मुक्या जिवांसाठी तब्बल तीनशे पाणपोई  औरंगाबाद - संत नामदेव महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग आपणाला भूतदया शिकवतो, ‘हाती घेऊनी तुपाची वाटी, नामा लागे श्‍वानापाठी. तूप घे गा जगजेठी, कोरडी रोटी का खाशी’ अशी ओवी अनेकांनी कधीतरी ऐकली असेल. संत नामदेव महाराज हातामध्ये तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावले होते. या ओवीचे प्रत्यंतर लॉकडाउनच्या काळात येत आहे. मुक्या जिवांना तहान लागल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी कुठेतरी जावे आणि त्यांना कोणीतरी हुसकावून लावावे हे संवेदनशील मनाच्या काही लोकांना सहन झाले नाही. त्यांनी या तहानलेल्या जिवांसाठी काहीतरी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आणि मुक्या जिवांसाठी पाणपोई सुरू झाल्या. लॉकडाउनच्या काळातही सर्वत्र शुकशुकाट असतानाही ८० टक्के पाणपोयांमध्ये दिवसरात्र पाणी भरलेले असते.  ‘सर्वांभूती पाहे एक वासुदेव’ सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवान परमात्मा वास करतो म्हणूनच साधूसंतांनी भूतदया शिकवली. सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्‍वर असतो म्हणून त्यांची सेवा हीच ईश्‍वरसेवा असते. लॉकडाउन सुरू झाले तसे गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले. अनेकजणांचे मदत देतानाचे फोटो माध्यमांमध्ये दिसले मात्र या रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी नियमितपणे काम करणाऱ्यांनी कधी कुठे आपला फोटो छापून यावा, अशी अपेक्षा न करता काम सुरू ठेवले आहे. पीपल फॉर ॲनिमल आणि ॲनिमल पीअर्स आपापल्या स्तरावर रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी काम करतात. लॉकडाउनच्या काळात प्राणिमात्रांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र या प्राणिमित्र संघटनांच्या स्वयंसेवकांना या कामाचा आवाका मोठा असल्याने व आर्थिक मर्यादा आहेत. वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून काम करणाऱ्यांना एकत्र आणण्याचे प्राणिमात्रांविषयी कणव असणारे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काम केले आहे.  कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात   पोलिसदेखील भरतात पाणी  ॲनिमल पीअर्सचे पुष्कर शिंदे यांनी सांगितले, आम्ही रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतो. त्यानंतर ते कुठेतरी जाऊन नाल्यातले पाणी पितात. हे काही मनाला पटत नाही. यामुळे आम्ही प्राणिमात्रांसाठी पाणपोई ही संकल्पना राबवली. हे पहिलेच वर्ष आहे. मार्च महिन्याला सुरवात झाली तेव्हा पहिली पाणपोई सुरू केली आणि तब्बल २५० पाणपोई सुरू झाल्या आहेत. आता विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मोकाट कुत्र्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ५० भांडी दिली आहेत. यामुळे आता शहरात ३०० पाणपोया होतील. रोज संबंधित पाणपोईजवळ राहणाऱ्यांना, व्यावसायिकांना आम्ही त्यात पाणी टाकण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यात रोज पाणी भरले जाते. सध्या लॉकडाउन असतानादेखील ८० टक्के पाणपोया पाण्याने भरलेल्या असतात हे लोकांमध्ये मुक्या जिवांविषयी निर्माण झालेल्या प्रेमभावनेचेच लक्षण आहे. सध्या लॉकडाउनमुळे जागोजागी पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यांना पिण्यासाठी दिलेल्या जारमधून तेदेखील या पाणपोयांमध्ये पाणी भरून ठेवत आहेत.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा अन्नपाणी देण्यासाठी घ्यावा पुढाकार  चिकलठाणा, नारेगाव, टीव्ही सेंटर, पिसादेवी, मयूरपार्क, हडको परिसर, आझाद चौक, जिन्सी, चिश्‍तिया कॉलनी, कैलासनगर, किराडपुरा, बायजीपुरा, समर्थनगर, हज हाऊस, गुलमोहर कॉलनी, पाणचक्की, हर्सूल, जटवाडा रोड, पहाडसिंगपुरा, मिलकॉर्नर, छावणी परिसर, घाटी परिसर, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा, गुलमंडी चौक, जुना मोंढा, रोकडा हनुमान परिसर, अभिनय टॉकीज परिसर, जाफर गेट, पैठण गेट, निराला बाझार, क्रांती चौक, सिटी चौक, जुना बाजार, शनिमंदिर, मुकुंदवाडी, प्रकाशनगर, मुकुंदनगर, वृंदावननगर, रेणुकानगर, ज्ञानेश्‍वरनगर, शिवाजीनगर, देवळाई परिसर, रेणुकामाता मंदिर, रेल्वेस्टेशन, एमआयटी परिसर, सुधाकरनगर, प्रतापनगर, संग्रामनगर, जिल्हा परिषद परिसर या ठिकाणी प्राणिमात्रांना मदत पोचत नसल्याने या भागातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी पुष्कर शिंदे (९४०३७७४०४९) यांच्याशी संपर्क करावा. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  पीपल फॉर ॲनिमल आणि ॲनिमल पीअर्स आपापल्या स्तरावर खूप उत्तम काम करत आहेत. मुक्या जिवांसाठी आम्ही नुसता पुढाकार घेतला आहे. या कामात थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न आहे. क्वारंटाइन एरियात प्राण्यांचे फार हाल होत आहेत. मोकाट कुत्रेदेखील सोसायटीचाच भाग आहेत. त्यांना आपण हाकलून देऊ शकत नाही. सध्या लोकांनीही तिथे मदतीसाठी पुढे आले पाहिजे.   डॉ. रवींद्र कुमार सिंगल  विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र)    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 3, 2020

मुक्या जिवांसाठी तब्बल तीनशे पाणपोई  औरंगाबाद - संत नामदेव महाराज यांच्या जीवनातील एक प्रसंग आपणाला भूतदया शिकवतो, ‘हाती घेऊनी तुपाची वाटी, नामा लागे श्‍वानापाठी. तूप घे गा जगजेठी, कोरडी रोटी का खाशी’ अशी ओवी अनेकांनी कधीतरी ऐकली असेल. संत नामदेव महाराज हातामध्ये तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावले होते. या ओवीचे प्रत्यंतर लॉकडाउनच्या काळात येत आहे. मुक्या जिवांना तहान लागल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी कुठेतरी जावे आणि त्यांना कोणीतरी हुसकावून लावावे हे संवेदनशील मनाच्या काही लोकांना सहन झाले नाही. त्यांनी या तहानलेल्या जिवांसाठी काहीतरी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आणि मुक्या जिवांसाठी पाणपोई सुरू झाल्या. लॉकडाउनच्या काळातही सर्वत्र शुकशुकाट असतानाही ८० टक्के पाणपोयांमध्ये दिवसरात्र पाणी भरलेले असते.  ‘सर्वांभूती पाहे एक वासुदेव’ सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवान परमात्मा वास करतो म्हणूनच साधूसंतांनी भूतदया शिकवली. सर्व प्राणिमात्रांमध्ये ईश्‍वर असतो म्हणून त्यांची सेवा हीच ईश्‍वरसेवा असते. लॉकडाउन सुरू झाले तसे गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण सरसावले. अनेकजणांचे मदत देतानाचे फोटो माध्यमांमध्ये दिसले मात्र या रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी नियमितपणे काम करणाऱ्यांनी कधी कुठे आपला फोटो छापून यावा, अशी अपेक्षा न करता काम सुरू ठेवले आहे. पीपल फॉर ॲनिमल आणि ॲनिमल पीअर्स आपापल्या स्तरावर रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी काम करतात. लॉकडाउनच्या काळात प्राणिमात्रांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र या प्राणिमित्र संघटनांच्या स्वयंसेवकांना या कामाचा आवाका मोठा असल्याने व आर्थिक मर्यादा आहेत. वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून काम करणाऱ्यांना एकत्र आणण्याचे प्राणिमात्रांविषयी कणव असणारे औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काम केले आहे.  कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात   पोलिसदेखील भरतात पाणी  ॲनिमल पीअर्सचे पुष्कर शिंदे यांनी सांगितले, आम्ही रस्त्यावरच्या कुत्र्यांना खाऊ घालतो. त्यानंतर ते कुठेतरी जाऊन नाल्यातले पाणी पितात. हे काही मनाला पटत नाही. यामुळे आम्ही प्राणिमात्रांसाठी पाणपोई ही संकल्पना राबवली. हे पहिलेच वर्ष आहे. मार्च महिन्याला सुरवात झाली तेव्हा पहिली पाणपोई सुरू केली आणि तब्बल २५० पाणपोई सुरू झाल्या आहेत. आता विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मोकाट कुत्र्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ५० भांडी दिली आहेत. यामुळे आता शहरात ३०० पाणपोया होतील. रोज संबंधित पाणपोईजवळ राहणाऱ्यांना, व्यावसायिकांना आम्ही त्यात पाणी टाकण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यात रोज पाणी भरले जाते. सध्या लॉकडाउन असतानादेखील ८० टक्के पाणपोया पाण्याने भरलेल्या असतात हे लोकांमध्ये मुक्या जिवांविषयी निर्माण झालेल्या प्रेमभावनेचेच लक्षण आहे. सध्या लॉकडाउनमुळे जागोजागी पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यांना पिण्यासाठी दिलेल्या जारमधून तेदेखील या पाणपोयांमध्ये पाणी भरून ठेवत आहेत.  औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा अन्नपाणी देण्यासाठी घ्यावा पुढाकार  चिकलठाणा, नारेगाव, टीव्ही सेंटर, पिसादेवी, मयूरपार्क, हडको परिसर, आझाद चौक, जिन्सी, चिश्‍तिया कॉलनी, कैलासनगर, किराडपुरा, बायजीपुरा, समर्थनगर, हज हाऊस, गुलमोहर कॉलनी, पाणचक्की, हर्सूल, जटवाडा रोड, पहाडसिंगपुरा, मिलकॉर्नर, छावणी परिसर, घाटी परिसर, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा, गुलमंडी चौक, जुना मोंढा, रोकडा हनुमान परिसर, अभिनय टॉकीज परिसर, जाफर गेट, पैठण गेट, निराला बाझार, क्रांती चौक, सिटी चौक, जुना बाजार, शनिमंदिर, मुकुंदवाडी, प्रकाशनगर, मुकुंदनगर, वृंदावननगर, रेणुकानगर, ज्ञानेश्‍वरनगर, शिवाजीनगर, देवळाई परिसर, रेणुकामाता मंदिर, रेल्वेस्टेशन, एमआयटी परिसर, सुधाकरनगर, प्रतापनगर, संग्रामनगर, जिल्हा परिषद परिसर या ठिकाणी प्राणिमात्रांना मदत पोचत नसल्याने या भागातील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी पुष्कर शिंदे (९४०३७७४०४९) यांच्याशी संपर्क करावा. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  पीपल फॉर ॲनिमल आणि ॲनिमल पीअर्स आपापल्या स्तरावर खूप उत्तम काम करत आहेत. मुक्या जिवांसाठी आम्ही नुसता पुढाकार घेतला आहे. या कामात थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न आहे. क्वारंटाइन एरियात प्राण्यांचे फार हाल होत आहेत. मोकाट कुत्रेदेखील सोसायटीचाच भाग आहेत. त्यांना आपण हाकलून देऊ शकत नाही. सध्या लोकांनीही तिथे मदतीसाठी पुढे आले पाहिजे.   डॉ. रवींद्र कुमार सिंगल  विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगाबाद परिक्षेत्र)    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zYb64t

No comments:

Post a Comment