भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे दोन महिन्यांत तब्बल दहा हजार दावे... पिंपरी : कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमधून ठराविक रक्‍कम काढण्याच्या दिलेल्या सवलतीचा लाभ अनेक जणांनी घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयाने या संदर्भातील दहा हजार दावे मार्गी लावले असून, त्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचे वाटप केले असल्याचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी 'सकाळ'ला सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाकडे जमा असणाऱ्या रकमेतील पैसे त्यांना देण्यात येत आहेत. कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर कोविड ऍडव्हान्सची रक्‍कम काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडे येणारे दावे तीन दिवसामध्ये निकाली काढून संबधित कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्‍कम जमा करण्यात येत आहे. कोव्हिड ऍडव्हान्सची रक्‍कम घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करायचा असल्याचे प्रकाश यांनी सांगितले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पाच हजार कंपन्यांना होणार फायदा...  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत शंभरपेक्षा कमी आणि 15 हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुढील सहा महिन्यांची (मार्च ते ऑगस्ट) प्रॉव्हिडंट फंडाची रक्‍कम केंद्र सरकारकडून भरण्यात येणार आहे. उद्योगनगरीमध्ये अशा कंपन्यांची संख्या पाच हजारापर्यंत असून, त्यांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.  कारखान्यांमध्ये जाण्यात अडचणी... कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्मचाऱ्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्‍कम न भरणाऱ्या उद्योजकांना नोटीसा बजावण्यात भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. सध्या लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बाहेर फिरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तूर्तास अशा कंपन्यांची यादी तयार करून त्यांना संबधितांना फोनवरून कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्‍कम भरण्यासंदर्भात सूचना करण्यात येत आहेत. दरम्यान, कंपन्यांकडून ही रक्‍कम भरली न गेल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने पूर्ण केल्याचे प्रकाश यांनी नमूद केले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा    वेबिनारच्या माध्यमातून संवाद  काही दिवसांपूर्वी सरकारने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्योगांना प्रॉव्हिडंट फंडाच्या संदर्भात कोणत्या अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधण्यात येत आहे. या माध्यमातून उद्योजक आणि कर्मचारी त्यांच्या अडचणी मांडत आहेत.  कार्यालयात 'नो एन्ट्री'  विविध कामासाठी प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दूरध्वनीद्‌वारे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. कोरोनामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयामध्ये सध्या 'नो एन्ट्री' ठेवण्यात आली आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 26, 2020

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे दोन महिन्यांत तब्बल दहा हजार दावे... पिंपरी : कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीमधून ठराविक रक्‍कम काढण्याच्या दिलेल्या सवलतीचा लाभ अनेक जणांनी घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयाने या संदर्भातील दहा हजार दावे मार्गी लावले असून, त्या माध्यमातून दहा कोटी रुपयांचे वाटप केले असल्याचे भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्‍त अमिताभ प्रकाश यांनी 'सकाळ'ला सांगितले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाकडे जमा असणाऱ्या रकमेतील पैसे त्यांना देण्यात येत आहेत. कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर कोविड ऍडव्हान्सची रक्‍कम काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाकडे येणारे दावे तीन दिवसामध्ये निकाली काढून संबधित कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्‍कम जमा करण्यात येत आहे. कोव्हिड ऍडव्हान्सची रक्‍कम घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करायचा असल्याचे प्रकाश यांनी सांगितले.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पाच हजार कंपन्यांना होणार फायदा...  पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत शंभरपेक्षा कमी आणि 15 हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुढील सहा महिन्यांची (मार्च ते ऑगस्ट) प्रॉव्हिडंट फंडाची रक्‍कम केंद्र सरकारकडून भरण्यात येणार आहे. उद्योगनगरीमध्ये अशा कंपन्यांची संख्या पाच हजारापर्यंत असून, त्यांना त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.  कारखान्यांमध्ये जाण्यात अडचणी... कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कर्मचाऱ्यांची प्रॉव्हिडंट फंडाची रक्‍कम न भरणाऱ्या उद्योजकांना नोटीसा बजावण्यात भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. सध्या लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे बाहेर फिरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तूर्तास अशा कंपन्यांची यादी तयार करून त्यांना संबधितांना फोनवरून कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्‍कम भरण्यासंदर्भात सूचना करण्यात येत आहेत. दरम्यान, कंपन्यांकडून ही रक्‍कम भरली न गेल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात 50 कोटी रुपयांचे उद्दिष्ट प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने पूर्ण केल्याचे प्रकाश यांनी नमूद केले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा    वेबिनारच्या माध्यमातून संवाद  काही दिवसांपूर्वी सरकारने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्योगांना प्रॉव्हिडंट फंडाच्या संदर्भात कोणत्या अडचणी असल्यास त्या सोडवण्यासाठी वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधण्यात येत आहे. या माध्यमातून उद्योजक आणि कर्मचारी त्यांच्या अडचणी मांडत आहेत.  कार्यालयात 'नो एन्ट्री'  विविध कामासाठी प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना दूरध्वनीद्‌वारे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. कोरोनामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयामध्ये सध्या 'नो एन्ट्री' ठेवण्यात आली आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3enFUud

No comments:

Post a Comment