पेंच, ताडोबा पुन्हा सेवेत, एवढ्या पर्यटकांनी घेतला पहिल्या दिवशी आनंद नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील टाळेबंदीमुळे तब्बल 105 दिवस बंद असलेल्या पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी उघडण्यात आले. पेंचमधील सुरेवाणी, नागलवाडी, कऱ्हांडला प्रवेशद्वारापैकी केवळ एकच प्रवेशद्वारातून दोन वाहनांतून सहा पर्यटकांनी तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारापैकी दोन प्रवेशद्वारातून 22 निसर्गप्रेमींनी सफारी केली. निसर्ग पर्यटनाला नियमित जात असलो तरी आज मात्र, प्रथमच निसर्ग पर्यटनाला जाताना भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली.  पेंच व्याघ्र प्रकल्पात नियमित वाघाचे दर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा असतो. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि 18 मार्चपासून पेंच व उमरेड-कऱ्हाडला अभयारण्य एनटीसीएच्या निर्देशानुसार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला मोठा फटका बसला. परिसराती रिसॉर्ट, जिप्सीचालक, गाईडचा रोजगार गेला. त्यामुळे हे पर्यटन सुरू करावे अशी मागणी होत होती.  'पैसे वापस चाहिये या जान', अशी धमकी द्यायचा शिवसेनेचा शहरप्रमुख; वाचा कच्चाचिठ्ठा वनमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेत आजपासून पर्यटन सुरू करण्याचे निर्देश दिले आणि पर्यटनाचा श्रीगणेशा झाला. पर्यटन करताना सुरेवाणी प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या हस्ते फित कापून वाहनाला प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी या वाहनांना निर्जंतुक करण्यात आले. सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अशा सहा पर्यटकांनी पहिल्या दिवशी भेट दिली. पर्यटक नागपुरातील होते.  ताडोबात 22 पर्यटक  बफर झोनमधील 13 प्रवेशद्वार खुले करण्यात आले. यात आगरझरी, देवाळा, कोलारा, मदनापूर, शिरकाळा, पांगडी, अलिझंझा, नवेगाव, कसलाघाट, झरीपेठ, नवगाव आणि रामदेगी या प्रवेशद्वारांचा समावेश आहे. मात्र, आज सफारीला आगरझरी आणि कोलारा प्रवेशद्वार वगळता एकही प्रवेशद्वार पर्यटन न आल्याने उघडले नाही. या दोन प्रवेशद्वारातून केवळ पाच जिप्सी आत गेल्या. सफारीत 22 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातही एक नागपूरचा पर्यटक वगळता सर्व पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते.   कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाची सुविधा उत्तम  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निसर्ग पर्यटन बंद होते, हे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे होते. दरवर्षी उन्हाळ्यात निसर्ग पर्यटनासाठी नियमित जात असतो. आज प्रथमच मनात भीती बाळगून निसर्ग पर्यटनाला गेलो. निसर्गाचा आनंद लुटला अशी भावना पर्यटकांनी सांगितले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने केलेली सुविधा उत्तम आहे.  प्रेम कटरे, पर्यटक   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 1, 2020

पेंच, ताडोबा पुन्हा सेवेत, एवढ्या पर्यटकांनी घेतला पहिल्या दिवशी आनंद नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील टाळेबंदीमुळे तब्बल 105 दिवस बंद असलेल्या पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी उघडण्यात आले. पेंचमधील सुरेवाणी, नागलवाडी, कऱ्हांडला प्रवेशद्वारापैकी केवळ एकच प्रवेशद्वारातून दोन वाहनांतून सहा पर्यटकांनी तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 13 प्रवेशद्वारापैकी दोन प्रवेशद्वारातून 22 निसर्गप्रेमींनी सफारी केली. निसर्ग पर्यटनाला नियमित जात असलो तरी आज मात्र, प्रथमच निसर्ग पर्यटनाला जाताना भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली.  पेंच व्याघ्र प्रकल्पात नियमित वाघाचे दर्शन होत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा असतो. यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो. मात्र, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि 18 मार्चपासून पेंच व उमरेड-कऱ्हाडला अभयारण्य एनटीसीएच्या निर्देशानुसार पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला मोठा फटका बसला. परिसराती रिसॉर्ट, जिप्सीचालक, गाईडचा रोजगार गेला. त्यामुळे हे पर्यटन सुरू करावे अशी मागणी होत होती.  'पैसे वापस चाहिये या जान', अशी धमकी द्यायचा शिवसेनेचा शहरप्रमुख; वाचा कच्चाचिठ्ठा वनमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेत आजपासून पर्यटन सुरू करण्याचे निर्देश दिले आणि पर्यटनाचा श्रीगणेशा झाला. पर्यटन करताना सुरेवाणी प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या हस्ते फित कापून वाहनाला प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी या वाहनांना निर्जंतुक करण्यात आले. सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अशा सहा पर्यटकांनी पहिल्या दिवशी भेट दिली. पर्यटक नागपुरातील होते.  ताडोबात 22 पर्यटक  बफर झोनमधील 13 प्रवेशद्वार खुले करण्यात आले. यात आगरझरी, देवाळा, कोलारा, मदनापूर, शिरकाळा, पांगडी, अलिझंझा, नवेगाव, कसलाघाट, झरीपेठ, नवगाव आणि रामदेगी या प्रवेशद्वारांचा समावेश आहे. मात्र, आज सफारीला आगरझरी आणि कोलारा प्रवेशद्वार वगळता एकही प्रवेशद्वार पर्यटन न आल्याने उघडले नाही. या दोन प्रवेशद्वारातून केवळ पाच जिप्सी आत गेल्या. सफारीत 22 पर्यटकांचा समावेश आहे. त्यातही एक नागपूरचा पर्यटक वगळता सर्व पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते.   कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वनविभागाची सुविधा उत्तम  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निसर्ग पर्यटन बंद होते, हे सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे होते. दरवर्षी उन्हाळ्यात निसर्ग पर्यटनासाठी नियमित जात असतो. आज प्रथमच मनात भीती बाळगून निसर्ग पर्यटनाला गेलो. निसर्गाचा आनंद लुटला अशी भावना पर्यटकांनी सांगितले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने केलेली सुविधा उत्तम आहे.  प्रेम कटरे, पर्यटक   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CUzp4w

No comments:

Post a Comment