'तुला कोरोना झाला... आता तू माझ्याजवळ येऊ नकोस...' पतीने घेतला हा टोकाचा निर्णय... नागपूर : बिमारी से लढो बिमार से नही... कुणालाही फोन लावला की, सर्वात आधी फोनवर ही कळकळीची विनंती ऐकायला मिळते. अशी विनंती करायची वेळ का आली कारण... समाजात कोरोनाबाधितांना वाळीत टाकण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. महिला आयोगाच्या हेल्पलाईनवर आलेल्या एका कॉलमध्ये कोरोना झाल्यामुळे पती पत्नीला स्वीकारण्यास तयार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तुला कोरोना झालाय, तू माझ्यासोबत राहिली तर मलाही कोरोना होणार म्हणून तू माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्या घरातही येऊ नकोस असे सांगून बायकोला नकारणाऱ्या नवऱ्याचं समुपदेशन सुरू आहे. समाजात अजूनही काही लोकांचा आजारी व्यक्‍तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या एचआयव्ही आजारानेही समाजात सर्वांना संशयाच्या दृष्टीने पाहिले जात होते. आता, कोरोनामुळेही नातेसंबंध दुरावल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे.  हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य   नैराश्‍य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे. कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भीतीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडील गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शारीरिक आरोग्य राखण्यासह जगण्यासाठीही संघर्ष सुरू आहे. समाजातील अनेकांनी बदलेले हे वातावरण आत्मसात करत आपली "रुटीन लाईफ' सुरू केली आहे. बहुतांश जणांना मात्र ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. कोरोना आजार आपल्याला होऊ नये यासाठी अनेक जण धडपड करीत असले तरी, यात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, नवरा बायको, नातेवाईक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे समुपदेशकांनी सांगितले.    ज्येष्ठ नागरिकांची हेटाळणी  कोरोना विषाणूचा ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याने, कुटुंबातील व्यक्तींकडून ज्येष्ठांची सर्वाधिक हेटाळणी होताना दिसते. विशेषतः ज्येष्ठांना साधा सर्दी, खोकलाही झाला तर त्यांच्यापासून अंतर राखून वागणे, त्यांच्याशी संवाद बंद करणे किंवा त्यांना एकांतात ठेवणे हे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी संबंधित ज्येष्ठांसह कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करण्याचे काम समुपदेशक करीत आहेत.    भीतीचे पेशंट अधिक  कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना लोक घाबरत आहेत. यातून कोरोनाचे नव्हे तर भीतीचे पेशंट वाढत आहेत. प्रत्यक्षात कोरोनाचा मृत्युदर अतिशय कमी आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ला कामात गुंतवून घ्यावे. कितीही अडचण असली तरी येणाऱ्या काळात ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगायला शिकण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.    सर्वच नातेसंबंधांवर परिणाम  गेल्या दहा वर्षांपासून मी नागपूर शहरात समुपदेशकाचे काम करीत आहे. परंतु, कोरोनामुळे जितके लोक घाबरल्याचे दिसते तितके कधीच पाहायला मिळाले नाही. कोरोनामुळे नवरा-बायको, आई-वडील, शेजारी, नातेवाईक या सर्वच नातेसंबंधांवर परिणाम झाला आहे. लोक अधिक स्वार्थी वागायला लागले आहेत. दुसऱ्याला काहीही झाले तरी, चालेल पण मला काही व्हायला नको ही भावना वाढल्याचे दिसते.  ऍड. शालिनी सक्‍सेना, समुपदेशक    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 8, 2020

'तुला कोरोना झाला... आता तू माझ्याजवळ येऊ नकोस...' पतीने घेतला हा टोकाचा निर्णय... नागपूर : बिमारी से लढो बिमार से नही... कुणालाही फोन लावला की, सर्वात आधी फोनवर ही कळकळीची विनंती ऐकायला मिळते. अशी विनंती करायची वेळ का आली कारण... समाजात कोरोनाबाधितांना वाळीत टाकण्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. महिला आयोगाच्या हेल्पलाईनवर आलेल्या एका कॉलमध्ये कोरोना झाल्यामुळे पती पत्नीला स्वीकारण्यास तयार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  तुला कोरोना झालाय, तू माझ्यासोबत राहिली तर मलाही कोरोना होणार म्हणून तू माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्या घरातही येऊ नकोस असे सांगून बायकोला नकारणाऱ्या नवऱ्याचं समुपदेशन सुरू आहे. समाजात अजूनही काही लोकांचा आजारी व्यक्‍तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या एचआयव्ही आजारानेही समाजात सर्वांना संशयाच्या दृष्टीने पाहिले जात होते. आता, कोरोनामुळेही नातेसंबंध दुरावल्याचे निरीक्षण समुपदेशकांनी नोंदविले आहे.  हुंडा दिला नाही म्हणून तो पत्नीशी करायचा अनैसर्गिक कृत्य   नैराश्‍य आणि भविष्याची काळजी असे एक भयावह वातावरणाचे काहूर निर्माण झाले आहे. कोरोना या आजारापेक्षा त्याच्या भीतीने जास्त लोक प्रभावित झाले असून, मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांकडील गर्दी वाढली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शारीरिक आरोग्य राखण्यासह जगण्यासाठीही संघर्ष सुरू आहे. समाजातील अनेकांनी बदलेले हे वातावरण आत्मसात करत आपली "रुटीन लाईफ' सुरू केली आहे. बहुतांश जणांना मात्र ही नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. कोरोना आजार आपल्याला होऊ नये यासाठी अनेक जण धडपड करीत असले तरी, यात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, नवरा बायको, नातेवाईक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे समुपदेशकांनी सांगितले.    ज्येष्ठ नागरिकांची हेटाळणी  कोरोना विषाणूचा ज्येष्ठ नागरिकांना अधिक धोका असल्याने, कुटुंबातील व्यक्तींकडून ज्येष्ठांची सर्वाधिक हेटाळणी होताना दिसते. विशेषतः ज्येष्ठांना साधा सर्दी, खोकलाही झाला तर त्यांच्यापासून अंतर राखून वागणे, त्यांच्याशी संवाद बंद करणे किंवा त्यांना एकांतात ठेवणे हे प्रकार वाढले आहेत. अशा वेळी संबंधित ज्येष्ठांसह कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करण्याचे काम समुपदेशक करीत आहेत.    भीतीचे पेशंट अधिक  कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अगदी छोट्या-छोट्या गोष्टींना लोक घाबरत आहेत. यातून कोरोनाचे नव्हे तर भीतीचे पेशंट वाढत आहेत. प्रत्यक्षात कोरोनाचा मृत्युदर अतिशय कमी आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वत:ला कामात गुंतवून घ्यावे. कितीही अडचण असली तरी येणाऱ्या काळात ही परिस्थिती नक्कीच बदलणार आहे, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगायला शिकण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.    सर्वच नातेसंबंधांवर परिणाम  गेल्या दहा वर्षांपासून मी नागपूर शहरात समुपदेशकाचे काम करीत आहे. परंतु, कोरोनामुळे जितके लोक घाबरल्याचे दिसते तितके कधीच पाहायला मिळाले नाही. कोरोनामुळे नवरा-बायको, आई-वडील, शेजारी, नातेवाईक या सर्वच नातेसंबंधांवर परिणाम झाला आहे. लोक अधिक स्वार्थी वागायला लागले आहेत. दुसऱ्याला काहीही झाले तरी, चालेल पण मला काही व्हायला नको ही भावना वाढल्याचे दिसते.  ऍड. शालिनी सक्‍सेना, समुपदेशक    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38CC1jg

No comments:

Post a Comment