परराज्यातून विमान व रेल्वे प्रवास मोकाट, मात्र आंतरजिल्हा वाहतुकीला आडकाठी  पुणे - दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकता, हैदराबाद, जयपूर या सारख्या शहरांतून नागरिकांना विमान अथवा रेल्वेने पुण्यात येणे शक्‍य आहे. पण, पुण्यातून सातारा अथवा नगरला जाणे नागरिकांना शक्‍य नाही, कारण सीमा अजूनही बंद आहेत. आंतरराज्य वाहतुकीला परवानगी दिली असली तरी, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्यांच्या सीमांवर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना लॉकडाउन शिथिल करताना 28 मे रोजी केंद्र सरकारने जिल्हातंर्गत, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हातंर्गत वाहतूक खुली केली आहे. मात्र, आंतरजिल्हा वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. उदा ः नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील नागरिक खरेदीसाठी शिरूरला जातात. मात्र, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा रस्त्यावर शिरवळबाबत होत आहे. तेथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणारे कामगार चेलाडी फाटा, बनेश्वर, खेड शिवापूर परिसरातून ये-जा करतात. त्यांनाही काही वेळा अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा, नगर, मुंबई आदी जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसाय, उद्योगांत काम करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा या बाबत वरिष्ठ पोलिस सूत्रांकडे विचारणा केली असता, गृह खात्याने या बाबत अभिप्राय मागितला होता. त्यानुसार आम्ही तो दिला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आम्हीदेखील त्याची वाट पाहत आहोत. राज्य सरकारने 30 मे रोजी शिथिलीकरणाचे काही आदेश देताना, आंतरजिल्हा वाहतुकीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. परंतु, या बाबत अद्याप आदेश निघालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.  पोलिसांची मनधरणी  अनेकांना जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांकडून अडविले जाते. त्यावेळी त्यांची मनधरणी करावी लागते. त्यावेळी पोलिसांच्या मूडवर बरेच काही अवलंबून असते. त्यांच्या मनात असेल तर पुढे सोडले जाते. नाहीतर परत पाठवले जाते, असाही काहीजणांचा अनुभव आहे.  शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड 1) माझा पॅकेजिंगचा माल मला मुंबईवरून आणावा लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मुंबईला जावे लागते. एकदा पोलिसांचा पास मिळाला. मात्र, आता तो मिळत नाही. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे.  - सुरेश चौधरी, व्यापारी  2) माझी आजी साताऱ्याला बहिणीकडे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती तेथे राहत आहे. तिची सातत्याने नियमितपणे आरोग्य तपासणी करावी लागते. ते डॉक्‍टर पुण्यात आहेत. पोलिसांचा पासही मिळत नाही. आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  - चिन्मय वैद्य, नागरिक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 5, 2020

परराज्यातून विमान व रेल्वे प्रवास मोकाट, मात्र आंतरजिल्हा वाहतुकीला आडकाठी  पुणे - दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकता, हैदराबाद, जयपूर या सारख्या शहरांतून नागरिकांना विमान अथवा रेल्वेने पुण्यात येणे शक्‍य आहे. पण, पुण्यातून सातारा अथवा नगरला जाणे नागरिकांना शक्‍य नाही, कारण सीमा अजूनही बंद आहेत. आंतरराज्य वाहतुकीला परवानगी दिली असली तरी, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्ह्यांच्या सीमांवर राहणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना लॉकडाउन शिथिल करताना 28 मे रोजी केंद्र सरकारने जिल्हातंर्गत, आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने जिल्हातंर्गत वाहतूक खुली केली आहे. मात्र, आंतरजिल्हा वाहतुकीला अद्याप परवानगी दिलेली नाही. उदा ः नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील नागरिक खरेदीसाठी शिरूरला जातात. मात्र, दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा सील असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा रस्त्यावर शिरवळबाबत होत आहे. तेथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत काम करणारे कामगार चेलाडी फाटा, बनेश्वर, खेड शिवापूर परिसरातून ये-जा करतात. त्यांनाही काही वेळा अडचणी येत आहेत. तसाच प्रकार सातारा, नगर, मुंबई आदी जिल्ह्यांतून नोकरी, व्यवसाय, उद्योगांत काम करणाऱ्या नागरिकांना अडचणी येत आहेत.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा या बाबत वरिष्ठ पोलिस सूत्रांकडे विचारणा केली असता, गृह खात्याने या बाबत अभिप्राय मागितला होता. त्यानुसार आम्ही तो दिला आहे. परंतु, अंतिम निर्णय मुख्यमंत्री कार्यालयातून घेतला जाईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे आम्हीदेखील त्याची वाट पाहत आहोत. राज्य सरकारने 30 मे रोजी शिथिलीकरणाचे काही आदेश देताना, आंतरजिल्हा वाहतुकीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. परंतु, या बाबत अद्याप आदेश निघालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.  पोलिसांची मनधरणी  अनेकांना जिल्ह्यांच्या सीमांवर पोलिसांकडून अडविले जाते. त्यावेळी त्यांची मनधरणी करावी लागते. त्यावेळी पोलिसांच्या मूडवर बरेच काही अवलंबून असते. त्यांच्या मनात असेल तर पुढे सोडले जाते. नाहीतर परत पाठवले जाते, असाही काहीजणांचा अनुभव आहे.  शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड 1) माझा पॅकेजिंगचा माल मला मुंबईवरून आणावा लागतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मुंबईला जावे लागते. एकदा पोलिसांचा पास मिळाला. मात्र, आता तो मिळत नाही. त्यामुळे कामावर परिणाम होत आहे.  - सुरेश चौधरी, व्यापारी  2) माझी आजी साताऱ्याला बहिणीकडे आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ती तेथे राहत आहे. तिची सातत्याने नियमितपणे आरोग्य तपासणी करावी लागते. ते डॉक्‍टर पुण्यात आहेत. पोलिसांचा पासही मिळत नाही. आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  - चिन्मय वैद्य, नागरिक  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UgmjV1

No comments:

Post a Comment