या कारणाने बुडाला विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास  नागपूर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयात दररोज शेकडो विद्यार्थी असतात. या ग्रंथालयात अभ्यास करताना समूह चर्चा आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असते. याशिवाय विविध उपयुक्त पुस्तकेही या ठिकाणी उपलब्ध होत असतात. याशिवाय शहरातील महापालिकेच्या विविध वाचनालयांत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येतात.  वाचनालयात तसे वातावरण उपलब्ध होत असल्याने आजवर सरकारी नोकऱ्यांसाठी विविध विभागांद्वारे घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ ग्रंथालयासह वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यासह देशभरात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे महाविद्यालय, विद्यापीठांसह महापालिकेतील वाचनालयेही बंद झालीत.  वाचनालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास जवळपास बंद झाला. स्पर्धा परीक्षेत समूह चर्चेला अतिशय महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांमधील संवाद जवळपास कमी झाला आहे. तसेच पुस्तक खरेदी बंद असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्‍यक असलेली पुस्तके मिळणे अशक्‍य होत आहे. शिवाय इतर कामे बंद झाल्याने इंटरनेटसाठी आवश्‍यक असलेला पैसे नसल्यानेही विद्यार्थ्यांवर मर्यादा आल्या आहेत.  परीक्षा लांबणीवर  देशात भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्टाफ सिलेक्‍शन बोर्ड, रेल्वेतील एनटीपीसी ग्रुप डीसह इतर स्पर्धात्मक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. याशिवाय राज्यातही सध्या भरती प्रक्रिया जवळपास बंद आहे. यामुळेही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मूड गेला आहे. यात टाळेबंदीमुळे समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे.  शहरातील प्रमुख ग्रथांलय आणि वाचनालय  नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, राममनोहर लोहिया वाचनालय, राष्ट्रीय वाचनालय, बाजीराव साखरे, कुंदनलाल शाह वाचनालय, जिल्हा वाचनालय.  हेही वाचा : नक्षलवादी असल्याचे सांगून ते सर्रास लुटायचे प्रवाशांना! नेमके ते होते कोण? विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर टाच  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एकीकडे ऑनलाइन शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असले, तरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो तरुणांना या वातावरणाचा मोठा फटका बसतो आहे. टाळेबंदीमुळे शहरातील प्रमुख ग्रंथालये आणि वाचनालये बंद झाल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरच टाच आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.    देशाची बिघडती अर्थव्यवस्था आणि देशात होणारे खासगीकरण यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बाजारात जरी गर्दी दिसून आली, तरीही शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे वाचनालय आणि अभ्यासिका सध्या बंद आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाचे वातावरण जवळपास नाहीसे झाले आहे.  -सुबोध चहांदे  स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थी  संपादन : मेघराज मेश्राम  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 11, 2020

या कारणाने बुडाला विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास  नागपूर : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयात दररोज शेकडो विद्यार्थी असतात. या ग्रंथालयात अभ्यास करताना समूह चर्चा आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन मिळत असते. याशिवाय विविध उपयुक्त पुस्तकेही या ठिकाणी उपलब्ध होत असतात. याशिवाय शहरातील महापालिकेच्या विविध वाचनालयांत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी येतात.  वाचनालयात तसे वातावरण उपलब्ध होत असल्याने आजवर सरकारी नोकऱ्यांसाठी विविध विभागांद्वारे घेण्यात येत असलेल्या परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ ग्रंथालयासह वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, मार्च महिन्यापासून राज्यासह देशभरात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे महाविद्यालय, विद्यापीठांसह महापालिकेतील वाचनालयेही बंद झालीत.  वाचनालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास जवळपास बंद झाला. स्पर्धा परीक्षेत समूह चर्चेला अतिशय महत्त्व असल्याने विद्यार्थ्यांमधील संवाद जवळपास कमी झाला आहे. तसेच पुस्तक खरेदी बंद असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्‍यक असलेली पुस्तके मिळणे अशक्‍य होत आहे. शिवाय इतर कामे बंद झाल्याने इंटरनेटसाठी आवश्‍यक असलेला पैसे नसल्यानेही विद्यार्थ्यांवर मर्यादा आल्या आहेत.  परीक्षा लांबणीवर  देशात भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या स्टाफ सिलेक्‍शन बोर्ड, रेल्वेतील एनटीपीसी ग्रुप डीसह इतर स्पर्धात्मक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. याशिवाय राज्यातही सध्या भरती प्रक्रिया जवळपास बंद आहे. यामुळेही विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मूड गेला आहे. यात टाळेबंदीमुळे समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे.  शहरातील प्रमुख ग्रथांलय आणि वाचनालय  नागपूर विद्यापीठ ग्रंथालय, राममनोहर लोहिया वाचनालय, राष्ट्रीय वाचनालय, बाजीराव साखरे, कुंदनलाल शाह वाचनालय, जिल्हा वाचनालय.  हेही वाचा : नक्षलवादी असल्याचे सांगून ते सर्रास लुटायचे प्रवाशांना! नेमके ते होते कोण? विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर टाच  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत एकीकडे ऑनलाइन शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत असले, तरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो तरुणांना या वातावरणाचा मोठा फटका बसतो आहे. टाळेबंदीमुळे शहरातील प्रमुख ग्रंथालये आणि वाचनालये बंद झाल्याने या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरच टाच आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.    देशाची बिघडती अर्थव्यवस्था आणि देशात होणारे खासगीकरण यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. बाजारात जरी गर्दी दिसून आली, तरीही शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारे वाचनालय आणि अभ्यासिका सध्या बंद आहेत. त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासाचे वातावरण जवळपास नाहीसे झाले आहे.  -सुबोध चहांदे  स्पर्धात्मक परीक्षा विद्यार्थी  संपादन : मेघराज मेश्राम  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gP6spj

No comments:

Post a Comment