लॉकडाउनमुळे वस्त्रनगरीवर परत झाला `हा` परीणाम.. इचलकरंजी - लॉकडाउनमुळे शहरातील 75 टक्के यंत्रमागांची पुन्हा धडधड थांबली आहे. प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करीत फक्त 25 टक्के यंत्रमाग सुरू झाले आहेत. मंदीमुळे अडचणीतून जात असलेल्या यंत्रमाग उद्योगाची कोरोनामुळे आणखी फरफट सुरूच आहे. त्यामुळे या उद्योगात सध्या अस्वस्थता आहे. दोन-तीन वर्षांपासून यंत्रमाग उद्योग अडचणीत जात आहे. विविध प्रश्‍न उद्योगासमोर आहेत. त्यातून मार्गक्रमण करीत उद्योगाची वाटचाल सुरू आहे. अनेकवेळा उद्योजकांना फटका सहन करावा लागला आहे. आज ना उद्या उद्योग सुरळीत होईल, या आशेवर यंत्रमाग उद्योजक धडपडत आहेत, पण कोरोनामुळे उद्योजक आणखी अडचणीत येताना दिसत आहेत. अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परतले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकांनी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा फारसा संसर्ग नसल्यामुळे यंत्रमाग उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होता, मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यंत्रमाग उद्योगाला जबरदस्त फटका बसत आहे. हेही वाचा - स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर दूध आंदोलन करणारच ; आंदोलन मोडीत काढण्याचा 'तो' डाव... शहरात सर्वत्र कंटेन्मेंट झोन झाले आहेत. त्यामुळे अनेकांना यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी करण्याची मागणी यंत्रमाग उद्योगातून केली आहे, पण अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी झाला, तर अनेक यंत्रमाग उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, मात्र हे कारखाने सुरू करताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याचाही दक्षता घेणे पूर्वानुभव पाहता अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग शहरातील सर्वच भागांत पसरत आहे. त्यामुळे आता धोकाही वाढत चालला आहे. हेही वाचा- राज्यातल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच 'हे' कारण सांगितले मंत्री हसन मुश्रीफांनी... दरम्यान, संसर्ग वाढत असताना स्थानिक नियंत्रण समितीने सात दिवस लॉकडाउन जाहीर केले. या काळातही यंत्रमाग उद्योग बंद ठेवला. त्यांनतर पुन्हा यंत्रमाग उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पुन्हा जिल्हा पातळीवरून सात दिवसांचा 100 टक्के लॉकडाउन जाहीर केला. त्याला आजपासून सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने यंत्रमाग उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे, पण केवळ 25 टक्केच यंत्रमाग सुरू झाले आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातही यंत्रमाग उद्योग बंद ठेवले आहेत. जेथे कामगारांची निवासाची व्यवस्था आहे, असे यंत्रमाग उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये ऑटोलूम कारखान्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय काही खर्चीवाले यंत्रमागधारकांनीही कारखाने सुरू केले आहेत, पण 75 टक्के यंत्रमागांची धडधड लॉकडाउनमुळे तूर्तास तरी थांबली आहे.   यंत्रमाग उद्योग दृष्टिक्षेप साधे माग - 1 लाख ऑटोलूम - 20 हजार एकूण कामगार - 60 हजार सध्या कार्यरत कामगार - 25 हजार संपादन - अमरसिंह घोरपडे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 20, 2020

लॉकडाउनमुळे वस्त्रनगरीवर परत झाला `हा` परीणाम.. इचलकरंजी - लॉकडाउनमुळे शहरातील 75 टक्के यंत्रमागांची पुन्हा धडधड थांबली आहे. प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करीत फक्त 25 टक्के यंत्रमाग सुरू झाले आहेत. मंदीमुळे अडचणीतून जात असलेल्या यंत्रमाग उद्योगाची कोरोनामुळे आणखी फरफट सुरूच आहे. त्यामुळे या उद्योगात सध्या अस्वस्थता आहे. दोन-तीन वर्षांपासून यंत्रमाग उद्योग अडचणीत जात आहे. विविध प्रश्‍न उद्योगासमोर आहेत. त्यातून मार्गक्रमण करीत उद्योगाची वाटचाल सुरू आहे. अनेकवेळा उद्योजकांना फटका सहन करावा लागला आहे. आज ना उद्या उद्योग सुरळीत होईल, या आशेवर यंत्रमाग उद्योजक धडपडत आहेत, पण कोरोनामुळे उद्योजक आणखी अडचणीत येताना दिसत आहेत. अनेक परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात परतले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनेकांनी उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा फारसा संसर्ग नसल्यामुळे यंत्रमाग उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होता, मात्र कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे यंत्रमाग उद्योगाला जबरदस्त फटका बसत आहे. हेही वाचा - स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर दूध आंदोलन करणारच ; आंदोलन मोडीत काढण्याचा 'तो' डाव... शहरात सर्वत्र कंटेन्मेंट झोन झाले आहेत. त्यामुळे अनेकांना यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी करण्याची मागणी यंत्रमाग उद्योगातून केली आहे, पण अद्याप त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. कंटेन्मेंट झोनचा आकार कमी झाला, तर अनेक यंत्रमाग उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, मात्र हे कारखाने सुरू करताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याचाही दक्षता घेणे पूर्वानुभव पाहता अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा संसर्ग शहरातील सर्वच भागांत पसरत आहे. त्यामुळे आता धोकाही वाढत चालला आहे. हेही वाचा- राज्यातल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच 'हे' कारण सांगितले मंत्री हसन मुश्रीफांनी... दरम्यान, संसर्ग वाढत असताना स्थानिक नियंत्रण समितीने सात दिवस लॉकडाउन जाहीर केले. या काळातही यंत्रमाग उद्योग बंद ठेवला. त्यांनतर पुन्हा यंत्रमाग उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. तोपर्यंत पुन्हा जिल्हा पातळीवरून सात दिवसांचा 100 टक्के लॉकडाउन जाहीर केला. त्याला आजपासून सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने यंत्रमाग उद्योग सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे, पण केवळ 25 टक्केच यंत्रमाग सुरू झाले आहेत. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातही यंत्रमाग उद्योग बंद ठेवले आहेत. जेथे कामगारांची निवासाची व्यवस्था आहे, असे यंत्रमाग उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये ऑटोलूम कारखान्यांची संख्या जास्त आहे. याशिवाय काही खर्चीवाले यंत्रमागधारकांनीही कारखाने सुरू केले आहेत, पण 75 टक्के यंत्रमागांची धडधड लॉकडाउनमुळे तूर्तास तरी थांबली आहे.   यंत्रमाग उद्योग दृष्टिक्षेप साधे माग - 1 लाख ऑटोलूम - 20 हजार एकूण कामगार - 60 हजार सध्या कार्यरत कामगार - 25 हजार संपादन - अमरसिंह घोरपडे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hhtplp

No comments:

Post a Comment