का करावी लागली वाघिणीच्या शावकाची कोरोना चाचणी? ... वाचा चंद्रपूर : संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतासह ईतरही सर्वच देशांमध्ये काटेकोरपणे लॉकडाउनचे पालन करण्यात येत आहे. खरं तर कोरोना हा आजार केवळ माणसांनाच होतो असा सर्वसामान्य गैरसमज होता. मात्र, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या प्राणीसंग्रहालयात एका चार वर्षीय वाघाला कोरोनाची लागण झाल्याने जगभरात खळबळ उडाली होती. या घटनेवरून प्राण्यांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते, हे अधोरेखित झाले होते. यानंर भारतातील प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनाने प्रण्यांची काळजी घेणे सुरू केले आहे. आता तर चंद्रपुरातील एका शावकाची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चंद्रपूर वनविभाग अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे 24 एप्रिल रोजी गावालगत सकाळी सहा वाजताच्या सुमारास अंदाजे तीन ते चार महिन्यांचे वाघिणीचे शावक आढळून आले. वनविभागाला याबाबत माहिती प्राप्त होताच. विभागीय वनअधिकारी, सहाय्यक वनसंरक्षकांसोबत चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी स्थानिक एनजीओ, रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांच्या मदतीने शावकाला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात आढळले शावक शावकावर पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूच्या देखरेखीमध्ये उपचार सुरू असून क्षेत्रीय कर्मचारी वाघिणीचा शोध घेत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरू असल्याने कोविड19 तपासणी करण्यासाठी स्वॅब नमुने गोळा करून पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत.  वाघिणीची शोध घेण्याकरिता वनविभागाद्वारे स्थानिक एनजीओचे प्रतिनिधी, वनकर्मचारी व गावकरी यांचे चार पथक तयार करण्यात आले. जंगल परिसरात एकूण 29 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. त्यामध्ये एफडीसीएम वनविभाग व वन्यजीव अभ्यासक यांचा समावेश करून वाघाचे पगमार्क घेणे तसेच संयुक्त गस्त करून मादी वाघिणीचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. या मोहिमेत चंद्रपूर वनविभाग चिचपल्ली परिक्षेत्राच्या सिमेस लागून असलेले मध्य चांदा वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वनक्षेत्रात सुद्धा वाघिणीचा मागोवा घेण्यास त्यांचे वनकर्मचारी/अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संयुक्तरित्या शोधमोहीम राबबिण्यात येत आहे.   - पोलिस वाहनाने महिलेला घरी सोडण्यासाठी निघाले; मात्र, रानडुक्‍कर आडवे आले अन्‌...   विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) चिचपल्ली व्ही. ए.राजूरकर व त्यांची चमू हे वाघिणीचा शोध घेत आहेत. वनक्षेत्रात एकापेक्षा अधिक वाघांचा वावर असल्याने या कालावधीत मोहफुल संकलनासाठी जंगलात प्रवेश करणाऱ्या गावकऱ्यांना दवंडी देण्याचे निर्देश विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांनी दिले असून वनक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, May 3, 2020

का करावी लागली वाघिणीच्या शावकाची कोरोना चाचणी? ... वाचा चंद्रपूर : संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतासह ईतरही सर्वच देशांमध्ये काटेकोरपणे लॉकडाउनचे पालन करण्यात येत आहे. खरं तर कोरोना हा आजार केवळ माणसांनाच होतो असा सर्वसामान्य गैरसमज होता. मात्र, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असलेल्या प्राणीसंग्रहालयात एका चार वर्षीय वाघाला कोरोनाची लागण झाल्याने जगभरात खळबळ उडाली होती. या घटनेवरून प्राण्यांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते, हे अधोरेखित झाले होते. यानंर भारतातील प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनाने प्रण्यांची काळजी घेणे सुरू केले आहे. आता तर चंद्रपुरातील एका शावकाची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली आहे. चंद्रपूर वनविभाग अंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील मौजा सुशी (दाबगाव) येथे 24 एप्रिल रोजी गावालगत सकाळी सहा वाजताच्या सुमारास अंदाजे तीन ते चार महिन्यांचे वाघिणीचे शावक आढळून आले. वनविभागाला याबाबत माहिती प्राप्त होताच. विभागीय वनअधिकारी, सहाय्यक वनसंरक्षकांसोबत चिचपल्ली परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी स्थानिक एनजीओ, रॅपिड रिस्पॉन्स युनिट यांच्या मदतीने शावकाला पकडून सुरक्षितरित्या पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील ट्रांजिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात आढळले शावक शावकावर पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूच्या देखरेखीमध्ये उपचार सुरू असून क्षेत्रीय कर्मचारी वाघिणीचा शोध घेत आहेत. सद्यस्थितीत कोरोनाची साथ सुरू असल्याने कोविड19 तपासणी करण्यासाठी स्वॅब नमुने गोळा करून पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत.  वाघिणीची शोध घेण्याकरिता वनविभागाद्वारे स्थानिक एनजीओचे प्रतिनिधी, वनकर्मचारी व गावकरी यांचे चार पथक तयार करण्यात आले. जंगल परिसरात एकूण 29 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. त्यामध्ये एफडीसीएम वनविभाग व वन्यजीव अभ्यासक यांचा समावेश करून वाघाचे पगमार्क घेणे तसेच संयुक्त गस्त करून मादी वाघिणीचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. या मोहिमेत चंद्रपूर वनविभाग चिचपल्ली परिक्षेत्राच्या सिमेस लागून असलेले मध्य चांदा वनविभाग व वनविकास महामंडळाच्या वनक्षेत्रात सुद्धा वाघिणीचा मागोवा घेण्यास त्यांचे वनकर्मचारी/अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संयुक्तरित्या शोधमोहीम राबबिण्यात येत आहे.   - पोलिस वाहनाने महिलेला घरी सोडण्यासाठी निघाले; मात्र, रानडुक्‍कर आडवे आले अन्‌...   विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) चिचपल्ली व्ही. ए.राजूरकर व त्यांची चमू हे वाघिणीचा शोध घेत आहेत. वनक्षेत्रात एकापेक्षा अधिक वाघांचा वावर असल्याने या कालावधीत मोहफुल संकलनासाठी जंगलात प्रवेश करणाऱ्या गावकऱ्यांना दवंडी देण्याचे निर्देश विभागीय वनअधिकारी सोनकुसरे यांनी दिले असून वनक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांनी सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2W3AhLz

No comments:

Post a Comment