सिंधुदुर्गातील तीन गावांना वादळाचा तडाखा वैभववाडी (सिंधुदुर्ग) - भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावांना आज पहाटे चक्रीवादळाने तडाखा दिला. यात तिन्ही ठिकाणी मोठी पडझड झाली. जिल्ह्याच्या इतर भागांत मात्र आज पावसाचा जोर ओसरला.  गेले दोन दिवस सिंधुदुर्गावर निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव होता. आज मात्र पावसाचा जोर कमी होता. भुईबावडा परिसराला चक्रीवादळाने फटका दिला. यात तिरवडेतील 2 तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भुईबावडा पहिलीवाडी येथील दीपक सीताराम पांचाळ यांच्या घराच्या छपराची कौले वादळात उडून गेली. त्यामुळे साखर झोपेत असलेल्या पांचाळ कुटुंबाला धडकी भरली. सुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही; मात्र पांचाळ यांचे 13 हजार 625 रुपयांचे नुकसान झाले. तिरवडे तर्फ खारेपटण येथील श्रीधर तुकाराम कलमष्टे याच्या घराच्या छप्पराचे सर्व पत्र वादळात उडून गेले. त्यामुळे कलमष्टे यांचे 30 हजार रुपयांचे, तर रघुनाथ शंकर पवार यांच्या घराच्या छपराचे 3 हजार रुपये नुकसान झाले. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. हेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे आणि कौले फुटली आहेत, तर वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. चक्रीवादळामुळे हेत गावातील काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 24 तासांत तालुक्‍यात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  "निसर्ग'च्या तडाख्याची आकडेमोड सुरू  ओरोस - निसर्ग चक्रीवादळ जिल्ह्यात थेट धडकले नसले तरी त्याचा फटका मात्र जिल्ह्याला बसला आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करायला सुरवात केली असून, जिल्ह्यातील 29 घरांना फटका बसला आहे. यात लाखो रुपयांची वित्तहानी झाली असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. काही ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.  निसर्ग चक्रीवादळ आता शमले आहे; मात्र यामुळे झालेल्या नुकसानीचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. याचा फटका जिल्ह्यातील 29 घरांना बसला आहे. यात सावंतवाडी तालुक्‍यात 4 घरांवर झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. यात तळवणे गावात 3 तर डांबरे गावात 1 घरांचा समावेश आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड आणि वजराट गावात प्रत्येकी एका घरांचा समावेश आहे. यात 19 हजार रुपयांची नुकसानी झाली आहे. कुडाळ तालुक्‍यात घोडगे आणि हुमरस गावातील प्रत्येकी एका घरावर झाड पडून घरांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्‍यातील 10 घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. यात कांदळगाव 3, मालवण 2, मळा, आचरा, चिंदर, तळगाव, आमडोस या गावातील प्रत्येकी एका घरावर झाड पडले आहे. यात 1 लाख 17 हजार 750 रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्‍यातील 3 घरांचे झाड पडून नुकसान झाले आहे. यात देवगड, तांबळडेग, पोयरे गावातील घरांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील 6 घरांचे नुकसान झाले असून, लिंगेश्वरनगर, राजनगर, खारेपाटण, करुळ, कळसुली, डामरे गावाचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्‍यात वैभववाडी 2 आणि ऐनारी गावातील घरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वायरी येथे विद्युत खांबांवर झाड पडून पोलांचे 44 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  हानी वाढणार  जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळात फटका बसून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे; मात्र प्रत्यक्षात नुकसानी झालेल्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम ग्रामस्तरावर सुरु असून हा नुकसानचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 4, 2020

सिंधुदुर्गातील तीन गावांना वादळाचा तडाखा वैभववाडी (सिंधुदुर्ग) - भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावांना आज पहाटे चक्रीवादळाने तडाखा दिला. यात तिन्ही ठिकाणी मोठी पडझड झाली. जिल्ह्याच्या इतर भागांत मात्र आज पावसाचा जोर ओसरला.  गेले दोन दिवस सिंधुदुर्गावर निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव होता. आज मात्र पावसाचा जोर कमी होता. भुईबावडा परिसराला चक्रीवादळाने फटका दिला. यात तिरवडेतील 2 तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भुईबावडा पहिलीवाडी येथील दीपक सीताराम पांचाळ यांच्या घराच्या छपराची कौले वादळात उडून गेली. त्यामुळे साखर झोपेत असलेल्या पांचाळ कुटुंबाला धडकी भरली. सुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही; मात्र पांचाळ यांचे 13 हजार 625 रुपयांचे नुकसान झाले. तिरवडे तर्फ खारेपटण येथील श्रीधर तुकाराम कलमष्टे याच्या घराच्या छप्पराचे सर्व पत्र वादळात उडून गेले. त्यामुळे कलमष्टे यांचे 30 हजार रुपयांचे, तर रघुनाथ शंकर पवार यांच्या घराच्या छपराचे 3 हजार रुपये नुकसान झाले. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे. हेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे आणि कौले फुटली आहेत, तर वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. चक्रीवादळामुळे हेत गावातील काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 24 तासांत तालुक्‍यात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  "निसर्ग'च्या तडाख्याची आकडेमोड सुरू  ओरोस - निसर्ग चक्रीवादळ जिल्ह्यात थेट धडकले नसले तरी त्याचा फटका मात्र जिल्ह्याला बसला आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करायला सुरवात केली असून, जिल्ह्यातील 29 घरांना फटका बसला आहे. यात लाखो रुपयांची वित्तहानी झाली असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. काही ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.  निसर्ग चक्रीवादळ आता शमले आहे; मात्र यामुळे झालेल्या नुकसानीचे वास्तव पुढे येऊ लागले आहे. याचा फटका जिल्ह्यातील 29 घरांना बसला आहे. यात सावंतवाडी तालुक्‍यात 4 घरांवर झाडे पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. यात तळवणे गावात 3 तर डांबरे गावात 1 घरांचा समावेश आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड आणि वजराट गावात प्रत्येकी एका घरांचा समावेश आहे. यात 19 हजार रुपयांची नुकसानी झाली आहे. कुडाळ तालुक्‍यात घोडगे आणि हुमरस गावातील प्रत्येकी एका घरावर झाड पडून घरांचे नुकसान झाले आहे. मालवण तालुक्‍यातील 10 घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. यात कांदळगाव 3, मालवण 2, मळा, आचरा, चिंदर, तळगाव, आमडोस या गावातील प्रत्येकी एका घरावर झाड पडले आहे. यात 1 लाख 17 हजार 750 रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तालुक्‍यातील 3 घरांचे झाड पडून नुकसान झाले आहे. यात देवगड, तांबळडेग, पोयरे गावातील घरांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील 6 घरांचे नुकसान झाले असून, लिंगेश्वरनगर, राजनगर, खारेपाटण, करुळ, कळसुली, डामरे गावाचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्‍यात वैभववाडी 2 आणि ऐनारी गावातील घरांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वायरी येथे विद्युत खांबांवर झाड पडून पोलांचे 44 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.  हानी वाढणार  जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळात फटका बसून सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे; मात्र प्रत्यक्षात नुकसानी झालेल्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे काम ग्रामस्तरावर सुरु असून हा नुकसानचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/374jxr2

No comments:

Post a Comment