आरोग्याची ‘धनसंपदा’कडे होणारी वाटचाल चिंताजनक! लॉकडाउनमध्ये जिल्हा सीमा बंद असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकाऱ्याने जिल्हा प्रशासन अथवा पोलिसांची कसलीही अधिकृत परवानगी नसताना जालना जिल्ह्यात कूच करण्याचा प्रयत्न केला. आश्वर्याची बाब म्हणजे औरंगाबाद जिल्हा सीमा ओलांडून जाताना तीन ठिकाणी चेकपोस्ट नाके आहेत. या तिन्ही चेकपोस्टवरून या महाशयांना पोलिस पथकाने हटकलेसुद्धा नाही! परंतु जालना जिल्हा सीमा लागताच बदनापूर येथे जालना पोलिसांनी मात्र ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेली गाडी अडवण्याचे धारिष्ट्य दाखविले आणि इथेच त्यांचे पितळ उघडे पडले. कारच्या झाडाझाडीत तब्बल सहा लाख ७० हजार रोख रक्कम आणि एका ब्रँडेड कंपनीच्या मद्याच्या बाटल्याही सापडल्याने पोलिसही चक्रावून गेले. त्यांच्या ओठातून नकळत डॉक्टर तुम्ही सुद्धा, असा प्रश्न उपस्थित झाला नसेल तर नवलच.    धनसंपदा की अपसंपदा?  आरोग्य अधिकाऱ्याच्या कारमध्ये झाडाझडतीमध्ये सापडलेली ती रक्कम ‘धनसंपदा’ की ‘अपसंपदा’? याचा तपास पोलिस आणि प्राप्तिकर विभाग करेलही; परंतु शनिवारी (ता. १८) उघडकीस आलेल्या या खळबळजनक घटनेमुळे मात्र अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हॉटस्पॉट घोषित केलेला असतानाही आणि जिल्हाबंदी असतानाही हे आरोग्य अधिकारी महाशय कसलीही परवानगी न घेता नियम ढाब्यावर बसवून जालना जिल्ह्यात कसे? मुख्यालय सोडताना त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? मद्यविक्री बंद असतानाही त्यांच्याकडे ब्रँडेड मद्य कुठून आले? सर्वत्र लॉकडाउन असताना एवढी मोठी रक्कम त्यांनी कशासाठी सोबत घेतली आणि ही रक्कम कुठून आली? असे एक ना अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित केले जात आहेत.    असा झाला भंडाफोड  औरंगाबाद जिल्हा परिषदेतील हे आरोग्य अधिकारी महाशय जालना येथे एका बड्या प्रस्थाला मोठी रक्कम आणि मद्याच्या बाटल्या नेऊन देणार असल्याची कुणकुण जालना जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या पुत्राला लागली आणि जालना पोलिसांना खबर दिली. जालना पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवत बदनापूर तालुक्यातील एका चेकपोस्ट नाक्यावर या महाशयांना रंगेहाथ पकडून पितळ उघडे पाडले आणि गुन्हा दाखल केला. संबंधित बातमी - औरंगाबादच्या डीएचओंच्या वाहनामध्ये मनीसह मदिरा    परंतु, ज्यांच्याकडे ही ‘अपसंपदा' पोचवायची होती त्यांच्याकडून पोलिसांवर दबाब आल्याने केवळ चौकशीचा सोपस्कार पार पडून त्यांना सोडून देण्यात आल्याची कुजबुज मात्र आहे. तर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही किट खरेदी करण्यात आल्या होत्या त्यातील हिस्सा वा वाटा त्या बड्या प्रस्थाच्या घरी नेऊन देतानाच पाल चुकचुकली, अशीही कुजबुज जिल्ह्यात सुरू असल्याने काय खरे आणि काय खोटे याचा उलगडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उघडकीस आलेल्या प्रकाराची चर्चा तर होणारच.    डॉक्टर तुम्ही सुद्धा?  या प्रकारानंतर सामान्यांनाही आता डॉक्टर तुम्ही सुद्धा असा प्रश्न न पडला तर नवलच म्हणावं लागेल. या गंभीर घटनेप्रकरणी या डॉक्टरच्या निलंबनाचे मंगळवारी आदेश निघाले. तथापि, डॉक्टरांना सामान्यांकडून मिळणाऱ्या देवत्वालाही मान खाली घालायला लावणारा हा प्रकार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 21, 2020

आरोग्याची ‘धनसंपदा’कडे होणारी वाटचाल चिंताजनक! लॉकडाउनमध्ये जिल्हा सीमा बंद असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषदेतील आरोग्य अधिकाऱ्याने जिल्हा प्रशासन अथवा पोलिसांची कसलीही अधिकृत परवानगी नसताना जालना जिल्ह्यात कूच करण्याचा प्रयत्न केला. आश्वर्याची बाब म्हणजे औरंगाबाद जिल्हा सीमा ओलांडून जाताना तीन ठिकाणी चेकपोस्ट नाके आहेत. या तिन्ही चेकपोस्टवरून या महाशयांना पोलिस पथकाने हटकलेसुद्धा नाही! परंतु जालना जिल्हा सीमा लागताच बदनापूर येथे जालना पोलिसांनी मात्र ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेली गाडी अडवण्याचे धारिष्ट्य दाखविले आणि इथेच त्यांचे पितळ उघडे पडले. कारच्या झाडाझाडीत तब्बल सहा लाख ७० हजार रोख रक्कम आणि एका ब्रँडेड कंपनीच्या मद्याच्या बाटल्याही सापडल्याने पोलिसही चक्रावून गेले. त्यांच्या ओठातून नकळत डॉक्टर तुम्ही सुद्धा, असा प्रश्न उपस्थित झाला नसेल तर नवलच.    धनसंपदा की अपसंपदा?  आरोग्य अधिकाऱ्याच्या कारमध्ये झाडाझडतीमध्ये सापडलेली ती रक्कम ‘धनसंपदा’ की ‘अपसंपदा’? याचा तपास पोलिस आणि प्राप्तिकर विभाग करेलही; परंतु शनिवारी (ता. १८) उघडकीस आलेल्या या खळबळजनक घटनेमुळे मात्र अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हॉटस्पॉट घोषित केलेला असतानाही आणि जिल्हाबंदी असतानाही हे आरोग्य अधिकारी महाशय कसलीही परवानगी न घेता नियम ढाब्यावर बसवून जालना जिल्ह्यात कसे? मुख्यालय सोडताना त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? मद्यविक्री बंद असतानाही त्यांच्याकडे ब्रँडेड मद्य कुठून आले? सर्वत्र लॉकडाउन असताना एवढी मोठी रक्कम त्यांनी कशासाठी सोबत घेतली आणि ही रक्कम कुठून आली? असे एक ना अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित केले जात आहेत.    असा झाला भंडाफोड  औरंगाबाद जिल्हा परिषदेतील हे आरोग्य अधिकारी महाशय जालना येथे एका बड्या प्रस्थाला मोठी रक्कम आणि मद्याच्या बाटल्या नेऊन देणार असल्याची कुणकुण जालना जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या पुत्राला लागली आणि जालना पोलिसांना खबर दिली. जालना पोलिसांनीही तपासाची चक्रे फिरवत बदनापूर तालुक्यातील एका चेकपोस्ट नाक्यावर या महाशयांना रंगेहाथ पकडून पितळ उघडे पाडले आणि गुन्हा दाखल केला. संबंधित बातमी - औरंगाबादच्या डीएचओंच्या वाहनामध्ये मनीसह मदिरा    परंतु, ज्यांच्याकडे ही ‘अपसंपदा' पोचवायची होती त्यांच्याकडून पोलिसांवर दबाब आल्याने केवळ चौकशीचा सोपस्कार पार पडून त्यांना सोडून देण्यात आल्याची कुजबुज मात्र आहे. तर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही किट खरेदी करण्यात आल्या होत्या त्यातील हिस्सा वा वाटा त्या बड्या प्रस्थाच्या घरी नेऊन देतानाच पाल चुकचुकली, अशीही कुजबुज जिल्ह्यात सुरू असल्याने काय खरे आणि काय खोटे याचा उलगडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उघडकीस आलेल्या प्रकाराची चर्चा तर होणारच.    डॉक्टर तुम्ही सुद्धा?  या प्रकारानंतर सामान्यांनाही आता डॉक्टर तुम्ही सुद्धा असा प्रश्न न पडला तर नवलच म्हणावं लागेल. या गंभीर घटनेप्रकरणी या डॉक्टरच्या निलंबनाचे मंगळवारी आदेश निघाले. तथापि, डॉक्टरांना सामान्यांकडून मिळणाऱ्या देवत्वालाही मान खाली घालायला लावणारा हा प्रकार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cDnOU5

No comments:

Post a Comment