नागपूरच्या खेळाडूंना कोणते दिग्गज देणार "टिप्स', वाचा सविस्तर  नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपुरातील असंख्य खेळाडू आपापल्या घरांमध्ये बंदिस्त असून, दैनंदिन सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे बहूसंख्य खेळाडू मानसिक तणावाखाली आहेत. यातून त्यांची सुटका करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या अनिश्‍चिततेच्या वातावरणात नेमके काय करावे, याविषयी देशभरातील दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना "ऑनलाईन वेबिनार'च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.  विद्‌यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच "स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज' सध्या बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिडचिड व नैराश्‍याची भावना निर्माण झाली आहे. जमावबंदीमुळे हे खेळाडू घरच्या घरीच वर्कआऊट व फिटनेस करीत आहेत. परंतु, खेळाडूंसाठी हे पुरेसे नाही. "एंड्युरन्स' व "स्कील'ची त्यांना नितांत आवश्‍यकता आहे. आणि याविषयी केवळ एक अनुभवी खेळाडूच सविस्तर सांगू शकतो. त्यामुळे विद्‌यापीठाने सहादिवसीय वेबिनारचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर या महिन्याअखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेबिनार होण्याची शक्‍यता आहे. आंतरविद्‌यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विद्‌यापीठाला पदक मिळालेल्या ऍथलेटिक्‍स, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्‌डी, व्हॉलीबॉल आणि जलतरण या सहा खेळांमध्ये हे वेबिनार होणार आहे.  हेही वाचा : इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव    वेबिनारमध्ये माजी ऑलिम्पिकपटू आनंद मेनेझिस, अर्जून पुरस्कारविजेती कबड्‌डीपटू शकुंतला खटावकर, जलतरणपटू वीरधवल खाडे, माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव इत्यादी तज्ज्ञ खेळाडू स्थानिक युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. यात केवळ विद्‌यापीठाचे सिनियर खेळाडूच नव्हे, शालेय स्पर्धांमध्ये खेळणारे ज्युनियर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा जगतातील मान्यवरदेखील सहभागी होऊ शकतील. यावेळी खेळाडूंनाही त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जवळपास एक हजार खेळाडू वेबिनारमध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. लवकरच क्रीडा स्पर्धा सुरू होणार असल्याने या वेबिनारचा नागपूरच्या युवा खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने निश्‍चितच फायदा होणार आहे.    " लॉकडाउनमुळे खेळाडूंची मानस्थिक स्थिती लक्षात घेता, अशा प्रकारच्या वेबिनारची आवश्‍यकता होती. ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभवी खेळाडूंकडून मिळणाऱ्या "टिप्स'चा विद्‌यापीठाच्या खेळाडूंना फायदाच होणार आहे. जास्तीतजास्त युवा खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. '  -डॉ. शरद सुर्यवंशी, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 9, 2020

नागपूरच्या खेळाडूंना कोणते दिग्गज देणार "टिप्स', वाचा सविस्तर  नागपूर : लॉकडाउनमुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागपुरातील असंख्य खेळाडू आपापल्या घरांमध्ये बंदिस्त असून, दैनंदिन सरावापासून वंचित आहेत. त्यामुळे बहूसंख्य खेळाडू मानसिक तणावाखाली आहेत. यातून त्यांची सुटका करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्‌यापीठाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या अनिश्‍चिततेच्या वातावरणात नेमके काय करावे, याविषयी देशभरातील दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना "ऑनलाईन वेबिनार'च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.  विद्‌यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे शहरातील सर्वच "स्पोर्टस ऍक्‍टिव्हिटीज' सध्या बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिडचिड व नैराश्‍याची भावना निर्माण झाली आहे. जमावबंदीमुळे हे खेळाडू घरच्या घरीच वर्कआऊट व फिटनेस करीत आहेत. परंतु, खेळाडूंसाठी हे पुरेसे नाही. "एंड्युरन्स' व "स्कील'ची त्यांना नितांत आवश्‍यकता आहे. आणि याविषयी केवळ एक अनुभवी खेळाडूच सविस्तर सांगू शकतो. त्यामुळे विद्‌यापीठाने सहादिवसीय वेबिनारचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या तारखा निश्‍चित झाल्यानंतर या महिन्याअखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेबिनार होण्याची शक्‍यता आहे. आंतरविद्‌यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये नागपूर विद्‌यापीठाला पदक मिळालेल्या ऍथलेटिक्‍स, क्रिकेट, बॅडमिंटन, कबड्‌डी, व्हॉलीबॉल आणि जलतरण या सहा खेळांमध्ये हे वेबिनार होणार आहे.  हेही वाचा : इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव    वेबिनारमध्ये माजी ऑलिम्पिकपटू आनंद मेनेझिस, अर्जून पुरस्कारविजेती कबड्‌डीपटू शकुंतला खटावकर, जलतरणपटू वीरधवल खाडे, माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव इत्यादी तज्ज्ञ खेळाडू स्थानिक युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. यात केवळ विद्‌यापीठाचे सिनियर खेळाडूच नव्हे, शालेय स्पर्धांमध्ये खेळणारे ज्युनियर खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा जगतातील मान्यवरदेखील सहभागी होऊ शकतील. यावेळी खेळाडूंनाही त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. जवळपास एक हजार खेळाडू वेबिनारमध्ये सहभागी होणार असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. लवकरच क्रीडा स्पर्धा सुरू होणार असल्याने या वेबिनारचा नागपूरच्या युवा खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने निश्‍चितच फायदा होणार आहे.    " लॉकडाउनमुळे खेळाडूंची मानस्थिक स्थिती लक्षात घेता, अशा प्रकारच्या वेबिनारची आवश्‍यकता होती. ऑलिम्पिक व अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुभवी खेळाडूंकडून मिळणाऱ्या "टिप्स'चा विद्‌यापीठाच्या खेळाडूंना फायदाच होणार आहे. जास्तीतजास्त युवा खेळाडूंनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे. '  -डॉ. शरद सुर्यवंशी, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2WksqJh

No comments:

Post a Comment