सावधान...! पुन्हा पावसाचा इशारा ओरोस (सिंधुदुर्ग) - निसर्ग चक्रीवादळानंतरही जिल्ह्यात अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पडझडीचे प्रकार सुरू आहेत. हवामान खात्याने 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 2 आणि 3 जूनला निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नसून तिसऱ्या दिवशीही आकडेमोड सुरूच होती. केवळ 1 लाख 80 हजार नुकसानीची नोंद झाली आहे.  वैभववाडी तालुक्‍यात काल (ता. 4) झालेल्या पावसात भुईबावडा येथील विकास मोरे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे; तर करूळ घाटात दरड कोसळली होती. दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. तर गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे.  निसर्ग वादळाचा धोका टळला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच यामुळे पडझड होण्याचे प्रकारही सुरू आहेत. आज दुसऱ्या दिवशी वैभववाडी तालुक्‍यातील भुईबावडा येथील विकास आत्माराम मोरे यांच्या घराचे पत्रे उडून 2 हजार 220 रुपयांचे नुकसान झाले आहे. करूळ घाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ओसरगाव कानसळीवाडी येथील विश्राम सावंत यांच्या घराशेजारील लाईटचा धोकादायक खांब घरावर पडण्याच्या स्थितीत असून, नजीकच्या घरात राहणाऱ्या माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 10 (222), सावंतवाडी 17 (214), वेंगुर्ले 18.6 (183.6), कुडाळ 3 (157), मालवण 28 (232), कणकवली 10 (120), देवगड 20 (161), वैभववाडी 28 (231) असा पाऊस झाला आहे.  गडगडाटासह शक्‍य  प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार सिंधुदुर्गात आजपासून 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. तरी त्याअनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 5, 2020

सावधान...! पुन्हा पावसाचा इशारा ओरोस (सिंधुदुर्ग) - निसर्ग चक्रीवादळानंतरही जिल्ह्यात अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पडझडीचे प्रकार सुरू आहेत. हवामान खात्याने 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता वर्तविली आहे. 2 आणि 3 जूनला निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नसून तिसऱ्या दिवशीही आकडेमोड सुरूच होती. केवळ 1 लाख 80 हजार नुकसानीची नोंद झाली आहे.  वैभववाडी तालुक्‍यात काल (ता. 4) झालेल्या पावसात भुईबावडा येथील विकास मोरे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले आहे; तर करूळ घाटात दरड कोसळली होती. दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. तर गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे.  निसर्ग वादळाचा धोका टळला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अधूनमधून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच यामुळे पडझड होण्याचे प्रकारही सुरू आहेत. आज दुसऱ्या दिवशी वैभववाडी तालुक्‍यातील भुईबावडा येथील विकास आत्माराम मोरे यांच्या घराचे पत्रे उडून 2 हजार 220 रुपयांचे नुकसान झाले आहे. करूळ घाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ओसरगाव कानसळीवाडी येथील विश्राम सावंत यांच्या घराशेजारील लाईटचा धोकादायक खांब घरावर पडण्याच्या स्थितीत असून, नजीकच्या घरात राहणाऱ्या माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 16.82 मिलीमीटरच्या सरासरीने 134.6 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 10 (222), सावंतवाडी 17 (214), वेंगुर्ले 18.6 (183.6), कुडाळ 3 (157), मालवण 28 (232), कणकवली 10 (120), देवगड 20 (161), वैभववाडी 28 (231) असा पाऊस झाला आहे.  गडगडाटासह शक्‍य  प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त सूचनेनुसार सिंधुदुर्गात आजपासून 7 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे. तरी त्याअनुषंगाने आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XDv3qq

No comments:

Post a Comment