सचिनची भुरळ जगाला, त्याला मात्र मराठवाड्यातील या गावाची उस्मानाबाद :  सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देवच. विक्रमावर विक्रम रचत गेलेल्या या विक्रमवीराने अख्ख्या जगाला भुरळ घातली. आजही मैदानात घुमणारा 'सचिन सचिन' हा आवाज अनेक किक्रेट वेडे विसरले नाहीत. पण, याच सचिनला भुरळ घातली ती उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा (ता. परंडा) या गावाने. एकेकाळी मागासलेले म्हणून गणले जाणारे हे गाव आज केवळ सचिनमुळे प्रगतिपथावर आले. त्यामुळे किक्रेटचा देव या गावासाठीही देवच ठरला आहे. (ता. २४ एप्रिल) सचिनचा वाढदिवस. त्यानिमित्ताने या बाबत खास माहिती ती eSakal.com च्या वाचकांसाठी... सचिनने खासदार असताना १८ जुलै २०१६ ला डोणजा हे गाव विकासासाठी दत्तक घेतले. त्याने येथे विविध योजना राबवित गावाचा चेहरा बदलवला. गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह मुलांची शाळा अन्‌ रस्ते चकाचक केले. विशेष म्हणजे गाव दत्तक घेतल्यानंतर तो गावात येऊन मुलांसोबत क्रिकेटही खेळला.    नेमके कुठे आहे हे गाव?  परंडा तालुक्यातील डोणजा हे सीना नदीच्या काठावरील वसलेले टुमदार गाव. या ग्रामपंचायत अंतर्गत बंगाळवाडीचाही समावेश आहे. बंगाळवाडीची लोकसंख्या एक हजार २८९, तर डोणजाची लोकसंख्या तीन हजार ६४८. गेल्या चार वर्षांत यामाध्यमातून गावात विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यासाठी खासदार म्हणून सचिनने चांगलीच मेहनत घेतली.   असा केला कायपालट   अनेक खासादारांनी त्या-त्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेतले. मात्र, त्यातून संबंधित खासदारांना फारसे यश आले नाही. मात्र, सचिनने क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे खासदारकीच्या काळातील योजनेतही चांगलीच फटकेबाजी केली. त्यामुळे गावातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ झाली आहे. ऐरवी गावातील रस्ते कुठे चिखलमय तर कुठे खड्ड्यांचे असायचे. मात्र, सध्या डोणजा तसेच बंगाळवाडीतील संपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गावातील रस्ते चकाचक झाल्याचे दिसत आहेत.    हेही वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम?  आदर्श ग्राम करताना स्थानिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा दृष्टीकोन सचिनने ठेवला. गावात यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना मोडक्या झालेल्या खोलीतूनच शिक्षण घ्यावे लागत होते. कधी पावसाचा तर कधी वीजेचाही फटका शाळेला बसायचा. मात्र, सचिनने शाळेसाठी मोठी इमारत बांधून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या इमारतीतून ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली. याशिवाय गावात विविध योजना राबवून कामे करण्यात आली. विशेष म्हणजे नवीन शाळेची इमारत सौर दिव्यांनी लखलखत आहे. गावात तब्बल ८६ घरकुले पूर्ण झाली असून, अनेक गरिबांना कायमचा निवारा मिळाला आहे. शिवाय गावातील सर्वच कुटुंब १०० टक्के स्वच्छतागृहाचा वापर करीत आहेत. त्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.  प्रमुख सहा कामांना प्राधान्य दिले. शिवाय ही कामेही पूर्ण केली आहे. गावात पाणीपुरवठा योजना, शाळेची इमारत आणि रस्ते यासाठी चार कोटी चार लाख ५६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष म्हणजे स्वतः त्याने गावात येऊन विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळला होता. याची आठवण अजूनही येथील गावकऱ्यांना होत आहे. गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळताना सचिन.   डोणजावासियांचाही देव  क्रिकेटच्या मैदानावर सचिन नेहमीच धावांचा पाऊस पाडायचा. चाहत्यांसाठी तो क्रिकेटचा देवच असायचा. तसा डोणजावासियांसाठीही तो खरोखरचा देवच ठरला आहे. ऐरवी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र, गावात त्याने नळयोजनेचे काम पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याची चिंता संपली आहे. नागरिकांना आर-ओ फिल्टरचे स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत आहे. विशेष म्हणजे बंगाळवाडी तसेच डोणजा येथील पिण्याच्या पाण्याचा मार्ग निकाली निघाला आहे.     News Story Feeds https://ift.tt/2VvXd5M - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 23, 2020

सचिनची भुरळ जगाला, त्याला मात्र मराठवाड्यातील या गावाची उस्मानाबाद :  सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देवच. विक्रमावर विक्रम रचत गेलेल्या या विक्रमवीराने अख्ख्या जगाला भुरळ घातली. आजही मैदानात घुमणारा 'सचिन सचिन' हा आवाज अनेक किक्रेट वेडे विसरले नाहीत. पण, याच सचिनला भुरळ घातली ती उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजा (ता. परंडा) या गावाने. एकेकाळी मागासलेले म्हणून गणले जाणारे हे गाव आज केवळ सचिनमुळे प्रगतिपथावर आले. त्यामुळे किक्रेटचा देव या गावासाठीही देवच ठरला आहे. (ता. २४ एप्रिल) सचिनचा वाढदिवस. त्यानिमित्ताने या बाबत खास माहिती ती eSakal.com च्या वाचकांसाठी... सचिनने खासदार असताना १८ जुलै २०१६ ला डोणजा हे गाव विकासासाठी दत्तक घेतले. त्याने येथे विविध योजना राबवित गावाचा चेहरा बदलवला. गावातील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासह मुलांची शाळा अन्‌ रस्ते चकाचक केले. विशेष म्हणजे गाव दत्तक घेतल्यानंतर तो गावात येऊन मुलांसोबत क्रिकेटही खेळला.    नेमके कुठे आहे हे गाव?  परंडा तालुक्यातील डोणजा हे सीना नदीच्या काठावरील वसलेले टुमदार गाव. या ग्रामपंचायत अंतर्गत बंगाळवाडीचाही समावेश आहे. बंगाळवाडीची लोकसंख्या एक हजार २८९, तर डोणजाची लोकसंख्या तीन हजार ६४८. गेल्या चार वर्षांत यामाध्यमातून गावात विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यासाठी खासदार म्हणून सचिनने चांगलीच मेहनत घेतली.   असा केला कायपालट   अनेक खासादारांनी त्या-त्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेतले. मात्र, त्यातून संबंधित खासदारांना फारसे यश आले नाही. मात्र, सचिनने क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे खासदारकीच्या काळातील योजनेतही चांगलीच फटकेबाजी केली. त्यामुळे गावातील मूलभूत सुविधांमध्ये वाढ झाली आहे. ऐरवी गावातील रस्ते कुठे चिखलमय तर कुठे खड्ड्यांचे असायचे. मात्र, सध्या डोणजा तसेच बंगाळवाडीतील संपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गावातील रस्ते चकाचक झाल्याचे दिसत आहेत.    हेही वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम?  आदर्श ग्राम करताना स्थानिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा दृष्टीकोन सचिनने ठेवला. गावात यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना मोडक्या झालेल्या खोलीतूनच शिक्षण घ्यावे लागत होते. कधी पावसाचा तर कधी वीजेचाही फटका शाळेला बसायचा. मात्र, सचिनने शाळेसाठी मोठी इमारत बांधून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या इमारतीतून ज्ञानार्जन करण्याची संधी मिळाली. याशिवाय गावात विविध योजना राबवून कामे करण्यात आली. विशेष म्हणजे नवीन शाळेची इमारत सौर दिव्यांनी लखलखत आहे. गावात तब्बल ८६ घरकुले पूर्ण झाली असून, अनेक गरिबांना कायमचा निवारा मिळाला आहे. शिवाय गावातील सर्वच कुटुंब १०० टक्के स्वच्छतागृहाचा वापर करीत आहेत. त्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.  प्रमुख सहा कामांना प्राधान्य दिले. शिवाय ही कामेही पूर्ण केली आहे. गावात पाणीपुरवठा योजना, शाळेची इमारत आणि रस्ते यासाठी चार कोटी चार लाख ५६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. विशेष म्हणजे स्वतः त्याने गावात येऊन विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळला होता. याची आठवण अजूनही येथील गावकऱ्यांना होत आहे. गावातील मुलांसोबत क्रिकेट खेळताना सचिन.   डोणजावासियांचाही देव  क्रिकेटच्या मैदानावर सचिन नेहमीच धावांचा पाऊस पाडायचा. चाहत्यांसाठी तो क्रिकेटचा देवच असायचा. तसा डोणजावासियांसाठीही तो खरोखरचा देवच ठरला आहे. ऐरवी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र, गावात त्याने नळयोजनेचे काम पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे गावाला पिण्याच्या पाण्याची चिंता संपली आहे. नागरिकांना आर-ओ फिल्टरचे स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत आहे. विशेष म्हणजे बंगाळवाडी तसेच डोणजा येथील पिण्याच्या पाण्याचा मार्ग निकाली निघाला आहे.     News Story Feeds https://ift.tt/2VvXd5M


via News Story Feeds https://ift.tt/3eNiX4E

No comments:

Post a Comment