निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये आता स्वदेशीचा नारा; केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय  मुंबई - केंद्रीय निमलष्करी दलांच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्‌विट करून याबाबतची माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी "आत्मनिर्भर भारत अभियाना'ची घोषणा केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत गृहमंत्रालयाने स्वदेशीचा नारा दिला आहे. विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस कंपन्यांमध्ये जवळपास 10 लाख जवान कार्यरत आहेत. या जवानांचे कुटुंब मिळून एकूण 50 लाख लोक स्वदेशी वस्तू वापरणार आहेत. देशाला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या दिशेने हे छोटे पाऊल असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशभरात अठराशे कॅन्टीन  केंद्रीय निमलष्करी कंपन्यांच्या विविध मुख्यालय आणि कॅम्पमध्ये 119 मास्टर; तर 1625 सवलतीच्या कॅन्टीन आहेत. लष्करी दलामध्ये अस्तित्वात असलेल्या कॅन्टीनच्या धर्तीवर केंद्रीय निमलष्करी दलात 2006 मध्ये या कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली. या कॅन्टीनमध्ये घरगुती वापराच्या सर्व वस्तू सवलतीच्या दरामध्ये मिळतात. मास्टर कॅन्टीनमधून इतर सर्व कॅन्टीनला वस्तूंचा पुरवठा होतो. वर्षाकाठी 2800 कोटी रुपये किमतीच्या वस्तू या कॅन्टीनमधून विकल्या जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या केंद्रीय दलामध्ये निर्णय लागू होणार  1. सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल)  2. बीएसएफ (सीमा सुरक्षा दल)  3. असम रायफल्स  4. एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड)  5. सीआयएसएफ (केंद्रीय औद्यौगिक सुरक्षा दल)  6. आईटीबीपी ( भारत-तिब्बत सीमा सुरक्षा दल)  7. एसएसबी- सशस्त्र सीमा दल  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 13, 2020

निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये आता स्वदेशीचा नारा; केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय  मुंबई - केंद्रीय निमलष्करी दलांच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्‌विट करून याबाबतची माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू होणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी "आत्मनिर्भर भारत अभियाना'ची घोषणा केली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत गृहमंत्रालयाने स्वदेशीचा नारा दिला आहे. विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस कंपन्यांमध्ये जवळपास 10 लाख जवान कार्यरत आहेत. या जवानांचे कुटुंब मिळून एकूण 50 लाख लोक स्वदेशी वस्तू वापरणार आहेत. देशाला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या दिशेने हे छोटे पाऊल असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशभरात अठराशे कॅन्टीन  केंद्रीय निमलष्करी कंपन्यांच्या विविध मुख्यालय आणि कॅम्पमध्ये 119 मास्टर; तर 1625 सवलतीच्या कॅन्टीन आहेत. लष्करी दलामध्ये अस्तित्वात असलेल्या कॅन्टीनच्या धर्तीवर केंद्रीय निमलष्करी दलात 2006 मध्ये या कॅन्टीनची व्यवस्था करण्यात आली. या कॅन्टीनमध्ये घरगुती वापराच्या सर्व वस्तू सवलतीच्या दरामध्ये मिळतात. मास्टर कॅन्टीनमधून इतर सर्व कॅन्टीनला वस्तूंचा पुरवठा होतो. वर्षाकाठी 2800 कोटी रुपये किमतीच्या वस्तू या कॅन्टीनमधून विकल्या जातात.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या केंद्रीय दलामध्ये निर्णय लागू होणार  1. सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल)  2. बीएसएफ (सीमा सुरक्षा दल)  3. असम रायफल्स  4. एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड)  5. सीआयएसएफ (केंद्रीय औद्यौगिक सुरक्षा दल)  6. आईटीबीपी ( भारत-तिब्बत सीमा सुरक्षा दल)  7. एसएसबी- सशस्त्र सीमा दल  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2zCC4y2

No comments:

Post a Comment