आपली संस्कृती नव्याने दिसू लागली आहे !  सगळे दिवस सारखे नसतात, हा निसर्गाचाच नियम आहे. संकटाला खंबीरपणे सामोरं जाण्याची आपली परंपरा आहे, इतिहास आहे. थकू नका, वाकू नका, खचून जाऊ नका...उद्याची पहाट आपलीच असणार आहे. एकमेकांना सहकार्य करूया, हातात हात घालून पुढे जाऊया. आजपर्यंत आपण माझं माझं - तुझं तुझं असंच जगत होतो, या कोरोना ने मनं मोठी केली. मला तर विशेष वाटतंय, एखादा गरीब माणूस पण आमच्या अनाथालयात त्याला शक्‍य तितके धान्य आणून देतोय. त्याच्या देखील मनात 'देण्याची' भावना येते आहे हे किती आनंददायी आहे. आमची संस्कृती ओरबाडून घेण्याची नाहीये तर वाटून खाण्याची आहे. एक तीळ सात जणांत वाटून खायचे संस्कार आहेत आमच्यावर. त्याचीच आता जाणीव होऊ लागली आहे. माणुसकी आणि मानवतेचे अर्थ समजू लागले. माणूस स्वतःच्या भाकरीचा अर्धा तुकडा दुसऱ्याला देऊ लागला म्हणजेच संस्कृती नव्याने जागी होऊ लागली आहे, नव्याने दिसू लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ना हम रहे अपने लिये, हमको सभी से गर्ज है... गुरुदेव यहा आशिष दे जो सोचनेका फर्ज है...!  पण मला काळजी वाटते आहे ती, हातावर पोट असणाऱ्यांची. त्यांना चार घास खायला मिळाले पाहिजेत. त्यांची चूल पेटवू. पुण्य वाटून घेऊ. सगळं काही सरकार नाही करू शकत, आपणही हातभार लावू.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा डॉक्‍टरांवर हल्ले होतायत, पोलिसांना मारहाण करण्याचे प्रयत्न होतायत हे चुकीचे आहे. ते आहेत म्हणून आपण शांतपणे आणि सुरक्षित जगू शकतोय. त्यांची लेकरं पण घरात वाट बघत असतील, त्यांच्याही घरच्यांना काळजी वाटत असेल याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, आपल्यासाठी रस्त्यावर उभे राहून काम करतायत. त्यांच्या सूचना पाळा. घरात असलेल्या पुरुषांनी या काळात आपली बायको काय काय काम करते, किती कष्ट करते ते बघा, तिला मदत करा. ती आनंदी तर घर आनंदी.  मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका काळ घरात राहते आहे. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यात, गावात कार्यक्रम असतात. व्याख्यानं असतात त्यामुळे घरी निवांत राहिलेच नाही. पण आता मात्र वेळ मिळालाय. याचा उपयोग करायचं ठरवून मी माझं आत्मचरित्र लिहायला घेतलंय. 'होय, तरीही जगायचं...' हे नाव दिलंय आत्मचरित्राला. मी ही जगले तुम्हीही जगा. त्या आत्मचरित्रातून माझ्या आयुष्याचा प्रवास मांडायचा प्रयत्न करणार आहे. त्यातून उरलेला वेळ मी माझ्या लहान लेकरांबरोबर घालवते. माझ्याकडे लहान मुलं आहेत, तशाच गाई पण आहेत. माझी मुलं आणि गाई यांच्याबरोबर वेळ आनंदात जातो.  सिंधूताई सकपाळ (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 26, 2020

आपली संस्कृती नव्याने दिसू लागली आहे !  सगळे दिवस सारखे नसतात, हा निसर्गाचाच नियम आहे. संकटाला खंबीरपणे सामोरं जाण्याची आपली परंपरा आहे, इतिहास आहे. थकू नका, वाकू नका, खचून जाऊ नका...उद्याची पहाट आपलीच असणार आहे. एकमेकांना सहकार्य करूया, हातात हात घालून पुढे जाऊया. आजपर्यंत आपण माझं माझं - तुझं तुझं असंच जगत होतो, या कोरोना ने मनं मोठी केली. मला तर विशेष वाटतंय, एखादा गरीब माणूस पण आमच्या अनाथालयात त्याला शक्‍य तितके धान्य आणून देतोय. त्याच्या देखील मनात 'देण्याची' भावना येते आहे हे किती आनंददायी आहे. आमची संस्कृती ओरबाडून घेण्याची नाहीये तर वाटून खाण्याची आहे. एक तीळ सात जणांत वाटून खायचे संस्कार आहेत आमच्यावर. त्याचीच आता जाणीव होऊ लागली आहे. माणुसकी आणि मानवतेचे अर्थ समजू लागले. माणूस स्वतःच्या भाकरीचा अर्धा तुकडा दुसऱ्याला देऊ लागला म्हणजेच संस्कृती नव्याने जागी होऊ लागली आहे, नव्याने दिसू लागली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ना हम रहे अपने लिये, हमको सभी से गर्ज है... गुरुदेव यहा आशिष दे जो सोचनेका फर्ज है...!  पण मला काळजी वाटते आहे ती, हातावर पोट असणाऱ्यांची. त्यांना चार घास खायला मिळाले पाहिजेत. त्यांची चूल पेटवू. पुण्य वाटून घेऊ. सगळं काही सरकार नाही करू शकत, आपणही हातभार लावू.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा डॉक्‍टरांवर हल्ले होतायत, पोलिसांना मारहाण करण्याचे प्रयत्न होतायत हे चुकीचे आहे. ते आहेत म्हणून आपण शांतपणे आणि सुरक्षित जगू शकतोय. त्यांची लेकरं पण घरात वाट बघत असतील, त्यांच्याही घरच्यांना काळजी वाटत असेल याची आपल्याला जाणीव असली पाहिजे, आपल्यासाठी रस्त्यावर उभे राहून काम करतायत. त्यांच्या सूचना पाळा. घरात असलेल्या पुरुषांनी या काळात आपली बायको काय काय काम करते, किती कष्ट करते ते बघा, तिला मदत करा. ती आनंदी तर घर आनंदी.  मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका काळ घरात राहते आहे. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यात, गावात कार्यक्रम असतात. व्याख्यानं असतात त्यामुळे घरी निवांत राहिलेच नाही. पण आता मात्र वेळ मिळालाय. याचा उपयोग करायचं ठरवून मी माझं आत्मचरित्र लिहायला घेतलंय. 'होय, तरीही जगायचं...' हे नाव दिलंय आत्मचरित्राला. मी ही जगले तुम्हीही जगा. त्या आत्मचरित्रातून माझ्या आयुष्याचा प्रवास मांडायचा प्रयत्न करणार आहे. त्यातून उरलेला वेळ मी माझ्या लहान लेकरांबरोबर घालवते. माझ्याकडे लहान मुलं आहेत, तशाच गाई पण आहेत. माझी मुलं आणि गाई यांच्याबरोबर वेळ आनंदात जातो.  सिंधूताई सकपाळ (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Y4XaiZ

No comments:

Post a Comment