शेतकऱ्यांचा कल `बाहुबली`कडे! काय आहे ही शेती? वाचा... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्‍यात मोठी मागणी असलेल्या "सुवर्णा' भाताच्या बियाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी आपला कल "बाहुबली' बियाण्याकडे वळविला असून नांगरणीची कामे पूर्णत्वास आल्याने पेरणीच्या व लावणीच्या कामांना वेग आला आहे.  तालुक्‍यात मेच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. गेले कित्येक दिवस शेतकरी शेतात कंबर कसून राबत आहेत. नांगरणी 100 टक्के पूर्ण झाली असून आता पेराणीच्या आणि लावणीच्या कामांना जोर आला आहे. त्यामुळे भात बियाणे गोळा करण्याची लगबगही वाढली आहे.  लॉकडाउन असल्यामुळे भाताच्या बियाणांची कमतरता भासणार असल्याची खात्री शेतकऱ्यांना होती; परंतु प्रशासनाकडून आवश्‍यक ती बियाणी पुरविण्यात येतील, असा विश्‍वासही होता. मात्र, जून उजाडला तरी बहुतांश शेतकऱ्यांना मागणी असलेले "सुवर्णा' बियाणे मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली.  जया, कोमल, प्रसन्ना, रुचिका, अस्मिता, लीडर, विश्‍वा, सुप्रिमसोना, चिंटू, कावेरा सोना, वैष्णवी, मधुमती, पार्वती, मोहिनी, सिल्की, शुभांगी, बाहुबली, श्रीलता, कस्तुरी अशा बियाण्यांचा फलक तालुकास्तरावरील कृषी केंद्रावर लावले आहेत; परंतु ज्या बियाण्याची मागणी जास्त आहे, असे सुवर्णा बियाणे कुठेही असल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे नव्याने शेतीत उतरलेल्या युवक वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे.  अनुदानाची मागणी  बाजारात नवीन आलेल्या "बाहुबली' बियाण्याचा प्रयोग करून पाहण्याचा मानसही काही युवा शेतकऱ्यांनी दाखविला. शेतकऱ्याच्या डोक्‍यावर निसर्गाचे संकटही कायम असते. अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा मार झेलत तो इतरही संकटे झेलतो. महागाई वाढल्यास सर्वच वस्तूंचे भाव वाढतात; पण शेतीमालाचे त्या प्रमाणात वाढत नाहीत. उलट शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, फवारणी व मजुरी असे सर्वच महाग झालेले असते. शेतीचा वाढता खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शेतीसाठी अनुदानाची मागणीही होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 7, 2020

शेतकऱ्यांचा कल `बाहुबली`कडे! काय आहे ही शेती? वाचा... सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्‍यात मोठी मागणी असलेल्या "सुवर्णा' भाताच्या बियाण्याची कमतरता असल्याने शेतकऱ्यांनी आपला कल "बाहुबली' बियाण्याकडे वळविला असून नांगरणीची कामे पूर्णत्वास आल्याने पेरणीच्या व लावणीच्या कामांना वेग आला आहे.  तालुक्‍यात मेच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली; परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतीच्या कामांना आणखी वेग आला आहे. गेले कित्येक दिवस शेतकरी शेतात कंबर कसून राबत आहेत. नांगरणी 100 टक्के पूर्ण झाली असून आता पेराणीच्या आणि लावणीच्या कामांना जोर आला आहे. त्यामुळे भात बियाणे गोळा करण्याची लगबगही वाढली आहे.  लॉकडाउन असल्यामुळे भाताच्या बियाणांची कमतरता भासणार असल्याची खात्री शेतकऱ्यांना होती; परंतु प्रशासनाकडून आवश्‍यक ती बियाणी पुरविण्यात येतील, असा विश्‍वासही होता. मात्र, जून उजाडला तरी बहुतांश शेतकऱ्यांना मागणी असलेले "सुवर्णा' बियाणे मिळाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली.  जया, कोमल, प्रसन्ना, रुचिका, अस्मिता, लीडर, विश्‍वा, सुप्रिमसोना, चिंटू, कावेरा सोना, वैष्णवी, मधुमती, पार्वती, मोहिनी, सिल्की, शुभांगी, बाहुबली, श्रीलता, कस्तुरी अशा बियाण्यांचा फलक तालुकास्तरावरील कृषी केंद्रावर लावले आहेत; परंतु ज्या बियाण्याची मागणी जास्त आहे, असे सुवर्णा बियाणे कुठेही असल्याचे निदर्शनास आले नाही. त्यामुळे नव्याने शेतीत उतरलेल्या युवक वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे.  अनुदानाची मागणी  बाजारात नवीन आलेल्या "बाहुबली' बियाण्याचा प्रयोग करून पाहण्याचा मानसही काही युवा शेतकऱ्यांनी दाखविला. शेतकऱ्याच्या डोक्‍यावर निसर्गाचे संकटही कायम असते. अतिवृष्टी किंवा दुष्काळाचा मार झेलत तो इतरही संकटे झेलतो. महागाई वाढल्यास सर्वच वस्तूंचे भाव वाढतात; पण शेतीमालाचे त्या प्रमाणात वाढत नाहीत. उलट शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, फवारणी व मजुरी असे सर्वच महाग झालेले असते. शेतीचा वाढता खर्च आवाक्‍याबाहेर जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शेतीसाठी अनुदानाची मागणीही होत आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/38zotoG

No comments:

Post a Comment