Video : महाराष्ट्रातील पारंपरिक चित्रकलेचा रंजक अभ्यास वडार, मरिआईवाले, डक्कलवार आणि चित्रकथी यांच्यासारख्या भटक्‍या जमातींनी महाराष्ट्राची चित्रपरंपरा ही देव्हाऱ्यांच्या माध्यमातून आजतागायत जिवंत ठेवली आहे. पुण्यातील चित्रकार प्रा. विक्रम कुलकर्णी हे या लोकपरंपरेवरील संशोधन प्रकल्प राबवत आहेत. सध्या ते सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे टागोर फेलो म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील लोकचित्रकला परंपरेचा इतिहास त्यांनी छायाचित्रं व दृकश्राव्य फितींच्या स्वरूपातही दस्तऐवज म्हणून जपला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुलकर्णी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील भटक्‍या जातींशी संबंधित चित्रकला परंपरा या विषयावर, मी प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण करून झालं आहे. आता त्या माहितीचं विश्‍लेषण, तपशीलवार मांडणी आदी काम सुरू आहे. मी केलेल्या अभ्यासात पारंपरिक चित्रांकनाबरोबरच त्या-त्या काळातील वास्तव प्रतिबिंबित झालेलं आढळलं. उदाहरणार्थ, इंग्रजी राजवटीत वडार समाजातील लोकांना गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हेगार समजलं जायचं. दोन्ही हात बांधून न्यायालयात उभं केलं जायचं. हे वर्णन करणारी चित्रं वडार मंडळींच्या देव्हाऱ्यांवर बघायला मिळाली. मरिआईवाल्यांच्या देव्हाऱ्यांवर बलुतेदारांची चित्रं पहायला मिळाली. यमपुराणात पापाबद्दल सांगितलेल्या शिक्षा दर्शविणारी चित्रं दिसली. परंपरागत पुराणकथांप्रमाणेच जत्रा, शेती आदी लोकजीवन काही चित्रांतून, तर काहींमधून निसर्गाचं मानवजीवनाशी असलेलं नातं प्रकटलेलं जाणवलं.’’ कुलकर्णी यांनी असंही सांगितलं की, महाराष्ट्रात एकीकडे अजिंठ्याची निराळ्याच शैलीची चित्रकला आहे. त्याखेरीज तुरळक प्रमाणात ऐतिहासिक चित्रकला दिसते. उत्तर पेशवाईत वाई, मेणवलीसारख्या ठिकाणी वाड्यातील भिंतींवर चित्रं साकारली जात, पण ती तत्कालीन शासक वर्ग किंवा सुबत्ता असलेल्यांकरवीच. याउलट भटक्‍या जमातींनी आर्थिक पाठबळ नसतानाही चित्रपरंपरेचं मनोभावे जतन केलं. जेथून आलेत, त्या प्रांताच्या चित्र परंपरेला महाराष्ट्रातील लोकजीवनातील संदर्भांची जोड दिली. लोकचित्रकलेतील परंपरेत नवतेची भर घातली. ती कालसुसंगत करून लोकांसमोर नित्य ठेवत सांभाळली, हे या मंडळींचं मोलाचं योगदान आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 16, 2020

Video : महाराष्ट्रातील पारंपरिक चित्रकलेचा रंजक अभ्यास वडार, मरिआईवाले, डक्कलवार आणि चित्रकथी यांच्यासारख्या भटक्‍या जमातींनी महाराष्ट्राची चित्रपरंपरा ही देव्हाऱ्यांच्या माध्यमातून आजतागायत जिवंत ठेवली आहे. पुण्यातील चित्रकार प्रा. विक्रम कुलकर्णी हे या लोकपरंपरेवरील संशोधन प्रकल्प राबवत आहेत. सध्या ते सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी येथे टागोर फेलो म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील लोकचित्रकला परंपरेचा इतिहास त्यांनी छायाचित्रं व दृकश्राव्य फितींच्या स्वरूपातही दस्तऐवज म्हणून जपला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कुलकर्णी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील भटक्‍या जातींशी संबंधित चित्रकला परंपरा या विषयावर, मी प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण करून झालं आहे. आता त्या माहितीचं विश्‍लेषण, तपशीलवार मांडणी आदी काम सुरू आहे. मी केलेल्या अभ्यासात पारंपरिक चित्रांकनाबरोबरच त्या-त्या काळातील वास्तव प्रतिबिंबित झालेलं आढळलं. उदाहरणार्थ, इंग्रजी राजवटीत वडार समाजातील लोकांना गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हेगार समजलं जायचं. दोन्ही हात बांधून न्यायालयात उभं केलं जायचं. हे वर्णन करणारी चित्रं वडार मंडळींच्या देव्हाऱ्यांवर बघायला मिळाली. मरिआईवाल्यांच्या देव्हाऱ्यांवर बलुतेदारांची चित्रं पहायला मिळाली. यमपुराणात पापाबद्दल सांगितलेल्या शिक्षा दर्शविणारी चित्रं दिसली. परंपरागत पुराणकथांप्रमाणेच जत्रा, शेती आदी लोकजीवन काही चित्रांतून, तर काहींमधून निसर्गाचं मानवजीवनाशी असलेलं नातं प्रकटलेलं जाणवलं.’’ कुलकर्णी यांनी असंही सांगितलं की, महाराष्ट्रात एकीकडे अजिंठ्याची निराळ्याच शैलीची चित्रकला आहे. त्याखेरीज तुरळक प्रमाणात ऐतिहासिक चित्रकला दिसते. उत्तर पेशवाईत वाई, मेणवलीसारख्या ठिकाणी वाड्यातील भिंतींवर चित्रं साकारली जात, पण ती तत्कालीन शासक वर्ग किंवा सुबत्ता असलेल्यांकरवीच. याउलट भटक्‍या जमातींनी आर्थिक पाठबळ नसतानाही चित्रपरंपरेचं मनोभावे जतन केलं. जेथून आलेत, त्या प्रांताच्या चित्र परंपरेला महाराष्ट्रातील लोकजीवनातील संदर्भांची जोड दिली. लोकचित्रकलेतील परंपरेत नवतेची भर घातली. ती कालसुसंगत करून लोकांसमोर नित्य ठेवत सांभाळली, हे या मंडळींचं मोलाचं योगदान आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3914Ar0

No comments:

Post a Comment