वयच काय त्यांचं? अवघं एक अन् तीन वर्षे, तरीही कोरोनासुराला केले चित औरंगाबाद : त्यांचे वयच काय? हसायचे, रुसायचे अन् थकेस्तोर मनसोक्त खेळायचे. झालेच तर हट्ट पूर्ण व्हावा, यासाठी रडायचे. पण, कोरोनासुराने त्यांनाही गाठलेच. रडत-रडत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. जीव की प्राण असलेल्या आई-वडिलांपासून कोरोनाने ताटातूट केली. डॉक्टर आणि पालकांनी घेतलेल्या काळजीमुळे पाच चिमुकल्यांनी कोरोनासुराला हरवले. यात तीन वर्षांतील तीन मुली तर दहा वर्षांतील दोन मुलांचा समावेश आहे. हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला? कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असतानाच शहरातील सिल्कमिल कॉलनीतील एक वर्षाची चिमुकली, हुसेन कॉलनीतील तीन वर्षांच्या दोन मुली, सादातनगरचा आठ आणि संजयनगर, मुकुंदवाडी येथील दहा वर्षांच्या दोन अशा पाच मुलांना कोविड-१९ ची बाधा झाली. पण, पूर्ण उपचारानंतर या मुलांनी विषाणूयुद्धात लढत कोरोनावर यशस्वी मात केली. शहरातील जिल्हा रुग्णालयातून रविवारी (ता. २४) त्यांना व इतर २३ जणांना सुटी देण्यात आली. मुलांना दूर कसं ठेवणार? मुलं म्हटली की त्यांचा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आई-वडील आजी-आजोबांना तर ते अगदी चिकटून राहतात. पण, कोरोनाचा कहर झाला आणि दोन व्यक्तीत ठरावीक अंतर राखायचेच असा नियम निघाला. मोठ्यांचे ठीक. पण, लहान मुलांना दूर कसे ठेवणार, हा प्रश्न आहेत. म्हणूनच काय की आई, वडील इतर आप्तेष्टांच्या संपर्कातून ही लेकरं बाधित झाली. क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार घरापासून दुरावली होती पाखरं कुणाचे आई-वडील, कुणाचे आजी-आजोबा बाधित. त्यांच्यापासून ही मुलंही बाधित झाली. कुणाचे फक्त चिमुकलेच बाधित झाले. त्यांना आपल्या घरापासून १० ते १४ दिवस दूर राहावे लागले. पीपीई कीट घालून त्यांना न्यायला आरोग्य योद्धे आले. तेव्हा या योद्ध्यांना या चिमुकल्यांची स्थिती पाहावत नव्हती. काही मुलांचे पालक केवळ पोटच्या गोळ्याखातर स्वतःला बाधा होईल याची पर्वा न करता रुग्णालयात बसून होते. अखेर रविवारचा दिवस उजाडला आणि या मुलांच्या चेहऱ्यावर चैतन्य घेऊन आला. त्यांच्या सुटी वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपचार करणारे डॉ. पद्मजा सराफ, डॉ. कांबळे, डॉ. शिंदे, डॉ. सुरामवाड उपस्थित होते. यांना झाली सुटी सिल्कमिल कॉलनी : २८ वर्षीय तरुण, एक वर्षीय मुलगी. हुसेन कॉलनी : ५०, ६२,६८ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय दोन तरुणी, ५७, ३१, ४८ वर्षीय महिला, ३ वर्षीय दोन मुली. सदानंद कॉलनी : ५० वर्षीय पुरुष रामनगर : ५५ वर्षीय महिला. पुंडलिकनगर : ६० वर्षीय पुरुष संजयनगर, मुकुंदवाडी :- १० वर्षीय मुलगा, ३२, ४० वर्षीय महिला. भीमनगर : ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक संभाजी कॉलनी : ५५ वर्षीय महिला चौसर कॉलनी : ५० वर्षीय पुरुष सादातनगर : ४१, २० वर्षीय तरुण, आठ वर्षीय मुलगा, २०, २८ वर्षीय तरुणी. न्यायनगर : ५० वर्षीय महिला. हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 24, 2020

वयच काय त्यांचं? अवघं एक अन् तीन वर्षे, तरीही कोरोनासुराला केले चित औरंगाबाद : त्यांचे वयच काय? हसायचे, रुसायचे अन् थकेस्तोर मनसोक्त खेळायचे. झालेच तर हट्ट पूर्ण व्हावा, यासाठी रडायचे. पण, कोरोनासुराने त्यांनाही गाठलेच. रडत-रडत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. जीव की प्राण असलेल्या आई-वडिलांपासून कोरोनाने ताटातूट केली. डॉक्टर आणि पालकांनी घेतलेल्या काळजीमुळे पाच चिमुकल्यांनी कोरोनासुराला हरवले. यात तीन वर्षांतील तीन मुली तर दहा वर्षांतील दोन मुलांचा समावेश आहे. हेही वाचा- शिवसेनेच्या नाकीनऊ आणलेल्या या माजी आमदाराने राजीनामा कुठं दिला? कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असतानाच शहरातील सिल्कमिल कॉलनीतील एक वर्षाची चिमुकली, हुसेन कॉलनीतील तीन वर्षांच्या दोन मुली, सादातनगरचा आठ आणि संजयनगर, मुकुंदवाडी येथील दहा वर्षांच्या दोन अशा पाच मुलांना कोविड-१९ ची बाधा झाली. पण, पूर्ण उपचारानंतर या मुलांनी विषाणूयुद्धात लढत कोरोनावर यशस्वी मात केली. शहरातील जिल्हा रुग्णालयातून रविवारी (ता. २४) त्यांना व इतर २३ जणांना सुटी देण्यात आली. मुलांना दूर कसं ठेवणार? मुलं म्हटली की त्यांचा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आई-वडील आजी-आजोबांना तर ते अगदी चिकटून राहतात. पण, कोरोनाचा कहर झाला आणि दोन व्यक्तीत ठरावीक अंतर राखायचेच असा नियम निघाला. मोठ्यांचे ठीक. पण, लहान मुलांना दूर कसे ठेवणार, हा प्रश्न आहेत. म्हणूनच काय की आई, वडील इतर आप्तेष्टांच्या संपर्कातून ही लेकरं बाधित झाली. क्लिक करा- घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार घरापासून दुरावली होती पाखरं कुणाचे आई-वडील, कुणाचे आजी-आजोबा बाधित. त्यांच्यापासून ही मुलंही बाधित झाली. कुणाचे फक्त चिमुकलेच बाधित झाले. त्यांना आपल्या घरापासून १० ते १४ दिवस दूर राहावे लागले. पीपीई कीट घालून त्यांना न्यायला आरोग्य योद्धे आले. तेव्हा या योद्ध्यांना या चिमुकल्यांची स्थिती पाहावत नव्हती. काही मुलांचे पालक केवळ पोटच्या गोळ्याखातर स्वतःला बाधा होईल याची पर्वा न करता रुग्णालयात बसून होते. अखेर रविवारचा दिवस उजाडला आणि या मुलांच्या चेहऱ्यावर चैतन्य घेऊन आला. त्यांच्या सुटी वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, उपचार करणारे डॉ. पद्मजा सराफ, डॉ. कांबळे, डॉ. शिंदे, डॉ. सुरामवाड उपस्थित होते. यांना झाली सुटी सिल्कमिल कॉलनी : २८ वर्षीय तरुण, एक वर्षीय मुलगी. हुसेन कॉलनी : ५०, ६२,६८ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय दोन तरुणी, ५७, ३१, ४८ वर्षीय महिला, ३ वर्षीय दोन मुली. सदानंद कॉलनी : ५० वर्षीय पुरुष रामनगर : ५५ वर्षीय महिला. पुंडलिकनगर : ६० वर्षीय पुरुष संजयनगर, मुकुंदवाडी :- १० वर्षीय मुलगा, ३२, ४० वर्षीय महिला. भीमनगर : ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक संभाजी कॉलनी : ५५ वर्षीय महिला चौसर कॉलनी : ५० वर्षीय पुरुष सादातनगर : ४१, २० वर्षीय तरुण, आठ वर्षीय मुलगा, २०, २८ वर्षीय तरुणी. न्यायनगर : ५० वर्षीय महिला. हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2AT5GI9

No comments:

Post a Comment