ऑनलाईन बोलवलेले चिकन खाल्ल्याने युवा अभियंत्याचा मृत्यू ? वाचा सविस्तर  नागपूर : बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय नागरिकांची जीवनशैली आधुनिक झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तू आता घरोघरी ऑनलाईन पोहोचू लागल्या आहेत. वेळ आणि श्रम वाचविण्याच्या उद्देशाने या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागपुरात एक वेगळीच घटना पुढे आली आहे. ऑनलाईन बोलावलेले चिकन खाल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना लक्ष्मीनगरमधील आठरस्ता चौकात घडली. विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. या अभियंत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत पोलिस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज ताकसांडे हा सॉफ्टवेअर अभियंता होता. तो पत्नी पूजासोबत आठरस्ता चौकातील अभिनव अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये राहायचा. शनिवारी रात्री त्याने ऑनलाइन शेजवान चिकन बोलाविले. ते चिकन खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो शौचालयात गेला. तेथून बाहेर येताच तो खाली कोसळला व बेशुद्ध झाला. पूजा यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विराज याला ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. - प्रेयसीशी केले घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; फक्‍त तीन महिन्यांसाठी घर घ्यायचा किरायाने, एकेदिवशी...   येथील डॉक्‍टरांनी त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी विराज याला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर विराजला मृत घोषित केले. वृत्त लिहिपर्यंत विराज याचे शवविच्छेदन झाले नव्हते. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 26, 2020

ऑनलाईन बोलवलेले चिकन खाल्ल्याने युवा अभियंत्याचा मृत्यू ? वाचा सविस्तर  नागपूर : बदलत्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतीय नागरिकांची जीवनशैली आधुनिक झाली आहे. दररोजच्या वापरातील वस्तू आता घरोघरी ऑनलाईन पोहोचू लागल्या आहेत. वेळ आणि श्रम वाचविण्याच्या उद्देशाने या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागपुरात एक वेगळीच घटना पुढे आली आहे. ऑनलाईन बोलावलेले चिकन खाल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना लक्ष्मीनगरमधील आठरस्ता चौकात घडली. विराज नरेंद्र ताकसांडे असे मृताचे नाव आहे. या अभियंत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत पोलिस वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज ताकसांडे हा सॉफ्टवेअर अभियंता होता. तो पत्नी पूजासोबत आठरस्ता चौकातील अभिनव अपार्टमेंटमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये राहायचा. शनिवारी रात्री त्याने ऑनलाइन शेजवान चिकन बोलाविले. ते चिकन खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो शौचालयात गेला. तेथून बाहेर येताच तो खाली कोसळला व बेशुद्ध झाला. पूजा यांनी तातडीने पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बजाजनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाठक व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विराज याला ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. - प्रेयसीशी केले घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; फक्‍त तीन महिन्यांसाठी घर घ्यायचा किरायाने, एकेदिवशी...   येथील डॉक्‍टरांनी त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी विराज याला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर विराजला मृत घोषित केले. वृत्त लिहिपर्यंत विराज याचे शवविच्छेदन झाले नव्हते. हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35csqya

No comments:

Post a Comment