त्यांनी लढवली अनोखी शक्‍कल, पण झाली अटक  नागपूर : फार्मसीच्या मालकाने मित्राच्या मदतीने पोलिसांकडून सवलत असलेल्या वाहनात सलाइनच्या डब्यात दारूच्या बाटल्या ठेवल्या तर दारूची तस्करी करणाऱ्या एका टोळीला तहसील पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख 2 लाख 78 हजार 100 रुपये आणि 23 हजार 868 रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास केली.  लॉकडाउनमुळे दारूच्या व्यवसायात आता चौपट नफा असल्याचे लक्षात येताच फार्मसी मालक राहुल सदावर्ते याने दारू तस्करीचा व्यवसाय सुरू केला. मागील महिन्यांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. दारूच्या पेट्या आणण्यासाठी ते चारचाकी वाहनाचा वापर करीत असत. चारचाकी वाहनाच्या काचेवर "जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक' असे स्टिकर लावत होते. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर संयश घेत नव्हते. शहरात दारूची दुकाने बंद असतानादेखील तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी माहिती काढली असता चौघांचीही माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांना पकडण्यासाठी मेयो हॉस्पिटल चौक आणि गोळीबार चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. रविवारी रात्री चारही आरोपी हे (एमएच 35 पी 3050) क्रमांकाच्या कारने गोळीबार चौकात आले. पोलिसांनी त्यांना अडवून पाहणी केली असता कारमध्ये सलाइनच्या पेट्या आणि त्याखाली दारूच्या पेट्या मिळून आल्या. पोलिसांनी 180 मिलीच्या 47 ऑफसर्स चॉईस, 90 मिलिच्या रॉयल स्टॅगच्या 146 बाटल्या, 90 मिलीच्या सिमरनऑफ वोडकाच्या 66 बाटल्या, पाच पेट्या सलाइनच्या मिळून आल्या.  पोलिसांनी सलाइनच्या आणि दारूच्या पेट्या, कारसह 12 लाख 11 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारूच्या पेट्या त्यांनी भिवापूर येथून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेतली. ही कारवाई पीआय जयेश भांडारकर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार लक्ष्मण शेंडे, शैलेश दाबोले, किशोर गरवारे, प्रवीण मानापुरे, पंकज डबरे, नजीर शेख यांनी केली.  अधिक वाचा : शेतातील भाजीपाला आता सरळ दारासमोर  हे आहेत आरोपी  राहुल हरिश्‍चंद्र सदावर्ते (34) गोळीबार चौक, कल्पेश भीमराज नंदनवार (34) उदाराम मठमागे गोळीबार चौक, गणेश चंद्रकांत सदावर्ते (30) आणि रोशन लक्ष्मीचंद बारापात्रे (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुलचे मेहंदीबाग चौकात स्पर्श नावाची फार्मसी आहे तर कल्पेशचे भिसीकर मोहल्ला इतवारी येथे ओम टेडर्स नावाचे दुकान आहे. गणेश हा जिओ कंपनीत टेलिकॉम अभियंता असून रोशन हा फुलांच्या डेकोरेशनचा व्यवसाय करतो.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, April 27, 2020

 त्यांनी लढवली अनोखी शक्‍कल, पण झाली अटक  नागपूर : फार्मसीच्या मालकाने मित्राच्या मदतीने पोलिसांकडून सवलत असलेल्या वाहनात सलाइनच्या डब्यात दारूच्या बाटल्या ठेवल्या तर दारूची तस्करी करणाऱ्या एका टोळीला तहसील पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख 2 लाख 78 हजार 100 रुपये आणि 23 हजार 868 रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास केली.  लॉकडाउनमुळे दारूच्या व्यवसायात आता चौपट नफा असल्याचे लक्षात येताच फार्मसी मालक राहुल सदावर्ते याने दारू तस्करीचा व्यवसाय सुरू केला. मागील महिन्यांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. दारूच्या पेट्या आणण्यासाठी ते चारचाकी वाहनाचा वापर करीत असत. चारचाकी वाहनाच्या काचेवर "जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक' असे स्टिकर लावत होते. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर संयश घेत नव्हते. शहरात दारूची दुकाने बंद असतानादेखील तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी माहिती काढली असता चौघांचीही माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांना पकडण्यासाठी मेयो हॉस्पिटल चौक आणि गोळीबार चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. रविवारी रात्री चारही आरोपी हे (एमएच 35 पी 3050) क्रमांकाच्या कारने गोळीबार चौकात आले. पोलिसांनी त्यांना अडवून पाहणी केली असता कारमध्ये सलाइनच्या पेट्या आणि त्याखाली दारूच्या पेट्या मिळून आल्या. पोलिसांनी 180 मिलीच्या 47 ऑफसर्स चॉईस, 90 मिलिच्या रॉयल स्टॅगच्या 146 बाटल्या, 90 मिलीच्या सिमरनऑफ वोडकाच्या 66 बाटल्या, पाच पेट्या सलाइनच्या मिळून आल्या.  पोलिसांनी सलाइनच्या आणि दारूच्या पेट्या, कारसह 12 लाख 11 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारूच्या पेट्या त्यांनी भिवापूर येथून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेतली. ही कारवाई पीआय जयेश भांडारकर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार लक्ष्मण शेंडे, शैलेश दाबोले, किशोर गरवारे, प्रवीण मानापुरे, पंकज डबरे, नजीर शेख यांनी केली.  अधिक वाचा : शेतातील भाजीपाला आता सरळ दारासमोर  हे आहेत आरोपी  राहुल हरिश्‍चंद्र सदावर्ते (34) गोळीबार चौक, कल्पेश भीमराज नंदनवार (34) उदाराम मठमागे गोळीबार चौक, गणेश चंद्रकांत सदावर्ते (30) आणि रोशन लक्ष्मीचंद बारापात्रे (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुलचे मेहंदीबाग चौकात स्पर्श नावाची फार्मसी आहे तर कल्पेशचे भिसीकर मोहल्ला इतवारी येथे ओम टेडर्स नावाचे दुकान आहे. गणेश हा जिओ कंपनीत टेलिकॉम अभियंता असून रोशन हा फुलांच्या डेकोरेशनचा व्यवसाय करतो.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VZBzps

No comments:

Post a Comment