Video : पिंपरी-चिंचवडमधील इस्टेट एजंट व्यावसायिकांना 'हा' एकच प्रश्न सतावतोय पिंपरी : आधीच मंदीने त्रस्त झालेल्या इस्टेट एजंट व्यावसायिकांचे लॉकडाउनमुळे पुरते कंबरडे मोडले आहे. अनेक कामगार परगावी गेल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांना यातून बाहेर पडण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कंपन्यांमध्ये काम करणारे दुसऱ्या जिल्ह्यातील अथवा परराज्यातील कामगार खोल्या किंवा चार-पाच जणांमध्ये एखादी सदनिका भाडेपट्टा तत्त्वावर घेऊन राहत होते. लॉकडाउनमुळे कंपन्या बंद झाल्या. काहींच्या नोकऱ्या गेल्या अगर वेतनकपात झाली. दुसरीकडे लॉकडाउन वाढतच चालले आहेत. त्यामुळे रोजगाराची शाश्‍वती नसल्याने अनेक कामगार त्यांच्या गावी अथवा राज्यात निघून गेले आहेत. अनेकजण अद्यापही जात आहे. त्यामुळे अनेक सदनिका रिक्त झाल्या आहेत. सदनिका रिक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे अशा रिक्त झालेल्या सदनिकांच्या मालकांना पुन्हा भाडेकरू मिळवून देणे जिकिरीचे झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. अन्य एक व्यावसायिक उमेश सातकर यांनी सांगितले, "माझी पत्नी आणि दोन मुली आजारी आहेत. त्यामुळे साठवलेली बचत त्यांच्या आजारपणात खर्च झाली. दुसरीकडे व्यवसायात ग्राहक नाही. त्यामुळे भवितव्याचा प्रश्‍न 'आ' वासून उभा आहे.''    व्यवसायाची सद्यःस्थिती  ज्याला रिअल इस्टेट क्षेत्राची माहिती आहे, अशी कोणीही व्यक्ती इस्टेट एजंट होऊ शकतो. काही सरकारी संस्थांनी याचे रीतसर प्रशिक्षण देणारे अल्पमुदतीचे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. पण असे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसाय सुरू करणाऱ्याची संख्या तुरळक आहे. त्याचप्रमाणे अनेकजण नोकरी, अन्य एखादा व्यवसाय सांभाळून हा इस्टेट एजंट व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात. त्यामुळे हा व्यवसाय पुरेसा संघटित नाही. त्यांची संघटनाही नाही. सामान्यपणे त्या त्या शहरातील व्यावसायिक शहरापुरता व्यवसाय करतात. काही पूर्णवेळ व्यावसायिकांनी शहराच्या मध्यवस्तीत दुकाने भाडेपट्टा तत्त्वावर घेतली आहेत. त्यांना स्वत:चा घरखर्च भागवून दुकानाचे भाडे, तेथील एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन देणे त्यांना अशक्‍यप्राय होत आहे.  Video : पिंपरीतील कोरोना योद्ध्यांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केली ही मदत... पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्राहकांची वानवा  सध्या बाजारात ग्राहक नाही. त्यामुळे काही व्यावसायिकांना खायला मिळाले, तरी पुष्कळ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहराच्या बाहेरून लोक आले तर सदनिका भाडेपट्टा तत्त्वावर गेल्या असत्या. पण आता नवीन लोक येणे तर दूरच उलट शहरातील लोकच पुन्हा त्यांच्या गावी जाऊ लागले आहेत. या बाबत गेली 10 वर्षे व्यवसाय करणारे चिंचवड येथील अनिकेत जंगम यांनी सांगितले, "आधीच या व्यवसायात काहीशी मंदी होती. त्यातच लॉकडाउनची भर पडली. त्यामुळे यातून बाहेर येण्यास वर्षभराचा कालावधी लागेल. काही व्यावसायिकांनी घर भाड्याने देणाऱ्या कंपन्यांच्या संकेतस्थळावर स्वत:ची नोंदणी केली आहे. त्यासाठीचे तीन महिने ते 12 महिन्याचे पॅकेज घेतले आहे. त्यासाठी हजारो रुपये मोजले आहेत. मात्र, ग्राहक येणेच बंद झाल्याने हे अतिरिक्त नुकसान झाले आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा    काय आहे भवितव्य  लॉकडाउन संपले, तरी आता पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार महिने ग्राहक येणार नाही. सामान्यपणे एप्रिल-मेमध्ये मुलांच्या शाळा संपतात. काहींचे वेतन करार, बदल्या होतात. त्यामुळे या कालावधीत घर बदलण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. यंदा अशी परिस्थिती नाही.  Video : आरटीओ अधिकाऱ्यांमुळे माणुसकी दाखवली, पण तीच अंगलट आली... दृष्टिक्षेपात व्यवसाय  शहरातील व्यावसायिकांची संख्या - अंदाजे 1000  पूर्णवेळ व्यावसायिक - 100  एका व्यावसायिकाचे सरासरी मासिक उत्पन्न - 15,000 ते 50,000 रुपये  "लॉकडाउनच्या अगोदर परिस्थिती ठीक होती. आता व्यवसाय 100 टक्के बंद आहे. एखादा ग्राहक सदनिका बघण्यासाठी आलाच तरी तो कोण आहे, कोठून आला आहे याची खात्री नसते. त्यामुळे सदनिका दाखविणेही धोक्‍याचे झाले आहे. 50 टक्के ग्राहक हे शहराबाहेरील किंवा परराज्यातील कामगार होते. आता तेच नसल्यामुळे मोठा परिणाम झाला आहे.''  - रमेश आवले, इस्टेट एजंट, चिंचवड News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 18, 2020

Video : पिंपरी-चिंचवडमधील इस्टेट एजंट व्यावसायिकांना 'हा' एकच प्रश्न सतावतोय पिंपरी : आधीच मंदीने त्रस्त झालेल्या इस्टेट एजंट व्यावसायिकांचे लॉकडाउनमुळे पुरते कंबरडे मोडले आहे. अनेक कामगार परगावी गेल्याने त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांना यातून बाहेर पडण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कंपन्यांमध्ये काम करणारे दुसऱ्या जिल्ह्यातील अथवा परराज्यातील कामगार खोल्या किंवा चार-पाच जणांमध्ये एखादी सदनिका भाडेपट्टा तत्त्वावर घेऊन राहत होते. लॉकडाउनमुळे कंपन्या बंद झाल्या. काहींच्या नोकऱ्या गेल्या अगर वेतनकपात झाली. दुसरीकडे लॉकडाउन वाढतच चालले आहेत. त्यामुळे रोजगाराची शाश्‍वती नसल्याने अनेक कामगार त्यांच्या गावी अथवा राज्यात निघून गेले आहेत. अनेकजण अद्यापही जात आहे. त्यामुळे अनेक सदनिका रिक्त झाल्या आहेत. सदनिका रिक्त होण्याचे प्रमाण वाढतच आहे. त्यामुळे अशा रिक्त झालेल्या सदनिकांच्या मालकांना पुन्हा भाडेकरू मिळवून देणे जिकिरीचे झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. अन्य एक व्यावसायिक उमेश सातकर यांनी सांगितले, "माझी पत्नी आणि दोन मुली आजारी आहेत. त्यामुळे साठवलेली बचत त्यांच्या आजारपणात खर्च झाली. दुसरीकडे व्यवसायात ग्राहक नाही. त्यामुळे भवितव्याचा प्रश्‍न 'आ' वासून उभा आहे.''    व्यवसायाची सद्यःस्थिती  ज्याला रिअल इस्टेट क्षेत्राची माहिती आहे, अशी कोणीही व्यक्ती इस्टेट एजंट होऊ शकतो. काही सरकारी संस्थांनी याचे रीतसर प्रशिक्षण देणारे अल्पमुदतीचे अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. पण असे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसाय सुरू करणाऱ्याची संख्या तुरळक आहे. त्याचप्रमाणे अनेकजण नोकरी, अन्य एखादा व्यवसाय सांभाळून हा इस्टेट एजंट व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात. त्यामुळे हा व्यवसाय पुरेसा संघटित नाही. त्यांची संघटनाही नाही. सामान्यपणे त्या त्या शहरातील व्यावसायिक शहरापुरता व्यवसाय करतात. काही पूर्णवेळ व्यावसायिकांनी शहराच्या मध्यवस्तीत दुकाने भाडेपट्टा तत्त्वावर घेतली आहेत. त्यांना स्वत:चा घरखर्च भागवून दुकानाचे भाडे, तेथील एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन देणे त्यांना अशक्‍यप्राय होत आहे.  Video : पिंपरीतील कोरोना योद्ध्यांसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केली ही मदत... पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ग्राहकांची वानवा  सध्या बाजारात ग्राहक नाही. त्यामुळे काही व्यावसायिकांना खायला मिळाले, तरी पुष्कळ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहराच्या बाहेरून लोक आले तर सदनिका भाडेपट्टा तत्त्वावर गेल्या असत्या. पण आता नवीन लोक येणे तर दूरच उलट शहरातील लोकच पुन्हा त्यांच्या गावी जाऊ लागले आहेत. या बाबत गेली 10 वर्षे व्यवसाय करणारे चिंचवड येथील अनिकेत जंगम यांनी सांगितले, "आधीच या व्यवसायात काहीशी मंदी होती. त्यातच लॉकडाउनची भर पडली. त्यामुळे यातून बाहेर येण्यास वर्षभराचा कालावधी लागेल. काही व्यावसायिकांनी घर भाड्याने देणाऱ्या कंपन्यांच्या संकेतस्थळावर स्वत:ची नोंदणी केली आहे. त्यासाठीचे तीन महिने ते 12 महिन्याचे पॅकेज घेतले आहे. त्यासाठी हजारो रुपये मोजले आहेत. मात्र, ग्राहक येणेच बंद झाल्याने हे अतिरिक्त नुकसान झाले आहे.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा    काय आहे भवितव्य  लॉकडाउन संपले, तरी आता पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार महिने ग्राहक येणार नाही. सामान्यपणे एप्रिल-मेमध्ये मुलांच्या शाळा संपतात. काहींचे वेतन करार, बदल्या होतात. त्यामुळे या कालावधीत घर बदलण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. यंदा अशी परिस्थिती नाही.  Video : आरटीओ अधिकाऱ्यांमुळे माणुसकी दाखवली, पण तीच अंगलट आली... दृष्टिक्षेपात व्यवसाय  शहरातील व्यावसायिकांची संख्या - अंदाजे 1000  पूर्णवेळ व्यावसायिक - 100  एका व्यावसायिकाचे सरासरी मासिक उत्पन्न - 15,000 ते 50,000 रुपये  "लॉकडाउनच्या अगोदर परिस्थिती ठीक होती. आता व्यवसाय 100 टक्के बंद आहे. एखादा ग्राहक सदनिका बघण्यासाठी आलाच तरी तो कोण आहे, कोठून आला आहे याची खात्री नसते. त्यामुळे सदनिका दाखविणेही धोक्‍याचे झाले आहे. 50 टक्के ग्राहक हे शहराबाहेरील किंवा परराज्यातील कामगार होते. आता तेच नसल्यामुळे मोठा परिणाम झाला आहे.''  - रमेश आवले, इस्टेट एजंट, चिंचवड News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bIf26y

No comments:

Post a Comment