आयुर्वेदाची मात्रा ठरली प्रभावी; कोरोनाबाधित अत्यवस्थ आजोबा आजारातून बरे  पुणे - साठी ओलांडलेल्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे प्राण आयुर्वेदाच्या मात्रेमुळे वाचल्याचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दिसून आले आहे. उपचार करणारे डॉक्टर, आयुर्वेदाची मात्रा देणारे वैद्य आणि आयुर्वेदिक औषधांचा आग्रह धरणाऱ्या नातेवाईकांना याचा प्रत्यय आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासगी रुग्णालयात दाखल होतानाच या रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला तसेच कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यांना अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्याचवेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आयुर्वेदाच्या औषधांचा आग्रह धरला. रुग्णालयाने आणि डॉक्टरांनीही नातेवाईकांच्या जबाबदारीवर आयुर्वेदाच्या उपचारांना परवानगी दिली. एका बाजूला ऑक्सिजन सुरू होता व काही अत्यावश्यक औषधेही रुग्णाला देण्यात येत होती. त्याच वेळी, दुसरीकडे आयुर्वेदाची मात्रा. या गुंतागुंतीच्या स्थितीत आयुर्वेदाच्या औषधांची मात्रा परिणामकारक ठरू लागली. व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली नाही. हळूहळू कृत्रिम पद्धतीने दिल्या जाणाऱ्या आँक्सिजनच्या प्रमाणाची गरज कमी होऊन रुग्ण स्वतःहून श्‍‍वासोच्छवास करू लागला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  संशोधनाचा आधार आवश्यक  आयुर्वेदाच्या उपचाराने एका रुग्णाची प्रकृती सुधारली, तरीही प्रत्येक कोरोनाच्या रुग्णावर हेच उपचार प्रभावी ठरतील, असा दावा आत्ताच करता येणार नाही. त्यासाठी संशोधनाची गरज आहे, असे मत ॲलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले.  आयुर्वेदाचे योगदान  आयुर्वेदाचा भारतात तसेच जगभर प्रसार करताना आपण सुरू केलेली ‘रसायन’ ही शाश्वत आयुर्वेदीय संकल्पना व त्याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला पटत आहे. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ आपण रसायानाद्वारे अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करीत आलो आहोत. आयुर्वेदाची रसायन ही अत्यंत उच्च प्रतीची शास्त्रीय संकल्पना असून, त्यावर आधारित औषधांमुळे सार्वदेहिक व्याधिप्रतिकारशक्ती वाढते तसेच मानसिक व्याधिप्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढते.  केवळ एका रुग्णाच्या अनुभवावरून कोणताही दावा करता येणार नाही; परंतू आधुनिक शास्त्रातील अनेक वैद्यकीय शोध प्रथम एखाद्या रुग्णांवर आलेल्या निरीक्षणातून लागले आहेत. यात आयुर्वेदाच्या माध्यमातून आधुनिक संशोधनाला नवी दिशा मिळू शकते, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयुर्वेद पहिले शास्त्र  ‘सर्व रुग्णांना एकच औषध’ ही आधुनिक शास्त्रातील संकल्पना आता आधुनिकांनीच नाकारली आहे. प्रत्येक रुग्णाचे आरोग्य भिन्न असल्याने एकच औषध सर्वांना लागू पडत नाही, जगात हे सर्वप्रथम सांगणारे आयुर्वेद हे शास्त्र ठरले आहे.  कोरोनामुळे उद्भवणारा व त्यामुळे संपूर्ण जगात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा बारकाईने अभ्यास करून यात धोका असणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांची आयुर्वेदीय रसायांनाद्वारे व्याधिप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल, याची योजना करून राबवली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने हा संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. यातील सुरुवातीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक आहेत. यात आधुनिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टरही तसेच इतर शाखांतील शास्त्रज्ञही तितक्याच सकारात्मकतेने जोडले गेले आहेत.  -वैद्य योगेश बेंडाळे, रसायू आयुर्वेद क्लिनिक  -कोविड रुग्णाला आयुर्वेदातील रसायन आणि व्यक्तिसापेक्ष चिकित्सेचा फायदा  -प्रतिबंधात्मक म्हणून आयुर्वेद उपचार पद्धतीस प्राधान्य  -कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता आयुर्वेद एक आशेचा किरण  -साथरोगात मानसिक आरोग्य आणि प्रतिकार शक्ती उपयुक्त ठरते, हा आयुर्वेद सिद्धांत  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 2, 2020

आयुर्वेदाची मात्रा ठरली प्रभावी; कोरोनाबाधित अत्यवस्थ आजोबा आजारातून बरे  पुणे - साठी ओलांडलेल्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे प्राण आयुर्वेदाच्या मात्रेमुळे वाचल्याचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दिसून आले आहे. उपचार करणारे डॉक्टर, आयुर्वेदाची मात्रा देणारे वैद्य आणि आयुर्वेदिक औषधांचा आग्रह धरणाऱ्या नातेवाईकांना याचा प्रत्यय आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासगी रुग्णालयात दाखल होतानाच या रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला तसेच कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यांना अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्याचवेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आयुर्वेदाच्या औषधांचा आग्रह धरला. रुग्णालयाने आणि डॉक्टरांनीही नातेवाईकांच्या जबाबदारीवर आयुर्वेदाच्या उपचारांना परवानगी दिली. एका बाजूला ऑक्सिजन सुरू होता व काही अत्यावश्यक औषधेही रुग्णाला देण्यात येत होती. त्याच वेळी, दुसरीकडे आयुर्वेदाची मात्रा. या गुंतागुंतीच्या स्थितीत आयुर्वेदाच्या औषधांची मात्रा परिणामकारक ठरू लागली. व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली नाही. हळूहळू कृत्रिम पद्धतीने दिल्या जाणाऱ्या आँक्सिजनच्या प्रमाणाची गरज कमी होऊन रुग्ण स्वतःहून श्‍‍वासोच्छवास करू लागला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  संशोधनाचा आधार आवश्यक  आयुर्वेदाच्या उपचाराने एका रुग्णाची प्रकृती सुधारली, तरीही प्रत्येक कोरोनाच्या रुग्णावर हेच उपचार प्रभावी ठरतील, असा दावा आत्ताच करता येणार नाही. त्यासाठी संशोधनाची गरज आहे, असे मत ॲलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले.  आयुर्वेदाचे योगदान  आयुर्वेदाचा भारतात तसेच जगभर प्रसार करताना आपण सुरू केलेली ‘रसायन’ ही शाश्वत आयुर्वेदीय संकल्पना व त्याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला पटत आहे. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ आपण रसायानाद्वारे अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करीत आलो आहोत. आयुर्वेदाची रसायन ही अत्यंत उच्च प्रतीची शास्त्रीय संकल्पना असून, त्यावर आधारित औषधांमुळे सार्वदेहिक व्याधिप्रतिकारशक्ती वाढते तसेच मानसिक व्याधिप्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढते.  केवळ एका रुग्णाच्या अनुभवावरून कोणताही दावा करता येणार नाही; परंतू आधुनिक शास्त्रातील अनेक वैद्यकीय शोध प्रथम एखाद्या रुग्णांवर आलेल्या निरीक्षणातून लागले आहेत. यात आयुर्वेदाच्या माध्यमातून आधुनिक संशोधनाला नवी दिशा मिळू शकते, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयुर्वेद पहिले शास्त्र  ‘सर्व रुग्णांना एकच औषध’ ही आधुनिक शास्त्रातील संकल्पना आता आधुनिकांनीच नाकारली आहे. प्रत्येक रुग्णाचे आरोग्य भिन्न असल्याने एकच औषध सर्वांना लागू पडत नाही, जगात हे सर्वप्रथम सांगणारे आयुर्वेद हे शास्त्र ठरले आहे.  कोरोनामुळे उद्भवणारा व त्यामुळे संपूर्ण जगात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा बारकाईने अभ्यास करून यात धोका असणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांची आयुर्वेदीय रसायांनाद्वारे व्याधिप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल, याची योजना करून राबवली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने हा संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. यातील सुरुवातीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक आहेत. यात आधुनिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टरही तसेच इतर शाखांतील शास्त्रज्ञही तितक्याच सकारात्मकतेने जोडले गेले आहेत.  -वैद्य योगेश बेंडाळे, रसायू आयुर्वेद क्लिनिक  -कोविड रुग्णाला आयुर्वेदातील रसायन आणि व्यक्तिसापेक्ष चिकित्सेचा फायदा  -प्रतिबंधात्मक म्हणून आयुर्वेद उपचार पद्धतीस प्राधान्य  -कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता आयुर्वेद एक आशेचा किरण  -साथरोगात मानसिक आरोग्य आणि प्रतिकार शक्ती उपयुक्त ठरते, हा आयुर्वेद सिद्धांत  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U82L5o

No comments:

Post a Comment