देव कधीच मरत नसतो!  तो २५ वर्षापूर्वीचा मे महिन्यातला कोणतातरी दिवस. दुपारचा एक वाजलेला. टळटळीत ऊन डोक्‍यावर तळपत होतं. नदीशेजारच्या पायवाटेनं पटापट पावलं उचलत घराकडं निघालेलो. रबराची स्लिपरही तापलेली. म्हतारी आज्जी तापल्या फुफाट्यातून अनवाणी पायानं लगबगीनं निघालेली, ‘आये थांबकी. लय पाय भाजाय लागले.’ म्हतारीनं माझ्याकडं पाहत दोन्ही गालावरून खरबरीत हात फिरवले. गालावरचा घाम तिच्या मातकट हाताला चिकटला. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘व्हय रं माझ्या पाखरा. तोक त्या चिचंखाली बसू आपण,’ सुरकुतल्या चेहऱ्याची म्हतारी असं म्हणाली तसा थोडा धीर आला. कोरडी थुकी बळजबरी गळ्यात ढकलली. मोकळ्या रानातून धसकटं चुकवत निघालो. बांदावरची चिंच आली. पायातून चप्पल काढली आणि खरबरीत काळ्या मातीत पाय रुतवले. पायाला गारवा चिकटला. ‘आये आपल्या गावात दौखाना कनाय गं?’  डोक्‍यावरचा पदर नीट करत पिशवीतली भाकर काढत म्हतारी म्हणाली,  ‘आपलं गावं बारकहे ना, म्हणून.’  ‘मग मोठ्या शीटीत लय भारी दौखाने असत्यात का?’  ‘आनं मंग. तिथं एकदम काचचे दौखाने असत्यात. नुसते अशी लायटिंग. परत हाताचा दौखाना शेप्रेट, पायाचा शेप्रेट, डोक्‍याचा दौखाना शेप्रेट असतोय. काय काय दौखाने तर एवढं मोठं असत्यात की एकाच दौखान्यात सगळं असतयं.’  ‘आयवं. मंजी आपल्या गावातलं देऊळहे तशेच शीटीत दौखाने असत्यात म्हण की. आपल्या गावातलं देऊळ काचचहे. तिथंच लग्न होत्यात, तिथचं हरिपाठ असतोय, तिथचं चौथीचा वर्ग भरतो अन्‌ ग्रामसभाबी तिथच भरतीया. म्हंजी आपल्या गावातलं देवाळ शिटीतल्या दौखान्यासारखचं म्हणं की.’  ‘आनं मंग. शिटीतल्या लोकांना जशे दौखाने प्यारे तशे आपल्या लोकांना देवळं प्यारी.’ म्हतारीनं हातावर बाजरीची भाकरी चटणी टेकवली. तसा मी कसलातरी विचार करत खुदकन हसलो. म्हतारी म्हणाली, ‘काय झालं बा हसाय?’  ‘आये, मला आत्ता वाटलं की, आपल्या गावात देऊळात डॉक्‍टर देव होऊन बसलाय. अन्‌ देवळापुढं कशी रांग लागती तशी तपासाय आलेल्या लोकांची रांग लागलीया डॉक्‍टरापुढं. जणू डॉक्‍टरच देव झालाय.’ तसं म्हतारी मऊ हसत माझ्या डोक्‍यावरून हात फिरवला आणि कडाकडा बोटं मोडत म्हणाली,  ‘नाय बा. डॉक्‍टर कुठं देव असतोय व्हय? कितीबी मोठ्ठी महामारी आली तरी आपल्याला त्यातून देवच तारीत असतोय बा. डॉक्‍टर नाय. डॉक्‍टर माणूस असतो. कधी ना कधी त्योबी मरणार. पण, देव कधीच मरत नसतो.’  कोरोनामुळं भारत लॉकडाऊन झाला आणि देशभरातील सगळी देवळं बंद झाली. त्यावेळी आज्जीची श्रद्धा फेल झाली, असा विचार करत मी भिंतीवरच्या म्हतारीच्या फोटोकडं पाहत हसू लागलो. पण, तेव्हाही फोटोतली म्हतारी हसतच होती. थोड्या वेळापूर्वी मित्राचा फोन आला. तो सांगत होता, चौदा दिवस डॉक्‍टरांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ठणठणीत बरा केला. तो घरी आला आणि आल्या आल्या त्यानं देव्हाऱ्यासमोर लोटांगण घातलं. घरातल्या सगळ्यांनी कृतकृत्य झाल्यासारखे देवासमोर हात जोडले होते. सगळेजण देवाचे आभार मानत होते. मी फोन ठेवत भिंतीवरच्या म्हतारीच्या फोटोकडं पुन्हा पाहिलं. फोटोतली म्हतारी का हसत होती, ते समजलं. देव कधीच मरत नसतो, हे आज्जीचं वाक्‍य डोक्‍यावरून प्रेमानं हात फिरवत अलगद कानातून मेंदूला स्पर्शत होतं. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 21, 2020

देव कधीच मरत नसतो!  तो २५ वर्षापूर्वीचा मे महिन्यातला कोणतातरी दिवस. दुपारचा एक वाजलेला. टळटळीत ऊन डोक्‍यावर तळपत होतं. नदीशेजारच्या पायवाटेनं पटापट पावलं उचलत घराकडं निघालेलो. रबराची स्लिपरही तापलेली. म्हतारी आज्जी तापल्या फुफाट्यातून अनवाणी पायानं लगबगीनं निघालेली, ‘आये थांबकी. लय पाय भाजाय लागले.’ म्हतारीनं माझ्याकडं पाहत दोन्ही गालावरून खरबरीत हात फिरवले. गालावरचा घाम तिच्या मातकट हाताला चिकटला. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘व्हय रं माझ्या पाखरा. तोक त्या चिचंखाली बसू आपण,’ सुरकुतल्या चेहऱ्याची म्हतारी असं म्हणाली तसा थोडा धीर आला. कोरडी थुकी बळजबरी गळ्यात ढकलली. मोकळ्या रानातून धसकटं चुकवत निघालो. बांदावरची चिंच आली. पायातून चप्पल काढली आणि खरबरीत काळ्या मातीत पाय रुतवले. पायाला गारवा चिकटला. ‘आये आपल्या गावात दौखाना कनाय गं?’  डोक्‍यावरचा पदर नीट करत पिशवीतली भाकर काढत म्हतारी म्हणाली,  ‘आपलं गावं बारकहे ना, म्हणून.’  ‘मग मोठ्या शीटीत लय भारी दौखाने असत्यात का?’  ‘आनं मंग. तिथं एकदम काचचे दौखाने असत्यात. नुसते अशी लायटिंग. परत हाताचा दौखाना शेप्रेट, पायाचा शेप्रेट, डोक्‍याचा दौखाना शेप्रेट असतोय. काय काय दौखाने तर एवढं मोठं असत्यात की एकाच दौखान्यात सगळं असतयं.’  ‘आयवं. मंजी आपल्या गावातलं देऊळहे तशेच शीटीत दौखाने असत्यात म्हण की. आपल्या गावातलं देऊळ काचचहे. तिथंच लग्न होत्यात, तिथचं हरिपाठ असतोय, तिथचं चौथीचा वर्ग भरतो अन्‌ ग्रामसभाबी तिथच भरतीया. म्हंजी आपल्या गावातलं देवाळ शिटीतल्या दौखान्यासारखचं म्हणं की.’  ‘आनं मंग. शिटीतल्या लोकांना जशे दौखाने प्यारे तशे आपल्या लोकांना देवळं प्यारी.’ म्हतारीनं हातावर बाजरीची भाकरी चटणी टेकवली. तसा मी कसलातरी विचार करत खुदकन हसलो. म्हतारी म्हणाली, ‘काय झालं बा हसाय?’  ‘आये, मला आत्ता वाटलं की, आपल्या गावात देऊळात डॉक्‍टर देव होऊन बसलाय. अन्‌ देवळापुढं कशी रांग लागती तशी तपासाय आलेल्या लोकांची रांग लागलीया डॉक्‍टरापुढं. जणू डॉक्‍टरच देव झालाय.’ तसं म्हतारी मऊ हसत माझ्या डोक्‍यावरून हात फिरवला आणि कडाकडा बोटं मोडत म्हणाली,  ‘नाय बा. डॉक्‍टर कुठं देव असतोय व्हय? कितीबी मोठ्ठी महामारी आली तरी आपल्याला त्यातून देवच तारीत असतोय बा. डॉक्‍टर नाय. डॉक्‍टर माणूस असतो. कधी ना कधी त्योबी मरणार. पण, देव कधीच मरत नसतो.’  कोरोनामुळं भारत लॉकडाऊन झाला आणि देशभरातील सगळी देवळं बंद झाली. त्यावेळी आज्जीची श्रद्धा फेल झाली, असा विचार करत मी भिंतीवरच्या म्हतारीच्या फोटोकडं पाहत हसू लागलो. पण, तेव्हाही फोटोतली म्हतारी हसतच होती. थोड्या वेळापूर्वी मित्राचा फोन आला. तो सांगत होता, चौदा दिवस डॉक्‍टरांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला ठणठणीत बरा केला. तो घरी आला आणि आल्या आल्या त्यानं देव्हाऱ्यासमोर लोटांगण घातलं. घरातल्या सगळ्यांनी कृतकृत्य झाल्यासारखे देवासमोर हात जोडले होते. सगळेजण देवाचे आभार मानत होते. मी फोन ठेवत भिंतीवरच्या म्हतारीच्या फोटोकडं पुन्हा पाहिलं. फोटोतली म्हतारी का हसत होती, ते समजलं. देव कधीच मरत नसतो, हे आज्जीचं वाक्‍य डोक्‍यावरून प्रेमानं हात फिरवत अलगद कानातून मेंदूला स्पर्शत होतं. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2wXFJWt

No comments:

Post a Comment