खरीप हंगामासाठी राज्य सरकारने कसली कंबर; जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा! पुणे - खरिप हंगामासाठी पुणे जिल्ह्याला पावणेदोन लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. सध्या जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा आहे. यामुळे यंदा खरिप हंगामात लॉकडाउन सुरू असले तरीही खरिपासाठी खते व बियाणांचा तुटवडा भासणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, खते व बियाणांची जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी १५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.  गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा ४५ हजार २३७ मेट्रिक टन रासायनिक खते आणि पाच हजार क्विंटल बियाणे जादा उपलब्ध झाले आहे. शिवाय मागील वर्षातील ११ हजार ४७४ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. शिवाय बियाणे पुरवठादारांनी मंजुर साठ्यापेक्षा अधिक बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले. पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचा निर्णय झाला; जाणून घ्या परीक्षेचं स्वरूप! पुणे जिल्ह्यातील तेरा पैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून  जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे हे खरीप गावे आहेत.  जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (ऊसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी उसाचे क्षेत्र १ लाख ३१ हजार हेक्टर आहे. त्यामुळे खरिप पिकांसाठी दोन लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे.  जिल्ह्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण रासायनिक खतांपैकी १ लाख एक हजार ६१० टन सरळ खते आणि ७६ हजार ४३० संयुक्त खते असणार आहेत. गेल्यावर्षी हीच खते ७८ हजार ११९ आणि ५४ हजार ६८४ टन इतकी उपलब्ध झाली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे २३ हजार ४९१ आणि २१ हजार ७४६ इतका खतांचा जादा साठा उपलब्ध झाला आहे.  आणखी वाचा - तुमची मुलं घरात इंटरनेटवर काय पाहतात बघा! खरिपातील पिकांसाठी पुणे जिल्ह्याला रासायनिक खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खते, बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही. तरीही कृत्रीम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. - संजय विश्वासराव, प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी, पुणे. लॉकडाउनमुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून खतांची टंचाई जाणवत होती. परंतू आता हळूहळू ही टंचाई दूर होऊ लागली आहे. जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय खते व बियाणे पुरवठा होऊ लागला आहे.  - अशोक घोडके, शेतकरी, जुन्नर. आणखी वाचा - फुकट काम करा, नाही तर राजीनामा द्या; आयटी कर्मचाऱ्यांवर दबाव प्रमुख पिकांसाठी मंजूर बियाणे (क्विंटलमध्ये)  - भात --- १३ हजार २००. - सोयाबीन --- ५ हजार ५००. - मका --- २ हजार. - संकरित बाजरी --- १ हजार ४००. - भूईमूग --- १ हजार २००. - वाटाणा --- ९४४. - ढेंचा --- ६००. - ताग --- ३६३. - मूग --- ३००. - तूर --- २११. - उडीद --- १५०. - संकरित ज्वारी --- ७७. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 16, 2020

खरीप हंगामासाठी राज्य सरकारने कसली कंबर; जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा! पुणे - खरिप हंगामासाठी पुणे जिल्ह्याला पावणेदोन लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि २६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. सध्या जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा आहे. यामुळे यंदा खरिप हंगामात लॉकडाउन सुरू असले तरीही खरिपासाठी खते व बियाणांचा तुटवडा भासणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, खते व बियाणांची जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी १५ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.  गेल्या वर्षीच्या खरीप हंगामाच्या तुलनेत यंदा ४५ हजार २३७ मेट्रिक टन रासायनिक खते आणि पाच हजार क्विंटल बियाणे जादा उपलब्ध झाले आहे. शिवाय मागील वर्षातील ११ हजार ४७४ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. शिवाय बियाणे पुरवठादारांनी मंजुर साठ्यापेक्षा अधिक बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले. पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचा निर्णय झाला; जाणून घ्या परीक्षेचं स्वरूप! पुणे जिल्ह्यातील तेरा पैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून  जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे हे खरीप गावे आहेत.  जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (ऊसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी उसाचे क्षेत्र १ लाख ३१ हजार हेक्टर आहे. त्यामुळे खरिप पिकांसाठी दोन लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे.  जिल्ह्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण रासायनिक खतांपैकी १ लाख एक हजार ६१० टन सरळ खते आणि ७६ हजार ४३० संयुक्त खते असणार आहेत. गेल्यावर्षी हीच खते ७८ हजार ११९ आणि ५४ हजार ६८४ टन इतकी उपलब्ध झाली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे २३ हजार ४९१ आणि २१ हजार ७४६ इतका खतांचा जादा साठा उपलब्ध झाला आहे.  आणखी वाचा - तुमची मुलं घरात इंटरनेटवर काय पाहतात बघा! खरिपातील पिकांसाठी पुणे जिल्ह्याला रासायनिक खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खते, बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही. तरीही कृत्रीम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. - संजय विश्वासराव, प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी, पुणे. लॉकडाउनमुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून खतांची टंचाई जाणवत होती. परंतू आता हळूहळू ही टंचाई दूर होऊ लागली आहे. जिल्हा स्तरावरून तालुकानिहाय खते व बियाणे पुरवठा होऊ लागला आहे.  - अशोक घोडके, शेतकरी, जुन्नर. आणखी वाचा - फुकट काम करा, नाही तर राजीनामा द्या; आयटी कर्मचाऱ्यांवर दबाव प्रमुख पिकांसाठी मंजूर बियाणे (क्विंटलमध्ये)  - भात --- १३ हजार २००. - सोयाबीन --- ५ हजार ५००. - मका --- २ हजार. - संकरित बाजरी --- १ हजार ४००. - भूईमूग --- १ हजार २००. - वाटाणा --- ९४४. - ढेंचा --- ६००. - ताग --- ३६३. - मूग --- ३००. - तूर --- २११. - उडीद --- १५०. - संकरित ज्वारी --- ७७. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bDF9eD

No comments:

Post a Comment