सुरक्षित पण सुजाण पालकत्व  कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे ‘पालकत्वाची‘ परिभाषाच बदलायला लागली आहे. पण म्हणून मुले घरातच कोंडून ठेवणे हेही शक्य नाही. आपण सुरक्षित पण सुजाण पालकत्वाचे काही सोपे नियम सध्या पाळू शकू.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - मुलांना शाळेत सोडताना-आणताना रिक्षा, व्हॅनसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग'चे कडक नियम पालकांनीच घालून दिले पहिजेत. (अर्थात त्याची आर्थिक किंमत मोजावी लागणार).  - मुलांना शाळेत प्रवेश करण्यापासून स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे नियम शिक्षकांना सैनिकी शिस्तीने शिकवावे लागणार. त्यासाठी रोजचे तापमान मोजण्यापासून, स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. (यात शिक्षणाची गती कमी होणारच).  - मुलांच्या वर्गातले प्रचलित शिक्षण व त्याचवेळेस आॅनलाईन शिक्षण याचा समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना करावीच लागणार. (त्यातून स्क्रीनचे व्यसन अजून वाढणार).  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  - मुले मोकळ्या हवेत खेळलीच पाहिजेत, नाहीतर त्यांचे बालपण कोमेजणार. पण मग हे खेळताना डोक्याला डोके लागणारच. (दोन मीटर अंतर ठेऊन खेळण्याचे खेळ शोधणे हे आव्हानच असणार).  - शाळेबरोबर क्लासला पाठवायला लागणार हेही कटू सत्य. आता क्लास चालवायचे तर तेथेही कोरोना शिकायला येणार. कोरोनाला दाराबाहेर ठेवायचे तर क्लाससाठीही स्वयंघोषित सुरक्षिततेचे नियम लागणार. (पालकांना त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार).  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - मुलांची कलात्मक अभिव्यक्ती (मग ते गाणे, वादन, नृत्य किंवा चित्रकला असो) कोरोनाच्या लढाईत ‘लॉक' होणार की, काय ही वेगळीच भीती. आता कलाशिक्षकांना ‘चौकटीत राहून कलेचा मुक्त अविष्कार' कसा शिकवायचा याप्रश्‍नाचे कलात्मक उत्तर शोधायचे आहे.  - मुलांचे ‘खाणे-पिणे‘ हा प्रत्येक आईबाबांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आता शाळेत डबा खाताना हात कधी धुवायचे, एकमेकांच्या डब्यातले खायचे का, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आईवडिलांची भूक कमी होण्याची चिन्हे आहेत.  - शिशू शाळेत जाणा-या मुलांना ‘खरचं शाळेत पाठवायचे का,‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘सध्यातरी नाही‘ असे असले तरी आपल्या चिमुरड्यात उद्याचा आईनस्टाईन बघणा-या पालकांना कदाचित त्या छोट्यांना टीव्ही, संगणकासमोर बसवण्याचा मोह होणारच.  -मुलांची पावसाळ्यातली आजारपणे, बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे या सगळ्या प्रश्‍नांकडे आता वेगळ्या सुरक्षित पण त्याचवेळेस सकारात्मक पद्धतीने बघायची वेळ प्रत्येक आईवडिलांवर येणार आहे.  - सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे तो मुलांना ‘आनंदी‘ ठेवण्याचा. त्यांना भितीशी सामना करायला शिकवण्याचा. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्‍वास टिकवण्याचा.  या व अशा अनेक छोट्या, मोठ्या प्रश्‍नांचे पालकांना एकच उत्तर हवे असेल तर कोरोनाची अचूक माहिती, सुरक्षिततेच्या नियमांची जाण व अंमलबजावणी, खूप सारा संयम, आनंदी आणि भयमुक्त पालकत्व म्हणजे यशस्वी पालकत्व.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 31, 2020

सुरक्षित पण सुजाण पालकत्व  कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे ‘पालकत्वाची‘ परिभाषाच बदलायला लागली आहे. पण म्हणून मुले घरातच कोंडून ठेवणे हेही शक्य नाही. आपण सुरक्षित पण सुजाण पालकत्वाचे काही सोपे नियम सध्या पाळू शकू.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - मुलांना शाळेत सोडताना-आणताना रिक्षा, व्हॅनसाठी ‘सोशल डिस्टन्सिंग'चे कडक नियम पालकांनीच घालून दिले पहिजेत. (अर्थात त्याची आर्थिक किंमत मोजावी लागणार).  - मुलांना शाळेत प्रवेश करण्यापासून स्वच्छतेचे, सुरक्षिततेचे सगळे नियम शिक्षकांना सैनिकी शिस्तीने शिकवावे लागणार. त्यासाठी रोजचे तापमान मोजण्यापासून, स्वच्छतागृहापर्यंत प्रत्येक ठिकाणी कष्ट घ्यावे लागणार. (यात शिक्षणाची गती कमी होणारच).  - मुलांच्या वर्गातले प्रचलित शिक्षण व त्याचवेळेस आॅनलाईन शिक्षण याचा समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत पालकांना करावीच लागणार. (त्यातून स्क्रीनचे व्यसन अजून वाढणार).  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  - मुले मोकळ्या हवेत खेळलीच पाहिजेत, नाहीतर त्यांचे बालपण कोमेजणार. पण मग हे खेळताना डोक्याला डोके लागणारच. (दोन मीटर अंतर ठेऊन खेळण्याचे खेळ शोधणे हे आव्हानच असणार).  - शाळेबरोबर क्लासला पाठवायला लागणार हेही कटू सत्य. आता क्लास चालवायचे तर तेथेही कोरोना शिकायला येणार. कोरोनाला दाराबाहेर ठेवायचे तर क्लाससाठीही स्वयंघोषित सुरक्षिततेचे नियम लागणार. (पालकांना त्यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार).  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा - मुलांची कलात्मक अभिव्यक्ती (मग ते गाणे, वादन, नृत्य किंवा चित्रकला असो) कोरोनाच्या लढाईत ‘लॉक' होणार की, काय ही वेगळीच भीती. आता कलाशिक्षकांना ‘चौकटीत राहून कलेचा मुक्त अविष्कार' कसा शिकवायचा याप्रश्‍नाचे कलात्मक उत्तर शोधायचे आहे.  - मुलांचे ‘खाणे-पिणे‘ हा प्रत्येक आईबाबांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न. आता शाळेत डबा खाताना हात कधी धुवायचे, एकमेकांच्या डब्यातले खायचे का, अशा प्रश्‍नांची उत्तरे शोधताना आईवडिलांची भूक कमी होण्याची चिन्हे आहेत.  - शिशू शाळेत जाणा-या मुलांना ‘खरचं शाळेत पाठवायचे का,‘ या प्रश्‍नाचे उत्तर ‘सध्यातरी नाही‘ असे असले तरी आपल्या चिमुरड्यात उद्याचा आईनस्टाईन बघणा-या पालकांना कदाचित त्या छोट्यांना टीव्ही, संगणकासमोर बसवण्याचा मोह होणारच.  -मुलांची पावसाळ्यातली आजारपणे, बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे, वेळ पडल्यास रुग्णालयात दाखल करणे या सगळ्या प्रश्‍नांकडे आता वेगळ्या सुरक्षित पण त्याचवेळेस सकारात्मक पद्धतीने बघायची वेळ प्रत्येक आईवडिलांवर येणार आहे.  - सगळ्यात मुख्य मुद्दा असणार आहे तो मुलांना ‘आनंदी‘ ठेवण्याचा. त्यांना भितीशी सामना करायला शिकवण्याचा. त्यासाठी स्वतःचा आत्मविश्‍वास टिकवण्याचा.  या व अशा अनेक छोट्या, मोठ्या प्रश्‍नांचे पालकांना एकच उत्तर हवे असेल तर कोरोनाची अचूक माहिती, सुरक्षिततेच्या नियमांची जाण व अंमलबजावणी, खूप सारा संयम, आनंदी आणि भयमुक्त पालकत्व म्हणजे यशस्वी पालकत्व.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3djyJmM

No comments:

Post a Comment