"पिक्‍चर अभी बाकी है!'  चालू आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून "रिलायन्स इंडस्ट्रीज'चे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. गेल्या तीन महिन्यांत दुप्पट झालेल्या या कंपनीच्या शेअरने "राईट्‌स इश्‍यू'चे सर्व विक्रम मोडले. भांडवली बाजारात पैसे उभे करण्याचे "सेबी'चे नियम 22 एप्रिलला बदलताच, युद्धपातळीवर आठ दिवसांत बोर्ड मिटिंग घेऊन, शेअरधारकांकडून 53 हजार कोटी रुपये जमा करण्याचे आव्हान पेलावे तर "रिलायन्स'नेच! त्याखेरीस "फेसबुक'पासून सुरवात करून "गुगल'पर्यंत खासगी गुंतवणुकीचा ओघ "रिलायन्स'कडे वळला. पाहता पाहता दीड लाख कोटी रुपयांच्या वर रक्कम उभी झाली आणि कंपनी कर्जमुक्त झाली. गेल्या तीन महिन्यांत जग आर्थिक व जिवावरच्या संकटात सापडलेले असताना, मुकेश अंबानी मात्र वेगळ्या प्रकारचे "शॉपिंग' करण्यात मग्न होते. त्यातूनच वार्षिक सभेत आधुनिक "जिओ टीव्ही प्लस', "जिओ ग्लास' सादर करण्याची; तसेच स्वत:चे "5 जी' तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा करता आली.  या पार्श्‍वभूमीवर भारतीय गुंतवणूकदार मात्र "घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने या सर्व घटनाक्रमाकडे संशयानेच पाहतो. त्याला पडलेला पहिला प्रश्न - "इतके हुरळून जाण्यासारखे यात काय आहे?' आणि "आता दुप्पट झालेल्या या शेअरचे काय करावे?' हा दुसरा प्रश्न! याचाच थोडा मागोवा घेऊया.  ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप हुरळून जाण्याची कारणे कोणती?  1) भारतात सध्या "डेटा प्रायव्हसी' कायदा नाही. तो सध्याच्या सरकारने प्रस्तावित केला आहे, आज ना उद्या तो होईल. "डेटा' हे उद्याचे कच्चे तेल आहे. 130 कोटी जनतेचा खडानखडा मागोवा त्यातून घेता येईल.  2) चीनच्या हेतूविषयी सर्व जगालाच शंका आहे. त्यातूनच हुवाई कंपनीचे "5 जी' तंत्रज्ञान वापरण्याची अमेरिकेची व आपलीही तयारी नाही. "रिलायन्स' ते आणेल, याचा विश्वास जगाला आहे.  3) पूर्णपणे कर्जमुक्त झाल्यामुळे यासाठी लागणारे भांडवल उभारणीची क्षमता "रिलायन्स'कडे आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 4) आपण सारे मिळून भारतीय बाजापेठ काबीज करू, हे "रिलायन्स'चे धोरण जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांना पटले आहे.  5) लक्षावधी किराणा दुकानदारांना बरोबर घेऊन "जिओ मार्ट'चे ऑनलाईन व ऑफलाईन मॉडेल वर्षभरात उभे राहू शकते.  6) किफायतशीर किमतीत स्मार्ट फोनही "रिलायन्स' आणणार आहे. स्वत:चे 5 जी तंत्रज्ञान, फोन आणि प्लॅटफॉर्म या एकत्रित संयोजनाला तोड नाही.  7) "रिलायन्स जिओ' आणि "रिलायन्स रिटेल' हे भविष्यात स्वतंत्रपणे भांडवली बाजारात येऊ शकतात.  8) पुढील दोन वर्षांत "रिलायन्स'चे अर्निंग पर शेअर (इपीएस) 66 रुपयांवरून 93 रुपये होण्याचा अंदाज आहे.  शेअरचे काय करावे?  प्रत्येक पडत्या भावात हा शेअर घेत राहिला पाहिजे. नफावसुलासाठी आज विक्रीचा मोह होणे साहजिकच आहे, पण विकल्यास पुन्हा घेण्याची संधी शोधत राहावी. कारण, "दोस्तों, पिक्‍चर अभी बाकी है!'  (लेखक शेअर बाजाराचे विश्‍लेषक आहेत.)  (डिस्क्‍लेमर - शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत-च्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 19, 2020

"पिक्‍चर अभी बाकी है!'  चालू आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून "रिलायन्स इंडस्ट्रीज'चे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे. गेल्या तीन महिन्यांत दुप्पट झालेल्या या कंपनीच्या शेअरने "राईट्‌स इश्‍यू'चे सर्व विक्रम मोडले. भांडवली बाजारात पैसे उभे करण्याचे "सेबी'चे नियम 22 एप्रिलला बदलताच, युद्धपातळीवर आठ दिवसांत बोर्ड मिटिंग घेऊन, शेअरधारकांकडून 53 हजार कोटी रुपये जमा करण्याचे आव्हान पेलावे तर "रिलायन्स'नेच! त्याखेरीस "फेसबुक'पासून सुरवात करून "गुगल'पर्यंत खासगी गुंतवणुकीचा ओघ "रिलायन्स'कडे वळला. पाहता पाहता दीड लाख कोटी रुपयांच्या वर रक्कम उभी झाली आणि कंपनी कर्जमुक्त झाली. गेल्या तीन महिन्यांत जग आर्थिक व जिवावरच्या संकटात सापडलेले असताना, मुकेश अंबानी मात्र वेगळ्या प्रकारचे "शॉपिंग' करण्यात मग्न होते. त्यातूनच वार्षिक सभेत आधुनिक "जिओ टीव्ही प्लस', "जिओ ग्लास' सादर करण्याची; तसेच स्वत:चे "5 जी' तंत्रज्ञान विकसित केल्याची घोषणा करता आली.  या पार्श्‍वभूमीवर भारतीय गुंतवणूकदार मात्र "घर की मुर्गी दाल बराबर' या न्यायाने या सर्व घटनाक्रमाकडे संशयानेच पाहतो. त्याला पडलेला पहिला प्रश्न - "इतके हुरळून जाण्यासारखे यात काय आहे?' आणि "आता दुप्पट झालेल्या या शेअरचे काय करावे?' हा दुसरा प्रश्न! याचाच थोडा मागोवा घेऊया.  ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप हुरळून जाण्याची कारणे कोणती?  1) भारतात सध्या "डेटा प्रायव्हसी' कायदा नाही. तो सध्याच्या सरकारने प्रस्तावित केला आहे, आज ना उद्या तो होईल. "डेटा' हे उद्याचे कच्चे तेल आहे. 130 कोटी जनतेचा खडानखडा मागोवा त्यातून घेता येईल.  2) चीनच्या हेतूविषयी सर्व जगालाच शंका आहे. त्यातूनच हुवाई कंपनीचे "5 जी' तंत्रज्ञान वापरण्याची अमेरिकेची व आपलीही तयारी नाही. "रिलायन्स' ते आणेल, याचा विश्वास जगाला आहे.  3) पूर्णपणे कर्जमुक्त झाल्यामुळे यासाठी लागणारे भांडवल उभारणीची क्षमता "रिलायन्स'कडे आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 4) आपण सारे मिळून भारतीय बाजापेठ काबीज करू, हे "रिलायन्स'चे धोरण जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांना पटले आहे.  5) लक्षावधी किराणा दुकानदारांना बरोबर घेऊन "जिओ मार्ट'चे ऑनलाईन व ऑफलाईन मॉडेल वर्षभरात उभे राहू शकते.  6) किफायतशीर किमतीत स्मार्ट फोनही "रिलायन्स' आणणार आहे. स्वत:चे 5 जी तंत्रज्ञान, फोन आणि प्लॅटफॉर्म या एकत्रित संयोजनाला तोड नाही.  7) "रिलायन्स जिओ' आणि "रिलायन्स रिटेल' हे भविष्यात स्वतंत्रपणे भांडवली बाजारात येऊ शकतात.  8) पुढील दोन वर्षांत "रिलायन्स'चे अर्निंग पर शेअर (इपीएस) 66 रुपयांवरून 93 रुपये होण्याचा अंदाज आहे.  शेअरचे काय करावे?  प्रत्येक पडत्या भावात हा शेअर घेत राहिला पाहिजे. नफावसुलासाठी आज विक्रीचा मोह होणे साहजिकच आहे, पण विकल्यास पुन्हा घेण्याची संधी शोधत राहावी. कारण, "दोस्तों, पिक्‍चर अभी बाकी है!'  (लेखक शेअर बाजाराचे विश्‍लेषक आहेत.)  (डिस्क्‍लेमर - शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वत-च्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hiq1Xu

No comments:

Post a Comment