सोलापुरातील "हद्दवाढवासी' 28 वर्षांनंतरही "वंचित'च  सोलापूर : महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यामुळे परिसराचा विकास होईल, मूलभूत सुविधा तातडीने मिळतील, या अपेक्षेत असलेल्या सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा मात्र गेल्या 28 वर्षांत अपेक्षाभंग झाला आहे. महापालिकेचा कर 100 टक्के भरूनसुद्धा आवश्‍यक मूलभूत सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. मात्र, हद्दवाढ विभागाच्या विकासाला निश्‍चित प्राधान्य देणार असल्याचे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होताना शहराची हद्द होती फक्त 23.23 चौरस किलोमीटर. पहिल्या हद्दवाढीत शहराच्या दक्षिणेकडील नेहरूनगर, होटगी रस्त्यालगतच्या काही भागाचा समावेश झाला. दुसऱ्या हद्दवाढीत विडी घरकूल, सलगरवस्ती, भैरू वस्ती या क्षेत्रांचा समावेश झाला. शहराच्या सभोवताली झालेला नागरी विकास, औद्योगिक विकासांचा साकल्याने विचार करून 5 मे 1992 रोजी हद्दवाढ झाली ती एकदम 145.54 चौरस किलोमीटर इतकी. त्या वेळी मजरेवाडी, कुमठे, सोरेगाव, दहिटणे, देगाव, बसवेश्‍वरनगर, केगाव, कसबे सोलापूर, प्रतापनगर या गावांचा समावेश झाला. ग्रामपंचायत हद्दीत असलेले लोक मूलभूत सुविधांपासून वंचित होते. महापालिका हद्दीत आल्यानंतर या समस्या सुटतील अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.  हद्दवाढीमुळे विजयपूर आणि होटगी रस्त्याच्या दिशेने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जाळे निर्माण झाले. विकसकांनी आवश्‍यक मूलभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेवर टाकली, अनधिकृत संस्थांना सुविधा द्यायच्या नाहीत, असे धोरण महापालिकेने अवलंबिले. त्यामुळे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पण मूलभूत सुविधांची वानवा राहिली, ती कायमचीच. आजही या भागात ड्रेनेजची पुरेशी सुविधा नाही. त्यासाठी दरवर्षी महापालिका अंदाजपत्रकात मधाचे बोट दाखविले जाते. स्थानिक खासदार-आमदारांकडूनही आश्‍वासने दिली जातात. प्रत्यक्षात काहीच केले गेले नाही.  अनेक भागांत रस्ते नाहीत, पथदिव्यांचा पत्ता नाही  आजही हद्दवाढीतील अनेक भागांत रस्ते नाहीत, पथदिव्यांचा पत्ता नाही, पाण्याच्या नावाने तर बोंबच आहे. अनेक वसाहतींना अद्याप नळाचे पाणी नाही. ड्रेनेज नसल्याने सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत असते. त्यामुळे अनेकदा अनारोग्याची स्थिती निर्माण झाली आहे. झोपडपट्ट्यांची संख्या वाढली. त्याप्रमाणात तेथे स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे नागरिक परिसरातील मोकळ्या मैदानाचा वापर करतात. एकंदरीतच 28 वर्षांत हद्दवाढ भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. विशेष म्हणजे, गावठाण भागातील नगरसेवकांच्या दुप्पट-तिप्पट विकासनिधी या भागातील नगरसेवकांना उपलब्ध करून दिला जातो. तरीही विकासकामे होत नाहीत, यामागचे गौडबंगाल काय असेल, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे.  महापौरपदाची सूत्रे घेतेवेळीच हद्दवाढ विकासाला प्राधान्य देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यानुसार गावठाण भागाबरोबरच हद्दवाढीतील नागरिकांना अधिकाधिक मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  - श्रीकांचना यन्नम, महापौर  महापालिकेच्या अंदाजपत्रकात हद्दवाढ विभागाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल. त्यानुसार विकासकामे हाती घेण्यात येतील आणि लवकरात लवकर हा भाग शहरातील विकसित भाग म्हणून ओळखला जाईल.  - श्रीनिवास करली, सभागृह नेता  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 4, 2020

सोलापुरातील "हद्दवाढवासी' 28 वर्षांनंतरही "वंचित'च  सोलापूर : महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यामुळे परिसराचा विकास होईल, मूलभूत सुविधा तातडीने मिळतील, या अपेक्षेत असलेल्या सोलापूर शहराच्या हद्दवाढ भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा मात्र गेल्या 28 वर्षांत अपेक्षाभंग झाला आहे. महापालिकेचा कर 100 टक्के भरूनसुद्धा आवश्‍यक मूलभूत सुविधांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे. मात्र, हद्दवाढ विभागाच्या विकासाला निश्‍चित प्राधान्य देणार असल्याचे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी सांगितले.  नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होताना शहराची हद्द होती फक्त 23.23 चौरस किलोमीटर. पहिल्या हद्दवाढीत शहराच्या दक्षिणेकडील नेहरूनगर, होटगी रस्त्यालगतच्या काही भागाचा समावेश झाला. दुसऱ्या हद्दवाढीत विडी घरकूल, सलगरवस्ती, भैरू वस्ती या क्षेत्रांचा समावेश झाला. शहराच्या सभोवताली झालेला नागरी विकास, औद्योगिक विकासांचा साकल्याने विचार करून 5 मे 1992 रोजी हद्दवाढ झाली ती एकदम 145.54 चौरस किलोमीटर इतकी. त्या वेळी मजरेवाडी, कुमठे, सोरेगाव, दहिटणे, देगाव, बसवेश्‍वरनगर, केगाव, कसबे सोलापूर, प्रतापनगर या गावांचा समावेश झाला. ग्रामपंचायत हद्दीत असलेले लोक मूलभूत सुविधांपासून वंचित होते. महापालिका हद्दीत आल्यानंतर या समस्या सुटतील अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.  हद्दवाढीमुळे विजयपूर आणि होटगी रस्त्याच्या दिशेने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जाळे निर्माण झाले. विकसकांनी आवश्‍यक मूलभूत सुविधांची जबाबदारी महापालिकेवर टाकली, अनधिकृत संस्थांना सुविधा द्यायच्या नाहीत, असे धोरण महापालिकेने अवलंबिले. त्यामुळे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, पण मूलभूत सुविधांची वानवा राहिली, ती कायमचीच. आजही या भागात ड्रेनेजची पुरेशी सुविधा नाही. त्यासाठी दरवर्षी महापालिका अंदाजपत्रकात मधाचे बोट दाखविले जाते. स्थानिक खासदार-आमदारांकडूनही आश्‍वासने दिली जातात. प्रत्यक्षात काहीच केले गेले नाही.  अनेक भागांत रस्ते नाहीत, पथदिव्यांचा पत्ता नाही  आजही हद्दवाढीतील अनेक भागांत रस्ते नाहीत, पथदिव्यांचा पत्ता नाही, पाण्याच्या नावाने तर बोंबच आहे. अनेक वसाहतींना अद्याप नळाचे पाणी नाही. ड्रेनेज नसल्याने सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत असते. त्यामुळे अनेकदा अनारोग्याची स्थिती निर्माण झाली आहे. झोपडपट्ट्यांची संख्या वाढली. त्याप्रमाणात तेथे स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे नागरिक परिसरातील मोकळ्या मैदानाचा वापर करतात. एकंदरीतच 28 वर्षांत हद्दवाढ भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. विशेष म्हणजे, गावठाण भागातील नगरसेवकांच्या दुप्पट-तिप्पट विकासनिधी या भागातील नगरसेवकांना उपलब्ध करून दिला जातो. तरीही विकासकामे होत नाहीत, यामागचे गौडबंगाल काय असेल, याचा शोध घेण्याची वेळ आता आली आहे.  महापौरपदाची सूत्रे घेतेवेळीच हद्दवाढ विकासाला प्राधान्य देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यानुसार गावठाण भागाबरोबरच हद्दवाढीतील नागरिकांना अधिकाधिक मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  - श्रीकांचना यन्नम, महापौर  महापालिकेच्या अंदाजपत्रकात हद्दवाढ विभागाच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल. त्यानुसार विकासकामे हाती घेण्यात येतील आणि लवकरात लवकर हा भाग शहरातील विकसित भाग म्हणून ओळखला जाईल.  - श्रीनिवास करली, सभागृह नेता  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fk85LI

No comments:

Post a Comment