला ओ... कोल्हापूरच्या शेतमजूर महिलांनी गायिलेले गीत सोशल मिडियावर व्हायरल      खरी कॉर्नर येथील एका महिलेला कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हणून दहा दिवस दवाखान्यात ठेवले. त्यानंतर केवळ गोळ्या आणि इतर औषध दिले तर त्याचे दीड लाख रुपये बिल केले. त्या कुटूंबाला पंधरा ते वीस हजार रुपये बिल होईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात दीड लाख रुपयांचा आकडा ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले.  संपादन - धनाजी सुर्वे   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 11, 2020

...अशी होते खासगी रूग्णालयांकडून रूग्णांची लूट कोल्हापूर : कोरोनाची लक्षणे नाहीत, पण कोरोना बाधित असणाऱ्यांना दोन ते अडीच लाख रुपये. कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्यांना 3 ते 4 लाख रुपये आणि व्हेंटिलेटर लावल्यास 5 ते 6 लाख रुपये. याशिवाय इतर औषधांचा खर्च वेगळाच असे सांगून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी पॅकेज सिस्टीम तयार केली आहे. दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णाला बेड शिल्लक नाहीत म्हणून सांगितले जाते, नाहीतर पॅकेजचा दरपत्रक तोंडी सांगून त्यांना ऍडमिट करुन घेतले जात आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची होणारी लुबाडणूक थांबणार तर कधी, असा सवाल केला जात आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाला सरासरी 400 रुग्ण आढळून येत आहे. यामधील सुमारे 80 ते 85 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. तरीही, कोरोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरलेल्या रुग्णांकडून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात असणाऱ्या इतर ठिकाणच्या दवाखान्यात चौकशी केली जाते. बहुतांशी रुग्ण सरळ रुग्णालयात जातात. पण त्यांना बेड शिल्लक नाहीत म्हणून उत्तर दिले जाते. रुग्णाकडून गयावया केल्यानंतर त्यांना 2 ते 3 लाखपासून 5 ते 6 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज सांगितले जाते. कोरोना संसर्गाचा आणि रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेवून जिल्ह्यातील अनेक नामवंत आणि नावाजलेल्या दवाखान्यांकडून रुग्णांची लुट केली जात आहे. ज्या-ज्या दवाखान्यांकडून अशी लुट होत आहे. त्या दवाखान्याविरुध्द लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहीर टीका होत आहे.  एकीकडे शासकीय दवाखान्यात कोरोना रुग्णांची हेळसांड होत आहे. तर दुसरीकडे खासगी दवाखान्यातील पॅकेज ऐकूण रुग्णांना दाद कोणाकडे मागायची हा प्रश्‍न पडला आहे.  जिल्हा प्रशासनाकडून खासगी दवाखान्यातील बिलासंदर्भात ऑडिट करणारी समिती नियुक्त केली आहे. मात्र, या समितीपर्यंत हे सर्व विषय पोचत नाहीत. अधिकारी कोण, कोणाला भेटावे, कोणाकडे दाद मागावी याची कोणतीही माहिती रुग्णांना किंवा त्याच्या नातेवाईकांकडे नाही. त्यामुळे उपचार घ्यावे तर एक आणि न घ्यावेत तर एक अशी अवस्था होवून बसली आहे. त्यामुळे अशा खासगी दवाखान्याकडून होणारी लुट थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशीही मागणी होत आहे.  हे पण वाचा - कसा कोरोना व्हायरस आला ओ... कोल्हापूरच्या शेतमजूर महिलांनी गायिलेले गीत सोशल मिडियावर व्हायरल      खरी कॉर्नर येथील एका महिलेला कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हणून दहा दिवस दवाखान्यात ठेवले. त्यानंतर केवळ गोळ्या आणि इतर औषध दिले तर त्याचे दीड लाख रुपये बिल केले. त्या कुटूंबाला पंधरा ते वीस हजार रुपये बिल होईल, असे वाटले होते. प्रत्यक्षात दीड लाख रुपयांचा आकडा ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले.  संपादन - धनाजी सुर्वे   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30Lyqgx

No comments:

Post a Comment