टॉसिलीझमॅब इंजेक्शनच्या उपयुक्ततेबाबत समोर आली मोठी माहिती; म्हणून राज्यात भासतोय औषधाचा तुटवडा मुंबई  : टॉसिलीझुमॅब इंजेक्शन कोरोनासाठी उपयुक्त नसल्याकारणाने त्याची आयात कमी प्रमाणात होत असल्याचे रोश्च फार्मा या कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, तरीही लोकांच्या गरजेसाठी या इंजेक्शनबाबत एफडीएकडून कंपनीला विचारणा करुन आयात वाढवण्याची विनंती केली जाणार आहे. गंभीर कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शन नंतर टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून या टॉसिलीझुमॅब इंजेक्शन राज्यात कुठे ही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्या.  मुंबईतील खासगी रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. मात्र, हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, डॉक्टरांनी टॉसिलीझुमॅब उपलब्ध होत नसेल तर त्याला पर्याय म्हणून इटॉलिझूमॅब किंवा रेमडेसिवीर या इंजेक्शन सल्ला नातेवाईकांना द्यावा असेही एफडीएकडून सांगण्यात आले आहे. ...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी एफडीएकडून रोश्च कंपनीकडे होणार विचारणा - टॉसिलीझुमॅब हे औषध सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येत होतं. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णावर वापरलं जातं होतं . पण गेल्या काही दिवसांपासून या औषधाचा बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे . रोश्च या कंपनीकडून या औषधांची आयात केली जाते, तर, या औषधांची सिप्ला ही कंपनी पुरवठादार आहे. पण सध्या हे औषध कोरोना रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याचं म्हणत कंपनीने या औषधांचा पुरवठा भारतभरात बंद केला आहे, केवळ नियमित रुग्णांसाठी पुरवठा केला जाईल असं कंपनीचं म्हणणं आहे . सध्या या औषधांची मागणी अधिक असताना पुरवठा कमी असल्यामुळे रेमडेसीवर, इटॉलिझूमॅब ही औषधं बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ही औषधं परिणामकारक आहेत, डॉक्टरांनी ही औषधं देण्याचाही सल्ला एफडीए कडून देण्यात आला आहे . सध्या रेमडेसीवरचे एफडीएकडे 18 हजारावर राज्यभरात डोस शिल्लक असून, मुबलक पुरवठा आहे . तरीही सध्या टॉसिलीझुमॅब या औषधांचा पुरवठा बंद असला तरी या कंपनीकडे पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात एफडीए विचारणा करणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी सांगितले आहे.  दरम्यान, टॉसिलीझुमॅब औषधाच्या तुटवड्याप्रकरणी ऑल फूड अँण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी यावरून एफडीए आणि सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारी सुरु असताना प्रभावी मानले जाणारे टॉसिलीझुमॅब दहा दिवस हुन अधिक दिवस उपलब्ध नसणे याचा अर्थ एफडीए आणि सरकारचे यावर नियंत्रण नसणे असा घ्यावा का ? असा सवाल उपस्थित केला.  कारागृहांमध्येही कोरोनाचे थैमान! बाधित कैद्यांचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का खासगी रुग्णालयात ही तुटवडा-  दरम्यान, खासगी रुग्णालयात ही याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. गेल्या 15 दिवसांपासून नव्या पुरवठ्याची मागणी केली जात आहे. तरी देखील रुग्णालयात इंजेक्शनचा पूरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. दुसर्यांदा अश्या प्रकारे तुटवडा भासत असल्याचे ही सांगण्यात आले आहे. मुंबईत दिवसाला किमान 500 इंजेक्शनची मागणी आहे. मात्र, कुठेही हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याकारणे खासगी रुग्णालयांना ही त्याचा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट-  मुंबईच्या लिलावती रुग्णालयाचे पल्मुनरी फिजीशिअन डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, " टॉसिलीझुमॅबसाठी नातेवाईकांची फरफट होते आहे. आमच्या इथे टॉसिलीझुमॅब उपलब्ध नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना लिहुन द्यावं लागतं. पण त्या नातेवाईकांना हि त्रास होतो. कारण, नातेवाईकांना दोन ते तीन दिवस हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही आणि त्यातून रुग्णांची तब्येत आणखी खालावते. म्हणजे तात्काळ हव्या असणार्या इंजेक्शन साठी दोन ते तीन दिवस रखडत रहावं लागतं. सध्या 15 रुग्ण आयसीयू मध्ये दाखल आहेत. गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनची गरज भासते.  त्यामुळे, ही परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे, सध्या रेमडेसिवीर वापरले जात आहे. " --------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, August 16, 2020

टॉसिलीझमॅब इंजेक्शनच्या उपयुक्ततेबाबत समोर आली मोठी माहिती; म्हणून राज्यात भासतोय औषधाचा तुटवडा मुंबई  : टॉसिलीझुमॅब इंजेक्शन कोरोनासाठी उपयुक्त नसल्याकारणाने त्याची आयात कमी प्रमाणात होत असल्याचे रोश्च फार्मा या कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, तरीही लोकांच्या गरजेसाठी या इंजेक्शनबाबत एफडीएकडून कंपनीला विचारणा करुन आयात वाढवण्याची विनंती केली जाणार आहे. गंभीर कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडिसिवीर इंजेक्शन नंतर टॉसिलीझुमॅब या इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यापासून या टॉसिलीझुमॅब इंजेक्शन राज्यात कुठे ही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्या.  मुंबईतील खासगी रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. मात्र, हे इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय, डॉक्टरांनी टॉसिलीझुमॅब उपलब्ध होत नसेल तर त्याला पर्याय म्हणून इटॉलिझूमॅब किंवा रेमडेसिवीर या इंजेक्शन सल्ला नातेवाईकांना द्यावा असेही एफडीएकडून सांगण्यात आले आहे. ...अन् स्वातंत्र्यदिनी पाटोळ ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण थांबली; जलजीवन मिशनद्वारे थेट नळजोडणी एफडीएकडून रोश्च कंपनीकडे होणार विचारणा - टॉसिलीझुमॅब हे औषध सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येत होतं. हे औषध कोरोनाच्या गंभीर रुग्णावर वापरलं जातं होतं . पण गेल्या काही दिवसांपासून या औषधाचा बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे . रोश्च या कंपनीकडून या औषधांची आयात केली जाते, तर, या औषधांची सिप्ला ही कंपनी पुरवठादार आहे. पण सध्या हे औषध कोरोना रुग्णांसाठी परिणामकारक नसल्याचं म्हणत कंपनीने या औषधांचा पुरवठा भारतभरात बंद केला आहे, केवळ नियमित रुग्णांसाठी पुरवठा केला जाईल असं कंपनीचं म्हणणं आहे . सध्या या औषधांची मागणी अधिक असताना पुरवठा कमी असल्यामुळे रेमडेसीवर, इटॉलिझूमॅब ही औषधं बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ही औषधं परिणामकारक आहेत, डॉक्टरांनी ही औषधं देण्याचाही सल्ला एफडीए कडून देण्यात आला आहे . सध्या रेमडेसीवरचे एफडीएकडे 18 हजारावर राज्यभरात डोस शिल्लक असून, मुबलक पुरवठा आहे . तरीही सध्या टॉसिलीझुमॅब या औषधांचा पुरवठा बंद असला तरी या कंपनीकडे पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात एफडीए विचारणा करणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी सांगितले आहे.  दरम्यान, टॉसिलीझुमॅब औषधाच्या तुटवड्याप्रकरणी ऑल फूड अँण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी यावरून एफडीए आणि सरकारवर टीका केली आहे. कोरोना महामारी सुरु असताना प्रभावी मानले जाणारे टॉसिलीझुमॅब दहा दिवस हुन अधिक दिवस उपलब्ध नसणे याचा अर्थ एफडीए आणि सरकारचे यावर नियंत्रण नसणे असा घ्यावा का ? असा सवाल उपस्थित केला.  कारागृहांमध्येही कोरोनाचे थैमान! बाधित कैद्यांचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का खासगी रुग्णालयात ही तुटवडा-  दरम्यान, खासगी रुग्णालयात ही याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. गेल्या 15 दिवसांपासून नव्या पुरवठ्याची मागणी केली जात आहे. तरी देखील रुग्णालयात इंजेक्शनचा पूरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. दुसर्यांदा अश्या प्रकारे तुटवडा भासत असल्याचे ही सांगण्यात आले आहे. मुंबईत दिवसाला किमान 500 इंजेक्शनची मागणी आहे. मात्र, कुठेही हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याकारणे खासगी रुग्णालयांना ही त्याचा फटका बसत असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट-  मुंबईच्या लिलावती रुग्णालयाचे पल्मुनरी फिजीशिअन डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, " टॉसिलीझुमॅबसाठी नातेवाईकांची फरफट होते आहे. आमच्या इथे टॉसिलीझुमॅब उपलब्ध नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना लिहुन द्यावं लागतं. पण त्या नातेवाईकांना हि त्रास होतो. कारण, नातेवाईकांना दोन ते तीन दिवस हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही आणि त्यातून रुग्णांची तब्येत आणखी खालावते. म्हणजे तात्काळ हव्या असणार्या इंजेक्शन साठी दोन ते तीन दिवस रखडत रहावं लागतं. सध्या 15 रुग्ण आयसीयू मध्ये दाखल आहेत. गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनची गरज भासते.  त्यामुळे, ही परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे, सध्या रेमडेसिवीर वापरले जात आहे. " --------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gaPIIF

No comments:

Post a Comment