सूट मिळताच, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर उमरगा (जि. उस्मानाबाद) : ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्याने काही दुकानांचे लॉक उघडले. मात्र मोठी गर्दी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून काटेकोरपणे पालन केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फ़ज्जा उडाला. दुकानदार सोमवारी (ता. चार) सकाळी आठपासून बाजारपेठेत तयारीने आले होते. सर्व आस्थापने या शब्द प्रयोगामुळे सर्वच दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाले असे वाटले; परंतु त्यात कापड मार्केटला मुभा नसल्याने दुकनादार घराकडे परतले. तब्बल दीड महिन्यानंतर अनेक ऑटोरिक्षाचालक बाहेर पडले होते. मात्र त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. तर दुचाकीने डबलसीट जाणाऱ्यांनाही पोलिसांच्या दंडूक्याचा प्रसाद खावा लागला. दरम्यान, स्पष्ट आदेश नसल्याने सोमवारी वॉईन शॉप बंद होते. आता नवीन आदेशानुसार सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस मद्य खरेदी करता येईल. ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला कोरोनाच्या संसर्गाने सर्वांना घरी बसवले आहे; त्यातुनही विविध कारणाने रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्रीन झोनसाठी बऱ्याच सवलती मिळतील, असे अपेक्षित होते. मात्र आठवडाभरात केवळ तीन दिवस ते ही काही दुकाने चार तास उघडे ठेवण्याची मूभा देण्यात आली आहे.  सलून दुकानदारात नाराजी  सलून दुकानदारांनाही काही अटी व शर्तीवर विहित वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी होती. त्यांना घरी जाऊन व्यवसाय करण्यास मूभा दिली असली तरी किती ग्राहकांच्या घरापर्यंत जाणार, हा खरा प्रश्न आहे. दुकानात सुरक्षितरित्या व्यवसाय करता येऊ शकतो. बहुतांश दुकानदारांचा व्यवसाय किरायाच्या दुकानात असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सलून चालू करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरुनाथ विभूते, शहराध्यक्ष नागेश सोमवंशी यांनी केली.  मद्य शौकिनांची झाली निराशा  सोमवारी वॉईन शॉप उघडणार असल्याच्या ‘गुड न्यूज’ने आनंदित झालेल्या मद्य शौकिनांची निराशा झाली. सकाळ सातपासून दुकान उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दहा वाजता आज मद्य मिळणार नसल्याचे समजले. आता त्यांना बुधवारची प्रतीक्षा करावी लागणार आहे. उमरगा व लोहारा तालुक्यात एकच वॉईन शॉप असून, आठवड्यातून तीन दिवस तेही तीन तास विक्री करण्याची अट असल्याने गर्दी होणार निश्चित आहे. दुकानदारांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे, ग्राहकांनी शारीरिक अंतर ठेवून रांगेत थांबून कुठलाही गोंधळ न करता मद्य खरेदी करावे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक के. टी. ढावरे यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 4, 2020

सूट मिळताच, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर उमरगा (जि. उस्मानाबाद) : ग्रीन झोनमध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्याने काही दुकानांचे लॉक उघडले. मात्र मोठी गर्दी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून काटेकोरपणे पालन केलेल्या सोशल डिस्टन्सिंगचा फ़ज्जा उडाला. दुकानदार सोमवारी (ता. चार) सकाळी आठपासून बाजारपेठेत तयारीने आले होते. सर्व आस्थापने या शब्द प्रयोगामुळे सर्वच दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाले असे वाटले; परंतु त्यात कापड मार्केटला मुभा नसल्याने दुकनादार घराकडे परतले. तब्बल दीड महिन्यानंतर अनेक ऑटोरिक्षाचालक बाहेर पडले होते. मात्र त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. तर दुचाकीने डबलसीट जाणाऱ्यांनाही पोलिसांच्या दंडूक्याचा प्रसाद खावा लागला. दरम्यान, स्पष्ट आदेश नसल्याने सोमवारी वॉईन शॉप बंद होते. आता नवीन आदेशानुसार सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस मद्य खरेदी करता येईल. ज्येष्ठांना मिळणार घरातच वैद्यकीय सल्ला कोरोनाच्या संसर्गाने सर्वांना घरी बसवले आहे; त्यातुनही विविध कारणाने रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ग्रीन झोनसाठी बऱ्याच सवलती मिळतील, असे अपेक्षित होते. मात्र आठवडाभरात केवळ तीन दिवस ते ही काही दुकाने चार तास उघडे ठेवण्याची मूभा देण्यात आली आहे.  सलून दुकानदारात नाराजी  सलून दुकानदारांनाही काही अटी व शर्तीवर विहित वेळेत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यायला हवी होती. त्यांना घरी जाऊन व्यवसाय करण्यास मूभा दिली असली तरी किती ग्राहकांच्या घरापर्यंत जाणार, हा खरा प्रश्न आहे. दुकानात सुरक्षितरित्या व्यवसाय करता येऊ शकतो. बहुतांश दुकानदारांचा व्यवसाय किरायाच्या दुकानात असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सलून चालू करण्यासंदर्भात आदेश द्यावेत, अशी मागणी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरुनाथ विभूते, शहराध्यक्ष नागेश सोमवंशी यांनी केली.  मद्य शौकिनांची झाली निराशा  सोमवारी वॉईन शॉप उघडणार असल्याच्या ‘गुड न्यूज’ने आनंदित झालेल्या मद्य शौकिनांची निराशा झाली. सकाळ सातपासून दुकान उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दहा वाजता आज मद्य मिळणार नसल्याचे समजले. आता त्यांना बुधवारची प्रतीक्षा करावी लागणार आहे. उमरगा व लोहारा तालुक्यात एकच वॉईन शॉप असून, आठवड्यातून तीन दिवस तेही तीन तास विक्री करण्याची अट असल्याने गर्दी होणार निश्चित आहे. दुकानदारांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे, ग्राहकांनी शारीरिक अंतर ठेवून रांगेत थांबून कुठलाही गोंधळ न करता मद्य खरेदी करावे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निबंधक के. टी. ढावरे यांनी सांगितले.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2W6hzmu

No comments:

Post a Comment