पोलिसांची व्यथा : आधी उन्हाचे चटके, आता पाऊस झोडपणार! औरंगाबाद - सामान्यवेळी एखादा दरोडा पडला, दंगल झाली तर तिथे बंदोबस्तावर गेल्यास जखम झाली तर रुग्णालयात जाऊ, उपचार घेऊ अन् बरेही होऊ. तिथे घर सुरक्षित राहते. पण, कोरोनासाठीच्या बंदोबस्तात आम्ही धोक्यात असतो आणि आमचे कुटुंबीयही धोक्यात आहेत, अशा भावना पोलिसांच्या आहेत. पण, त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आता रोटेशन पद्धतीने बंदोबस्त देण्याची गरज आहे.  राज्यातील कोरोनाचे संकट पाहता वैद्यकीय आणि पोलिस सेवा अत्यंत व्यस्त आहे. पोलिसांवरील ताण मोठा आहे. पोलिस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव, लागण आणि मृत्यू ही गंभीर स्थिती आहे. अशा काळात जीव धोक्यात घालून पोलिस ताणतणाव, रोष व हल्ले झेलून काम करीत आहेत. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे कुटुंब, मानसिक तणाव यात अनेक पोलिस अडकले आहेत. मनाची घालमेलही होत आहे. २३ मार्चपासून पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे पोलिस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हाचे चटके सहन करीत आहेत. तीन महिने वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीत अनेक पोलिस कोरोनाचे शिकार झाले. राज्यात चोवीस तासांत ९१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. आतापर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला असल्याने पोलिसांना या काळातही रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. आता काही दिवसांत पावसाचा फटकाराही पोलिसांना बसणार आहे. अशा पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तात रोटेशन पद्धतीसह इतर उपाय अवलंबून दिलासा देण्याची गरज आहे.  बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...    भावनिक कोंडी  आम्ही घरात आहेत; पण घरात असल्यासारखे नाही! स्वतःला आयसोलेट करूनच राहतो. स्वतंत्र खोलीत. कुटुंबीयांना आमच्या खोलीत प्रवेश नसतो. मुलांसोबत जास्त बसणे नाही, बोलणेही कमीच असते. मनाची स्थितीही बिकट होते. प्रशासनाकडून दिलासा मिळायला हवा. आराम मिळायला हवा. पोलिसांनाही विश्रांती मिळावी. रिलीफची गरज आहे, अशी भावना पोलिसांची आहे.    हे करता येईल...  रोटेशन पद्धतीने पोलिसांना आराम देता येईल. साईड ब्रॅंचमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे.  तेथे काम करणाऱ्या पोलिसांनाही ठराविक काळासाठी बंदोबस्तावर पाठवायला हवे. औरंगाबादेत आयआरबी, हिंगोली, जालना येथे एसआरपी, नांदेडला सीआरपी आहे. ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत तेथे त्यांचा उपयोग घ्यावा.  परिणामी मुख्य बंदोबस्तावर असलेल्यांना आराम मिळू शकेल. अशा रोटेशन पद्धतीचा अवलंब व्हावा.  सुविधाही मिळाव्यात  पावसामुळे पोलिसांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. जालना पोलिस दलात रेनकोट, छत्र्या व इतर साहित्य तसेच पीपीई किटही मिळत आहेत. विशेषतः येथील एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह नाही. या पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही मिळाव्यात, अशी अपेक्षाही पोलिसांची आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 31, 2020

पोलिसांची व्यथा : आधी उन्हाचे चटके, आता पाऊस झोडपणार! औरंगाबाद - सामान्यवेळी एखादा दरोडा पडला, दंगल झाली तर तिथे बंदोबस्तावर गेल्यास जखम झाली तर रुग्णालयात जाऊ, उपचार घेऊ अन् बरेही होऊ. तिथे घर सुरक्षित राहते. पण, कोरोनासाठीच्या बंदोबस्तात आम्ही धोक्यात असतो आणि आमचे कुटुंबीयही धोक्यात आहेत, अशा भावना पोलिसांच्या आहेत. पण, त्या ते व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आता रोटेशन पद्धतीने बंदोबस्त देण्याची गरज आहे.  राज्यातील कोरोनाचे संकट पाहता वैद्यकीय आणि पोलिस सेवा अत्यंत व्यस्त आहे. पोलिसांवरील ताण मोठा आहे. पोलिस दलात कोरोना विषाणूचा शिरकाव, लागण आणि मृत्यू ही गंभीर स्थिती आहे. अशा काळात जीव धोक्यात घालून पोलिस ताणतणाव, रोष व हल्ले झेलून काम करीत आहेत. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे कुटुंब, मानसिक तणाव यात अनेक पोलिस अडकले आहेत. मनाची घालमेलही होत आहे. २३ मार्चपासून पोलिस बांधव रस्त्यावर उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे पोलिस जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हाचे चटके सहन करीत आहेत. तीन महिने वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीत अनेक पोलिस कोरोनाचे शिकार झाले. राज्यात चोवीस तासांत ९१ पोलिसांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. आतापर्यंत २ हजार ४१६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. २६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढला असल्याने पोलिसांना या काळातही रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहावे लागणार आहे. आता काही दिवसांत पावसाचा फटकाराही पोलिसांना बसणार आहे. अशा पोलिसांसाठी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्तात रोटेशन पद्धतीसह इतर उपाय अवलंबून दिलासा देण्याची गरज आहे.  बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...    भावनिक कोंडी  आम्ही घरात आहेत; पण घरात असल्यासारखे नाही! स्वतःला आयसोलेट करूनच राहतो. स्वतंत्र खोलीत. कुटुंबीयांना आमच्या खोलीत प्रवेश नसतो. मुलांसोबत जास्त बसणे नाही, बोलणेही कमीच असते. मनाची स्थितीही बिकट होते. प्रशासनाकडून दिलासा मिळायला हवा. आराम मिळायला हवा. पोलिसांनाही विश्रांती मिळावी. रिलीफची गरज आहे, अशी भावना पोलिसांची आहे.    हे करता येईल...  रोटेशन पद्धतीने पोलिसांना आराम देता येईल. साईड ब्रॅंचमध्येही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे.  तेथे काम करणाऱ्या पोलिसांनाही ठराविक काळासाठी बंदोबस्तावर पाठवायला हवे. औरंगाबादेत आयआरबी, हिंगोली, जालना येथे एसआरपी, नांदेडला सीआरपी आहे. ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत तेथे त्यांचा उपयोग घ्यावा.  परिणामी मुख्य बंदोबस्तावर असलेल्यांना आराम मिळू शकेल. अशा रोटेशन पद्धतीचा अवलंब व्हावा.  सुविधाही मिळाव्यात  पावसामुळे पोलिसांपुढे मोठे संकट उभे राहणार आहे. जालना पोलिस दलात रेनकोट, छत्र्या व इतर साहित्य तसेच पीपीई किटही मिळत आहेत. विशेषतः येथील एकही पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह नाही. या पोलिसांना मिळणाऱ्या सुविधा इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही मिळाव्यात, अशी अपेक्षाही पोलिसांची आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dohb8X

No comments:

Post a Comment