पालक दिन विशेष : मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणा -  उपेंद्र लिमये ‘कोरोना’सारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. या परिस्थितीत मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे.  ‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वजण गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरातच अडकून पडले आहेत. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या पालकांसाठी ही खूपच मोठी घटना आहे. माझ्यासह आधीच्या चार पिढ्यांनी अशी परिस्थिती अनुभवली नसल्यानं पालक म्हणून एक वेगळीच जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली. खरंतर आतापर्यंत पालकांना आपल्या पाल्यांना वेळच देत येत नव्हता, मात्र तिच्यात लॉकडाउनमुळं आमुलाग्र बदल घडला. पालकांनी मुलांशी संवाद साधणं अपेक्षित असतं. लॉकडाउनमुळं हा संवाद वाढला. त्या अर्थानं मी लॉकडाउन ही सकारात्मक गोष्ट मानतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या व्यवसायात खरंतर ९ ते ५ ही कामाची वेळ नाही. त्यातच पावसाळ्याच्या आधी चित्रीकरण पूर्ण करायचं असल्यानं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना मी कामात बिझी असायचो. त्यामुळं मुलांशी माझा पुरेसा संवाद होत नव्हता. माझा मुलगा आता दहावीत गेला आहे, तर मुलगी २३ वर्षांची आहे. वडील म्हणून माझ्यावरची जबाबदारीही मोठी आहे. विशेषतः, समाजावर कोरोनासारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना बातम्या पाहून, आजूबाजूची दृश्‍यं पाहून अनेक प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं देताना तुम्हाला जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं होतं आणि ते मी साधलं. माझं माझ्या मुलांशी पहिल्यापासूनच मित्रत्वाचं नातं असल्यानं हे सहज साध्य झालं.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  या काळात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपलं घर सुरळीत चालण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्यात स्वयंपाक, धुणे, भांडी, केर-कचरा, गाडी पुसणं या गोष्टी करणाऱ्यांची मदत लागत असते. ‘कोरोना’मुळं ही सगळी कामं कुटुंबावर येऊन पडली. मी पहिल्याच आठवड्यात सर्वांशी बोलून प्रत्येक सहस्याची जबाबदारी निश्‍चित केली. त्यामुळं मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्याकडं दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्‍ता आला, मुलांकडं घराची सफाई आणि पत्नीनं बाकीची कामं स्वीकारली. त्यामुळं गेले ७० दिवस आमचं घर चकाचक राहिलं आहे. मी रोजच्या पोळी-भाजीबरोबरच मिसळ, दहीवडा, कट वडा, इडली-सांबरासारखे अनेक पदार्थ करायला शिकलो. हे पदार्थ बनविण्यासाठी मला यू-ट्यूबबरोबरच शेफ विष्णू मनोहर यांचीही मदत झाली. हे पदार्थ खाताना माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरची तृप्ती मला खूप मोठा आनंद देऊन गेली.  माझ्या मुलानं कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या सेलिब्रिटिजना पाहून, ‘‘बाबा, तू लोकांना अशी मदत करणार आहेस का,’ असा प्रश्‍न विचारला. मी तशा संधीची वाट पाहात होतो. माझी पत्नी होमिओपॅथी डॉक्टर आहे व ‘आयुष’ मंत्रालयानं ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधाला मान्यता दिल्यानंतर आम्ही मी राहत असलेल्या गोरेगाव परिसरात हे औषध मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. औषध तयार करण्याचं काम माझ्या पत्नीकडं होतं, तर बाटल्यांवर लेबल चिकटवणं, पॅकिंग, स्टेपलिंग व त्याची नोंद ठेवणारे एक्सएल शीट तयार करण्याचं काम मी व माझ्या मुलांनी केलं. गेल्या २० दिवसांत आम्ही तब्बल १६ हजार जणांना या औषधाचं वाटप केलं. हे काम आम्ही एकही फोटो न काढता किंवा सेल्फी न घेता केलं, हे विशेष!  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या काळात मुलांची मानसिकता सकारात्मक राहणं, ते कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी बातम्या दिवसातून दोनदा व गरजेपुरत्याच पाहण्याचा निर्णय घेतला. रोज रात्री आम्ही ‘बदाम सात’चे सात डाव खेळतो आहे आणि त्याचा रेकॉर्डही ठेवला आहे! जुने चित्रपटही पाहिले. माझा मुलगा दहावीत गेला असून, आम्ही त्याच्यावर या परिस्थितीत अभ्यासासाठी कोणताही दबाब आणला नाही. त्यामुळं मुलांचा उत्साह अद्याप टिकून आहे. ही परिस्थिती पालक म्हणून तुम्ही चुकीचं वागल्यास नात्यांना तडा जाईल, अशीच आहे. मुलांना वेळ देऊन, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून या परिस्थितीतून बाहेर पडायला त्यांना मदत करणं ही पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे. पालक दिनानिमित्त माझा पालकांना हाच संदेश आहे...  पालकांनो, हे लक्षात असूद्या...  - मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा.  - मोठ्या संकटात जबाबदारीचं भान ठेवा.  - परिस्थितीवर टोकाच्या प्रतिक्रिया देणं टाळा.  - घरातील कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.  - ताणामुळं मुलं कोमेजून जाणार नाहीत, याची काळजी घ्या.  (शब्दांकन - महेश बर्दापूरकर)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 31, 2020

पालक दिन विशेष : मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणा -  उपेंद्र लिमये ‘कोरोना’सारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे. या परिस्थितीत मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे ही पालक म्हणून तुमची जबाबदारी आहे.  ‘कोरोना’मुळे देशभरात लॉकडाउन जाहीर झाला आणि सर्वजण गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ घरातच अडकून पडले आहेत. पुण्या-मुंबईसारख्या महानगरांत राहणाऱ्या पालकांसाठी ही खूपच मोठी घटना आहे. माझ्यासह आधीच्या चार पिढ्यांनी अशी परिस्थिती अनुभवली नसल्यानं पालक म्हणून एक वेगळीच जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडली. खरंतर आतापर्यंत पालकांना आपल्या पाल्यांना वेळच देत येत नव्हता, मात्र तिच्यात लॉकडाउनमुळं आमुलाग्र बदल घडला. पालकांनी मुलांशी संवाद साधणं अपेक्षित असतं. लॉकडाउनमुळं हा संवाद वाढला. त्या अर्थानं मी लॉकडाउन ही सकारात्मक गोष्ट मानतो.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप माझ्या व्यवसायात खरंतर ९ ते ५ ही कामाची वेळ नाही. त्यातच पावसाळ्याच्या आधी चित्रीकरण पूर्ण करायचं असल्यानं मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना मी कामात बिझी असायचो. त्यामुळं मुलांशी माझा पुरेसा संवाद होत नव्हता. माझा मुलगा आता दहावीत गेला आहे, तर मुलगी २३ वर्षांची आहे. वडील म्हणून माझ्यावरची जबाबदारीही मोठी आहे. विशेषतः, समाजावर कोरोनासारखं मोठं संकट येतं, तेव्हा पालक म्हणून तुम्ही कसे रिॲक्ट होता, हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना बातम्या पाहून, आजूबाजूची दृश्‍यं पाहून अनेक प्रश्‍न पडतात. या प्रश्‍नांची उत्तरं देताना तुम्हाला जबाबदारीचं भान असणं गरजेचं आहे. मुलांना वस्तूस्थितीचं भान आणून देणं, मात्र त्याचवेळी त्यांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होणार नाही, हे पाहणंही तेवढंच गरजेचं होतं आणि ते मी साधलं. माझं माझ्या मुलांशी पहिल्यापासूनच मित्रत्वाचं नातं असल्यानं हे सहज साध्य झालं.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  या काळात जाणवलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपलं घर सुरळीत चालण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्यात स्वयंपाक, धुणे, भांडी, केर-कचरा, गाडी पुसणं या गोष्टी करणाऱ्यांची मदत लागत असते. ‘कोरोना’मुळं ही सगळी कामं कुटुंबावर येऊन पडली. मी पहिल्याच आठवड्यात सर्वांशी बोलून प्रत्येक सहस्याची जबाबदारी निश्‍चित केली. त्यामुळं मुलांनाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव झाली. माझ्याकडं दोन्ही वेळचा स्वयंपाक, नाश्‍ता आला, मुलांकडं घराची सफाई आणि पत्नीनं बाकीची कामं स्वीकारली. त्यामुळं गेले ७० दिवस आमचं घर चकाचक राहिलं आहे. मी रोजच्या पोळी-भाजीबरोबरच मिसळ, दहीवडा, कट वडा, इडली-सांबरासारखे अनेक पदार्थ करायला शिकलो. हे पदार्थ बनविण्यासाठी मला यू-ट्यूबबरोबरच शेफ विष्णू मनोहर यांचीही मदत झाली. हे पदार्थ खाताना माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरची तृप्ती मला खूप मोठा आनंद देऊन गेली.  माझ्या मुलानं कोरोना काळात लोकांना मदत करणाऱ्या सेलिब्रिटिजना पाहून, ‘‘बाबा, तू लोकांना अशी मदत करणार आहेस का,’ असा प्रश्‍न विचारला. मी तशा संधीची वाट पाहात होतो. माझी पत्नी होमिओपॅथी डॉक्टर आहे व ‘आयुष’ मंत्रालयानं ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधाला मान्यता दिल्यानंतर आम्ही मी राहत असलेल्या गोरेगाव परिसरात हे औषध मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. औषध तयार करण्याचं काम माझ्या पत्नीकडं होतं, तर बाटल्यांवर लेबल चिकटवणं, पॅकिंग, स्टेपलिंग व त्याची नोंद ठेवणारे एक्सएल शीट तयार करण्याचं काम मी व माझ्या मुलांनी केलं. गेल्या २० दिवसांत आम्ही तब्बल १६ हजार जणांना या औषधाचं वाटप केलं. हे काम आम्ही एकही फोटो न काढता किंवा सेल्फी न घेता केलं, हे विशेष!  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या काळात मुलांची मानसिकता सकारात्मक राहणं, ते कोमेजून जाणार नाहीत याची काळजी घेणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी बातम्या दिवसातून दोनदा व गरजेपुरत्याच पाहण्याचा निर्णय घेतला. रोज रात्री आम्ही ‘बदाम सात’चे सात डाव खेळतो आहे आणि त्याचा रेकॉर्डही ठेवला आहे! जुने चित्रपटही पाहिले. माझा मुलगा दहावीत गेला असून, आम्ही त्याच्यावर या परिस्थितीत अभ्यासासाठी कोणताही दबाब आणला नाही. त्यामुळं मुलांचा उत्साह अद्याप टिकून आहे. ही परिस्थिती पालक म्हणून तुम्ही चुकीचं वागल्यास नात्यांना तडा जाईल, अशीच आहे. मुलांना वेळ देऊन, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून या परिस्थितीतून बाहेर पडायला त्यांना मदत करणं ही पालक म्हणून तुमची मुख्य जबाबदारी आहे. पालक दिनानिमित्त माझा पालकांना हाच संदेश आहे...  पालकांनो, हे लक्षात असूद्या...  - मुलांशी मित्रत्वाचं नातं ठेवा.  - मोठ्या संकटात जबाबदारीचं भान ठेवा.  - परिस्थितीवर टोकाच्या प्रतिक्रिया देणं टाळा.  - घरातील कामांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या.  - ताणामुळं मुलं कोमेजून जाणार नाहीत, याची काळजी घ्या.  (शब्दांकन - महेश बर्दापूरकर)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2MtXpNH

No comments:

Post a Comment