तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण...  तळेगाव स्टेशन (पुणे) : जागतिक स्तरावर दुर्मिळ होत चाललेल्या माशांच्या प्रजातींपैकीच स्पोर्टस् फिश म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या महाशीर माशाचे जनुकीय प्रजनन आणि सजीव जनुकीय संग्रह साध्य करणारा तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था संचालित प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे. इंद्रायणीत बुडालेल्या तुकोबांच्या गाथा तरंगत वर आल्या हा कुठलाही दैवी चमत्कार नसून महाशीर माशांनी गाथा वर आणल्याची आख्यायिका आहे. वारकरी सांप्रदायात महाशीरला गोड्या पाण्यातील देव मासा किंवा म्हसाळ्या देखील म्हणतात. महाराष्ट्रातील काळ, सावित्री, भीमेसह इंद्रायणीसह कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील तीर्थक्षेत्रीच्या नद्यांमध्येच महाशीर मासा आढळतो. मात्र, काळानुरुप वाढत चाललेले नद्यांचे प्रदुषण, नदीवरील बांधलेल्या धरणांमुळे महाशीर मासे नामशेष होत आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययुसीएन) महाशीरच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाशीर जलचर परिसंस्थेच्या आरोग्याचे जैव निर्देशांकाचे सूचक ठरतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आशिया खंडातील एकमेव मुंबईतील वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली महाशीर माशाच्या संवर्धनासाठी 2010 मध्ये तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस् ऑफ नेचर या सेवाभाशी संस्थेने यशवंतनगरमध्ये हा महाशीर संवर्धन प्रकल्प उभारला होता. कृत्रिम प्रजनन पद्धतीने महाशीर माशांचे यशस्वी प्रजनन करणारी ही बहुदा एकमेव सेवाभावी संस्था ठरली. 2015 मध्ये महाशीर मॅन ऑफ इंडिया डॉ. शशांक ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली साठ हजारांहून अधिक पिल्लांचे संगोपन करून फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून इंद्रायणीत पुन्हा महाशीर माशांचे यशश्वीपणे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठीच्या हा प्रकल्प आदर्श ठरावा असाच आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाकडून संस्थेला या प्रकल्पासाठी महाशीरचे खाद्य, औषधे आणि इतर साधनसामुग्री अनुदान स्वरुपात मिळाली होते. आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...' देहुतील गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीच्या मत्स्य डोहामध्ये महाशीर माशाचे बीजारोपण यशश्वी झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंदच आहे. इंद्रायणी नदीच्या धर्तीवर राज्यातील इतर नद्यांमध्ये मत्स्य बीजारोपण केल्यास महाशीरचे अस्तित्व टिकवून मासेमारीवर अवलंबून असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या आर्थिक विकालाही हातभार लागू शकेल. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून तळेगाव दाभाडे येथील या प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त झाल्यास या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी देखील हा प्रकल्प पुरक ठरणार असल्याचा विश्वास प्रकल्पाचे समन्वयक तथा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते महेश महाजन यांनी व्यक्त केला. वन्यजीव टिकवण्यासाठी जसे वाघांचे संवर्धन आवश्यक आहे. तसेच, गोड्या पाण्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महाशीर माशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. - रोहित नागलगाव, निसर्ग अभ्यासक Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/2OiRXxL - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 11, 2020

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण...  तळेगाव स्टेशन (पुणे) : जागतिक स्तरावर दुर्मिळ होत चाललेल्या माशांच्या प्रजातींपैकीच स्पोर्टस् फिश म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोड्या पाण्यातील सर्वात मोठ्या महाशीर माशाचे जनुकीय प्रजनन आणि सजीव जनुकीय संग्रह साध्य करणारा तळेगाव दाभाडे येथील फ्रेंड्स ऑफ नेचर संस्था संचालित प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या प्रतीक्षेत आहे. इंद्रायणीत बुडालेल्या तुकोबांच्या गाथा तरंगत वर आल्या हा कुठलाही दैवी चमत्कार नसून महाशीर माशांनी गाथा वर आणल्याची आख्यायिका आहे. वारकरी सांप्रदायात महाशीरला गोड्या पाण्यातील देव मासा किंवा म्हसाळ्या देखील म्हणतात. महाराष्ट्रातील काळ, सावित्री, भीमेसह इंद्रायणीसह कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील तीर्थक्षेत्रीच्या नद्यांमध्येच महाशीर मासा आढळतो. मात्र, काळानुरुप वाढत चाललेले नद्यांचे प्रदुषण, नदीवरील बांधलेल्या धरणांमुळे महाशीर मासे नामशेष होत आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने (आययुसीएन) महाशीरच्या घटत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाशीर जलचर परिसंस्थेच्या आरोग्याचे जैव निर्देशांकाचे सूचक ठरतात. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आशिया खंडातील एकमेव मुंबईतील वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय शिक्षण विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली महाशीर माशाच्या संवर्धनासाठी 2010 मध्ये तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस् ऑफ नेचर या सेवाभाशी संस्थेने यशवंतनगरमध्ये हा महाशीर संवर्धन प्रकल्प उभारला होता. कृत्रिम प्रजनन पद्धतीने महाशीर माशांचे यशस्वी प्रजनन करणारी ही बहुदा एकमेव सेवाभावी संस्था ठरली. 2015 मध्ये महाशीर मॅन ऑफ इंडिया डॉ. शशांक ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली साठ हजारांहून अधिक पिल्लांचे संगोपन करून फ्रेंड्स ऑफ नेचरच्या माध्यमातून इंद्रायणीत पुन्हा महाशीर माशांचे यशश्वीपणे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. गोड्या पाण्यातील माशांच्या संवर्धनासाठीच्या हा प्रकल्प आदर्श ठरावा असाच आहे. हैदराबाद येथील राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाकडून संस्थेला या प्रकल्पासाठी महाशीरचे खाद्य, औषधे आणि इतर साधनसामुग्री अनुदान स्वरुपात मिळाली होते. आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...' देहुतील गाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीच्या मत्स्य डोहामध्ये महाशीर माशाचे बीजारोपण यशश्वी झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प बंदच आहे. इंद्रायणी नदीच्या धर्तीवर राज्यातील इतर नद्यांमध्ये मत्स्य बीजारोपण केल्यास महाशीरचे अस्तित्व टिकवून मासेमारीवर अवलंबून असलेल्या आदिवासी कातकरी समाजाच्या आर्थिक विकालाही हातभार लागू शकेल. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून तळेगाव दाभाडे येथील या प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त झाल्यास या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी देखील हा प्रकल्प पुरक ठरणार असल्याचा विश्वास प्रकल्पाचे समन्वयक तथा पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते महेश महाजन यांनी व्यक्त केला. वन्यजीव टिकवण्यासाठी जसे वाघांचे संवर्धन आवश्यक आहे. तसेच, गोड्या पाण्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महाशीर माशाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. - रोहित नागलगाव, निसर्ग अभ्यासक Edited by : Shivnandan Baviskar News Story Feeds https://ift.tt/2OiRXxL


via News Story Feeds https://ift.tt/300JeG3

No comments:

Post a Comment