Video : भटक्‍या कुत्र्या-मांजरांसह जखमी पक्ष्यांची सेवा गंधाली कुलकर्णी ही तरुणी स्पॅनिश भाषांतरकार व दुभाषी म्हणून व्यावसायिक सेवा देत असली तरी भटक्‍या प्राण्यांची काळजी घेण्यात तिला अतीव समाधान मिळतं. तिचं घर व कार्यालयाच्या परिसरातील अनेक कुत्री, मांजरी, जखमी झालेल्या खारी आणि पक्ष्यांना तिने आतापर्यंत अन्न, पाणी व वैद्यकीय मदत पुरवली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गंधाली कुलकर्णीला स्वतःची ओळख ‘कम्युनिटी केअर टेकर’ म्हणून करून द्यायला आवडतं. स्पॅनिश भाषेची जाणकार असल्याने ती त्यातील भाषांतरकार व दुभाषी म्हणून व्यावसायिक सेवा देते. ‘कार्य मानसशास्त्र’ या विषयातीलही ती तज्ज्ञ आहे. तिचं घर सिंहगड रस्त्यावरील भिडे बाग आणि कार्यालय हिंजवडीत आहे. दोन्ही ठिकाणी ती भटक्‍या प्राण्यांची काळजी घेते. गंधाली म्हणाली, ‘क्‍युबिक्‍स या संकुलात विविध कंपन्या आहेत. तिथंच माझं कार्यालय आहे. या परिसरात तीसहून अधिक कुत्री भटकत असतात. त्यांना अन्न, पाणी पुरवणं आणि नसबंदी, लसीकरण, पोटात जंत होऊ नयेत यासाठी उपचार व पशुवैद्यकीय चिकित्सेची सोय पुरवणं ही जबाबदारी आम्हा केअर टेकर्सच्या ग्रुपने घेतली आहे. मिळून खर्च करत असलो तरी त्याच्याही सर्व नोंदी ठेवतो. ‘क्‍युबिक्‍स फीडर्स’ या आमच्या गटात सहाजण मुख्य स्वयंसेवक व जोडीला गरजेप्रमाणे काही सहायक मिळून ही कामगिरी शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते.’ गंधालीने असंही सांगितलं की, क्‍युबिक्‍स परिसरात मी दोन वर्षांपासून जाऊ लागले. ‘सिंहगड चॅरिटेबल ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट’शी मी जोडलेली आहे. चार वर्षांपूर्वी मागचे दोन्ही पाय निकामी झालेल्या एका कुत्रीला पाहून मी तिला खाणं देऊ लागले. पशुवैद्यांकडून उपचार करून घेतल्यावर तिचा एक पाय सुधारला, मात्र दुसरा अधूच राहिला. मग इतरही कुत्र्या-मांजरांकडे माझं लक्ष जाऊ लागलं. आमराईचा परिसर असल्याने इथं पाखरं भरपूर असतात. त्यापैकी कुणी कधी उंचावरून पडून, पतंगांच्या मांज्यात अडकून किंवा एखाद्या प्राण्याने केलेल्या हल्ल्यामुळे जखमी होतात. खारी किंवा त्यांची पिलंही जखमी अवस्थेत सापडतात. त्यांच्यावर योग्य ते उपचार ट्रस्टच्या मदतीने करण्यात येतात. नंतर भूगाव किंवा लोणावळा परिसरातील रानात त्यांना सोडलं जातं. जे पक्षी किंवा खारी स्वतंत्रपणे तगू शकणार नाहीत, त्यांना कात्रजच्या वन्यजीव अनाथालयात ठेवलं जातं.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 6, 2020

Video : भटक्‍या कुत्र्या-मांजरांसह जखमी पक्ष्यांची सेवा गंधाली कुलकर्णी ही तरुणी स्पॅनिश भाषांतरकार व दुभाषी म्हणून व्यावसायिक सेवा देत असली तरी भटक्‍या प्राण्यांची काळजी घेण्यात तिला अतीव समाधान मिळतं. तिचं घर व कार्यालयाच्या परिसरातील अनेक कुत्री, मांजरी, जखमी झालेल्या खारी आणि पक्ष्यांना तिने आतापर्यंत अन्न, पाणी व वैद्यकीय मदत पुरवली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गंधाली कुलकर्णीला स्वतःची ओळख ‘कम्युनिटी केअर टेकर’ म्हणून करून द्यायला आवडतं. स्पॅनिश भाषेची जाणकार असल्याने ती त्यातील भाषांतरकार व दुभाषी म्हणून व्यावसायिक सेवा देते. ‘कार्य मानसशास्त्र’ या विषयातीलही ती तज्ज्ञ आहे. तिचं घर सिंहगड रस्त्यावरील भिडे बाग आणि कार्यालय हिंजवडीत आहे. दोन्ही ठिकाणी ती भटक्‍या प्राण्यांची काळजी घेते. गंधाली म्हणाली, ‘क्‍युबिक्‍स या संकुलात विविध कंपन्या आहेत. तिथंच माझं कार्यालय आहे. या परिसरात तीसहून अधिक कुत्री भटकत असतात. त्यांना अन्न, पाणी पुरवणं आणि नसबंदी, लसीकरण, पोटात जंत होऊ नयेत यासाठी उपचार व पशुवैद्यकीय चिकित्सेची सोय पुरवणं ही जबाबदारी आम्हा केअर टेकर्सच्या ग्रुपने घेतली आहे. मिळून खर्च करत असलो तरी त्याच्याही सर्व नोंदी ठेवतो. ‘क्‍युबिक्‍स फीडर्स’ या आमच्या गटात सहाजण मुख्य स्वयंसेवक व जोडीला गरजेप्रमाणे काही सहायक मिळून ही कामगिरी शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली जाते.’ गंधालीने असंही सांगितलं की, क्‍युबिक्‍स परिसरात मी दोन वर्षांपासून जाऊ लागले. ‘सिंहगड चॅरिटेबल ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट’शी मी जोडलेली आहे. चार वर्षांपूर्वी मागचे दोन्ही पाय निकामी झालेल्या एका कुत्रीला पाहून मी तिला खाणं देऊ लागले. पशुवैद्यांकडून उपचार करून घेतल्यावर तिचा एक पाय सुधारला, मात्र दुसरा अधूच राहिला. मग इतरही कुत्र्या-मांजरांकडे माझं लक्ष जाऊ लागलं. आमराईचा परिसर असल्याने इथं पाखरं भरपूर असतात. त्यापैकी कुणी कधी उंचावरून पडून, पतंगांच्या मांज्यात अडकून किंवा एखाद्या प्राण्याने केलेल्या हल्ल्यामुळे जखमी होतात. खारी किंवा त्यांची पिलंही जखमी अवस्थेत सापडतात. त्यांच्यावर योग्य ते उपचार ट्रस्टच्या मदतीने करण्यात येतात. नंतर भूगाव किंवा लोणावळा परिसरातील रानात त्यांना सोडलं जातं. जे पक्षी किंवा खारी स्वतंत्रपणे तगू शकणार नाहीत, त्यांना कात्रजच्या वन्यजीव अनाथालयात ठेवलं जातं.’’ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3doH7AZ

No comments:

Post a Comment