अरे बापरे..! चक्रीवादळाच्या नुकसानीचा आकडा एवढा? ओरोस (सिंधुदुर्ग) - "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पंचनाम्याच्या माध्यमातून सुरु केलेली आकडेमोड पूर्ण झाली आहे. याची झळ 57 घरे, 8 गोठे, इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्ता यांना बसल्याचे पुढे आले आहे. तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले आहे.  "निसर्ग' चक्रीवादळात जिल्ह्यातील घरे, गोठे व इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल 57 घरे, आठ गोठे व इतर इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी 24 लाख 51 हजार एवढी आहे.  अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 3 जूनला सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. चक्रीवादळाने सिंधुदुर्गात हैदोस मांडला. विशेषतः किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पाहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंची देखील कमालीची वाढली होती. 3 जूनला सायंकाळी उशिरा या चक्रीवादळाचा जोर ओसरला होता; मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून घरावर कोसळणे, घरांची पडझड होणे, यांसारख्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. कोणतेही जनावरं या आपत्तीत दगावली नाहीत. जिल्हा प्रशासनाने लागलीच नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.  प्राप्त अहवालानुसार पूर्णतः पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्याचे नुकसान 4 लाख 26 हजार 700 एवढे आहे. अंशता पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची संख्या 37 एवढी असून त्याचे नुकसान पाच लाख 56 हजार एवढी आहे. अंशता पडलेल्या कच्च्या घरांची संख्या 18 असून नुकसानीची आकडेवारी 2 लाख 26,104 एवढी आहे. गोठ्यांच्या नुकसानीची संख्या 7 आहे. तर त्याचे नुकसान 42 हजार 480 एवढे आहे. एका दुकानाची पडझड होऊन 5 हजार नुकसान झाले आहे. मत्स्य विभाग व बंदर विभागाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इतर खाजगी मालमत्ता नुकसान, अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे नुकसान, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान, ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे नुकसान, बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील स्टेजचे नुकसान अशा एकूण 7 घटनांमधून 24 लाख 51 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे.  नुकसान भरपाईची प्रतीक्षा  जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे पूर्ण करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेले आहेत. नुकसानीची आकडेवारीही 37 लाखापेक्षा जास्त आहे. तसा अहवालही शासनास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांचा सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.  मच्छीमारांना दिलासा  "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका हा भात अथवा अन्य शेतीला बसला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने एका अहवालाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बोटी, जाळी, प्रवासी वाहतूक नौकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. गेले दोन-तीन दिवस मान्सूनपर्व पडलेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार यांना चक्रीवादळाचे अभय मिळाले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

अरे बापरे..! चक्रीवादळाच्या नुकसानीचा आकडा एवढा? ओरोस (सिंधुदुर्ग) - "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका बसल्यानंतर प्रशासनाने झालेल्या नुकसानीची पंचनाम्याच्या माध्यमातून सुरु केलेली आकडेमोड पूर्ण झाली आहे. याची झळ 57 घरे, 8 गोठे, इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्ता यांना बसल्याचे पुढे आले आहे. तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाले आहे.  "निसर्ग' चक्रीवादळात जिल्ह्यातील घरे, गोठे व इतर खाजगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल 57 घरे, आठ गोठे व इतर इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल 37 लाख 19 हजार 505 रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खाजगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी 24 लाख 51 हजार एवढी आहे.  अरबी समुद्रात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 3 जूनला सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. चक्रीवादळाने सिंधुदुर्गात हैदोस मांडला. विशेषतः किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पाहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंची देखील कमालीची वाढली होती. 3 जूनला सायंकाळी उशिरा या चक्रीवादळाचा जोर ओसरला होता; मात्र तत्पूर्वी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून घरावर कोसळणे, घरांची पडझड होणे, यांसारख्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. कोणतेही जनावरं या आपत्तीत दगावली नाहीत. जिल्हा प्रशासनाने लागलीच नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.  प्राप्त अहवालानुसार पूर्णतः पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्याचे नुकसान 4 लाख 26 हजार 700 एवढे आहे. अंशता पडझड झालेल्या पक्‍क्‍या घरांची संख्या 37 एवढी असून त्याचे नुकसान पाच लाख 56 हजार एवढी आहे. अंशता पडलेल्या कच्च्या घरांची संख्या 18 असून नुकसानीची आकडेवारी 2 लाख 26,104 एवढी आहे. गोठ्यांच्या नुकसानीची संख्या 7 आहे. तर त्याचे नुकसान 42 हजार 480 एवढे आहे. एका दुकानाची पडझड होऊन 5 हजार नुकसान झाले आहे. मत्स्य विभाग व बंदर विभागाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. इतर खाजगी मालमत्ता नुकसान, अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे नुकसान, प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान, ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे नुकसान, बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील स्टेजचे नुकसान अशा एकूण 7 घटनांमधून 24 लाख 51 हजार 440 रुपयांचे नुकसान झाले आहे.  नुकसान भरपाईची प्रतीक्षा  जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे पूर्ण करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेले आहेत. नुकसानीची आकडेवारीही 37 लाखापेक्षा जास्त आहे. तसा अहवालही शासनास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांचा सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.  मच्छीमारांना दिलासा  "निसर्ग' चक्रीवादळाचा फटका हा भात अथवा अन्य शेतीला बसला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने एका अहवालाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बोटी, जाळी, प्रवासी वाहतूक नौकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. गेले दोन-तीन दिवस मान्सूनपर्व पडलेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार यांना चक्रीवादळाचे अभय मिळाले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cH2wV4

No comments:

Post a Comment