गोष्ट एका फोटोची...आई-वडिलांच्या धडपडीची... उत्तूर : मुलाचा शाळेत अथवा शिष्यवृतीत पहिला क्रमांक आला की, त्याचा फोटो वृतपत्रात अथवा सोशल मिडीयावर झळकावा म्हणून आई-वडील नातेवाईक प्रयत्न करीत असतात. मुलग्याला फोटो स्टूडीओत नेऊन त्याला पावडर लावून टाय बांधून फोटो काढला जातो. हा फोटो मग विविध माध्यमातून झळकतो, मात्र काही कुटूंबाची परिस्थिती असते. त्यांना स्टूडीओत जावून फोटो काढने आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यावरही मग उपाय शोधला जातो आणि एक सुंदर फोटो तयार होतो. ही गोष्ट आहे. चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील निंबाळकर परिवाराची.  चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदीरमध्ये सातवीत शिकणारा विनायक भिकाजी निबांळकर याने जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे झालेल्या प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्रात आठवा व आजरा तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळवला. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून विनायकची ओळख आहे. अंगावर साधे कपडे, चप्पल फाटलेले कापडी पिशवीत वह्या पुस्तक भारायची पाठीवर मारायची हा त्याचा दिनक्रम. शिकवणीचा तास कसा असतो हे त्याला माहीत नाही. मात्र पट्ट्याने वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इयता दुसरीला जी. टी. एस परिक्षेमध्ये तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. चौथीला एमपीएसपी परिक्षेमध्ये राज्यात सहावा आला. पाचवीला शिष्यवृतीमध्येही राज्याच्या यादीत सहावे स्थान मिळवले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत आजरा तालुक्‍यात पहिला व राज्यात आठवा क्रमांक मिळवला. विनायकला पुढील ऍडमिशनसाठी व वृतपत्रात फोटो देणेसाठी फोटोची गरज होती. स्टूडीओत जावून फोटो काढणे परवडणारे नव्हते. यामुळे शेजारच्या एका मुलग्याला त्याचा मोबाईल घेवून बोलावले विनायकला घरातील भिंतीसमोर उभा केले व फोटो काढले. मात्र पावसाने गळलेल्या भिंतीवरचे डाग फोटोच्या मागच्या बाजूला यायला लागले. यावर मग शक्कल लढविण्यात आली. पाठीमागे एक लाल कलरचे कापड धरण्यात आले त्याचे एक टोक विनायकच्या आईने, तर दुसरे टोक वडिलांनी धरले. गळ्यात टाय सारखे दिसावे म्हणून शाळेच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला आणि फोटो काढण्यात आला. गरीबीचे चटके सोसत यश मिळवलेल्या आपल्या मुलाचे कौतूक वृतपत्रात छापून यावे म्हणून ही सारी खटपट होती. विनायकची आई एका पायाने अपंग, तर वडीलांचे पाच वर्षापुर्वी मेंदूचे ऑपरेशन झाले आहे. कुटूंबाच्या चरितार्थ ते पानाची टपरी चालवतात. आपल्या मुलाला एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेत आठवीसाठी प्रवेश मिळावा, एवढीच माफक अपेक्षा त्या परिवाराची आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 5, 2020

गोष्ट एका फोटोची...आई-वडिलांच्या धडपडीची... उत्तूर : मुलाचा शाळेत अथवा शिष्यवृतीत पहिला क्रमांक आला की, त्याचा फोटो वृतपत्रात अथवा सोशल मिडीयावर झळकावा म्हणून आई-वडील नातेवाईक प्रयत्न करीत असतात. मुलग्याला फोटो स्टूडीओत नेऊन त्याला पावडर लावून टाय बांधून फोटो काढला जातो. हा फोटो मग विविध माध्यमातून झळकतो, मात्र काही कुटूंबाची परिस्थिती असते. त्यांना स्टूडीओत जावून फोटो काढने आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यावरही मग उपाय शोधला जातो आणि एक सुंदर फोटो तयार होतो. ही गोष्ट आहे. चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील निंबाळकर परिवाराची.  चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विद्यामंदीरमध्ये सातवीत शिकणारा विनायक भिकाजी निबांळकर याने जिल्हा परिषद कोल्हापूरतर्फे झालेल्या प्रज्ञाशोध परिक्षेत महाराष्ट्रात आठवा व आजरा तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळवला. लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून विनायकची ओळख आहे. अंगावर साधे कपडे, चप्पल फाटलेले कापडी पिशवीत वह्या पुस्तक भारायची पाठीवर मारायची हा त्याचा दिनक्रम. शिकवणीचा तास कसा असतो हे त्याला माहीत नाही. मात्र पट्ट्याने वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इयता दुसरीला जी. टी. एस परिक्षेमध्ये तालुक्‍यात प्रथम क्रमांक पटकावला. चौथीला एमपीएसपी परिक्षेमध्ये राज्यात सहावा आला. पाचवीला शिष्यवृतीमध्येही राज्याच्या यादीत सहावे स्थान मिळवले. कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे झालेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत आजरा तालुक्‍यात पहिला व राज्यात आठवा क्रमांक मिळवला. विनायकला पुढील ऍडमिशनसाठी व वृतपत्रात फोटो देणेसाठी फोटोची गरज होती. स्टूडीओत जावून फोटो काढणे परवडणारे नव्हते. यामुळे शेजारच्या एका मुलग्याला त्याचा मोबाईल घेवून बोलावले विनायकला घरातील भिंतीसमोर उभा केले व फोटो काढले. मात्र पावसाने गळलेल्या भिंतीवरचे डाग फोटोच्या मागच्या बाजूला यायला लागले. यावर मग शक्कल लढविण्यात आली. पाठीमागे एक लाल कलरचे कापड धरण्यात आले त्याचे एक टोक विनायकच्या आईने, तर दुसरे टोक वडिलांनी धरले. गळ्यात टाय सारखे दिसावे म्हणून शाळेच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला आणि फोटो काढण्यात आला. गरीबीचे चटके सोसत यश मिळवलेल्या आपल्या मुलाचे कौतूक वृतपत्रात छापून यावे म्हणून ही सारी खटपट होती. विनायकची आई एका पायाने अपंग, तर वडीलांचे पाच वर्षापुर्वी मेंदूचे ऑपरेशन झाले आहे. कुटूंबाच्या चरितार्थ ते पानाची टपरी चालवतात. आपल्या मुलाला एखाद्या चांगल्या शिक्षण संस्थेत आठवीसाठी प्रवेश मिळावा, एवढीच माफक अपेक्षा त्या परिवाराची आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2MBaNPQ

No comments:

Post a Comment