संचारबंदीमुळे ग्राहकांकडून मागणी कमी; 30 टक्के भाव वाढ  मार्केट यार्ड - शहरात आणि उपनगरात भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात (व्हॉटस्पॉट) पुरवठा विस्कळित होत आहे. ग्राहकांकडून सध्या भाजीपाला आणि फळांना मागणी कमी असली, तरी किरकोळ बाजारात त्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. भाजीपाल्याच्या भावात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार सुरू आहेत. शहराच्या विविध भागांतील भाजीपाला विक्रेते शेतीमालाची खरेदी करून त्याची सोसायट्यांच्या आवारात विक्री करीत आहे. भाजीपाला 40 ते 140 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. जिल्ह्यातील वेल्हे, सासवड, मुळशी, चाकण, खेड आणि मंचर परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात फळांचा तुटवडा  बाजारात सध्या संत्री, मोसंबी, डाळिंब आणि सफरचंद आदी फळांचा तुटवडा असून भावात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. फळांच्या मागणीत घट झाली असून व्यापारी कमी प्रमाणात माल मागवीत आहेत. मात्र तो वेळेत वेळेत पोहचत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  भाजीपाल्याला उठाव नाही  हॉटेल व्यावसायिक आणि खानावळी चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला जातो. मात्र सध्या हे व्यवसाय बंद असल्याने घरगुती ग्राहकांकडून भाजीपाल्याची खरेदी होत आहे. कोरोनाचे "व्हॉटस्पॉट' असलेल्या भागात प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. त्या ठिकाणी भाजीपाल्याचा पुरवठा कोलमडला आहे. भाजीपाल्याला उठाव नसल्याने नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.  उपबाजारात 128 गाड्यांची आवक  मांजरी व उत्तमनगर उपबाजारात गुरुवारी भाजीपाल्याच्या एकूण 128 गाड्यांची आवक झाली. तसेच भुसार बाजारात एकूण 141 गाड्यांमधून 20 हजार 980 क्विंटल धान्याची आवक झाल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.  शहरातील अनेक भागात जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे. त्यामुळे दुकानाबाहेर गर्दी होत आहे. याचा विचार करून प्रशासनाने सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास खरेदी व विक्रीस परवानगी द्यावी.  - प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते.  अक्षय्य तृतीयामुळे आंब्यांना मागणी वाढली असली, तरी आवक कमी होत आहे. त्यामुळे आंब्याच्या भावात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. आंबा सध्या ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच दिला जात आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे.  - अरविंद मोरे, व्यापारी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 23, 2020

संचारबंदीमुळे ग्राहकांकडून मागणी कमी; 30 टक्के भाव वाढ  मार्केट यार्ड - शहरात आणि उपनगरात भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात (व्हॉटस्पॉट) पुरवठा विस्कळित होत आहे. ग्राहकांकडून सध्या भाजीपाला आणि फळांना मागणी कमी असली, तरी किरकोळ बाजारात त्यांची चढ्या भावाने विक्री होत आहे. भाजीपाल्याच्या भावात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार सुरू आहेत. शहराच्या विविध भागांतील भाजीपाला विक्रेते शेतीमालाची खरेदी करून त्याची सोसायट्यांच्या आवारात विक्री करीत आहे. भाजीपाला 40 ते 140 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. जिल्ह्यातील वेल्हे, सासवड, मुळशी, चाकण, खेड आणि मंचर परिसरातून भाजीपाल्याची आवक होत आहे.  पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाजारात फळांचा तुटवडा  बाजारात सध्या संत्री, मोसंबी, डाळिंब आणि सफरचंद आदी फळांचा तुटवडा असून भावात 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. फळांच्या मागणीत घट झाली असून व्यापारी कमी प्रमाणात माल मागवीत आहेत. मात्र तो वेळेत वेळेत पोहचत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  भाजीपाल्याला उठाव नाही  हॉटेल व्यावसायिक आणि खानावळी चालकांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला जातो. मात्र सध्या हे व्यवसाय बंद असल्याने घरगुती ग्राहकांकडून भाजीपाल्याची खरेदी होत आहे. कोरोनाचे "व्हॉटस्पॉट' असलेल्या भागात प्रशासनाने कठोर निर्बंध घातले आहेत. त्या ठिकाणी भाजीपाल्याचा पुरवठा कोलमडला आहे. भाजीपाल्याला उठाव नसल्याने नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.  उपबाजारात 128 गाड्यांची आवक  मांजरी व उत्तमनगर उपबाजारात गुरुवारी भाजीपाल्याच्या एकूण 128 गाड्यांची आवक झाली. तसेच भुसार बाजारात एकूण 141 गाड्यांमधून 20 हजार 980 क्विंटल धान्याची आवक झाल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.  शहरातील अनेक भागात जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ दोन तासांचा अवधी दिला आहे. त्यामुळे दुकानाबाहेर गर्दी होत आहे. याचा विचार करून प्रशासनाने सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास खरेदी व विक्रीस परवानगी द्यावी.  - प्रकाश ढमढेरे, किरकोळ विक्रेते.  अक्षय्य तृतीयामुळे आंब्यांना मागणी वाढली असली, तरी आवक कमी होत आहे. त्यामुळे आंब्याच्या भावात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. आंबा सध्या ग्राहकांच्या मागणीनुसार घरपोच दिला जात आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे.  - अरविंद मोरे, व्यापारी  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2S1iF0n

No comments:

Post a Comment