सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू - उद्धव ठाकरे मुंबई - ‘राज्यातून कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू,’’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनची अंमलबजावणी चांगली केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता. आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य सरकारबरोबर आहोत, असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून या चर्चेत सहभागी झाले होते. कोरोनाच्या साथीतही राज्यभरात रोजगाराची सुवर्णसंधी मुख्यमंत्री म्हणाले... - लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही - मे अखेरीपर्यंत सर्वांना काळजी घ्यायची आहे. - चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.   - व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे.  - परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी  घेऊन आम्ही गावी पाठवत आहोत.  - मदतीसाठी केंद्रीय संस्थांना विनंती केली  नेत्यांच्या सूचना एक्झिट प्लॅन काय : राज ठाकरे मुंबई - सध्या लॉकडाऊन आहे त्याबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे,  जेव्हा केव्हा लॉकडाऊन काढणार, त्याबाबत एक्झिट प्लॅन असावा. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना आधी सांगावे, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली. देवेंद्र फडणवीस मुंबईवर विशेष लक्ष ठेवावे गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे  आजारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी नियोजन हवे रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे प्रशासनामध्ये योग्य समन्वय हवा  परराज्यातील कामगारांसाठी गाड्या मागा  पोलिसांना पुरेसे संरक्षण हवे अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत राज ठाकरे कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना घरी सोडा राज्यात परतल्यानंतर परप्रांतीय कामगारांची तपासणी हवी कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी हवी  यापुढे लॉकडाऊन करताना आगाऊ सूचना द्यावी   प्रकाश आंबेडकर कापूस खरेदी थांबवू नये संस्थांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापू नये शेतीकडे लक्ष द्या कुंभार समाजाकडे मातीची रॉयल्टी मागू नका नाभिक समाजाला दिलासा द्या राज यांनी मास्क घातलाच नाही मंत्रिमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीस उपस्थित राहणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मास्क घालून आले नव्हते. बैठकीनंतर राज यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही पत्रकारांनी त्यांना यावेळी मास्कबाबत विचारणा केली असता तुम्ही तो घातला असल्याने मी घातलेला नाही असे मिश्‍कील उत्तर त्यांनी दिले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 7, 2020

सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू - उद्धव ठाकरे मुंबई - ‘राज्यातून कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू,’’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लॉकडाउनची अंमलबजावणी चांगली केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता. आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले. ठाकरे यांनी आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य सरकारबरोबर आहोत, असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून या चर्चेत सहभागी झाले होते. कोरोनाच्या साथीतही राज्यभरात रोजगाराची सुवर्णसंधी मुख्यमंत्री म्हणाले... - लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही - मे अखेरीपर्यंत सर्वांना काळजी घ्यायची आहे. - चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.   - व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे.  - परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी  घेऊन आम्ही गावी पाठवत आहोत.  - मदतीसाठी केंद्रीय संस्थांना विनंती केली  नेत्यांच्या सूचना एक्झिट प्लॅन काय : राज ठाकरे मुंबई - सध्या लॉकडाऊन आहे त्याबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय आहे,  जेव्हा केव्हा लॉकडाऊन काढणार, त्याबाबत एक्झिट प्लॅन असावा. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना आधी सांगावे, अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला केली. देवेंद्र फडणवीस मुंबईवर विशेष लक्ष ठेवावे गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे  आजारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी नियोजन हवे रुग्णांचे इतर संपर्क मोठ्या प्रमाणावर शोधले पाहिजे प्रशासनामध्ये योग्य समन्वय हवा  परराज्यातील कामगारांसाठी गाड्या मागा  पोलिसांना पुरेसे संरक्षण हवे अर्थव्यवस्था सुरु करताना क्षेत्रनिहाय तज्ञांचे गट करावेत राज ठाकरे कंटेनमेंट झोन्सच्या ठिकाणी पोलीस बळ वाढवावे लागेल  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना घरी सोडा राज्यात परतल्यानंतर परप्रांतीय कामगारांची तपासणी हवी कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी हवी  यापुढे लॉकडाऊन करताना आगाऊ सूचना द्यावी   प्रकाश आंबेडकर कापूस खरेदी थांबवू नये संस्थांनी कर्मचाऱ्यांचे पगार कापू नये शेतीकडे लक्ष द्या कुंभार समाजाकडे मातीची रॉयल्टी मागू नका नाभिक समाजाला दिलासा द्या राज यांनी मास्क घातलाच नाही मंत्रिमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीस उपस्थित राहणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मास्क घालून आले नव्हते. बैठकीनंतर राज यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली. काही पत्रकारांनी त्यांना यावेळी मास्कबाबत विचारणा केली असता तुम्ही तो घातला असल्याने मी घातलेला नाही असे मिश्‍कील उत्तर त्यांनी दिले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SJmck0

No comments:

Post a Comment