स्वयंसेवकांकडून नियम धाब्यावर, मग पोलिसांचा इंगा मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात तब्बल 122 स्वयंसेवक आणि 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत सामावून घेण्याचा पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्डे जप्त करण्याची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.  जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दुचाकी बंदी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आणि इतर लोकांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. या अधिकारातून येथील पालिका प्रशासनाने 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करून परवानगी दिली आहे. यात तब्बल 122 जणांना स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने कोणत्या निकषाने ही यादी निश्‍चित केली याची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केली आहे.  शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्ड जप्तीची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.  तालुक्‍यातील प्रत्येक गावात स्वयंसेवक नियुक्त करून त्यांनी गावातील इतर लोकांच्या मदतीसाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. संबंधित स्वयंसेवकांना कार्ड वितरणाची जबाबदारी त्या त्या स्थानिक प्रशासन प्रमुखांकडे सोपविली होती. तहसीलदारांकडून ग्रामीण भागात फक्त सात ते आठ जणांना स्वयंसेवक म्हणून कार्डे दिली आहेत; मात्र पालिका क्षेत्रात तब्बल 212 दुचाकींना अशा प्रकारे कार्ड वितरीत केल्याने पोलिस प्रशासनाकडून नाराजी व्यक्त होत आहे.  शहरातील दुचाकी वाहतूक कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असताना अशा प्रकारे एकाच वेळी जर 212 गाड्या पालिकेच्या परवानगीने शहरात फिरू लागल्या तर लॉकडाउनला अर्थ काय राहणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून पोलिसांनी मागितलेल्या माहितीनंतर स्वयंसेवक कार्ड देण्याचे थांबविण्यात आले असल्याची माहिती मिळाली. तसेच दिलेल्या 212 कार्डमध्ये तब्बल 122 स्वयंसेवक संपूर्ण शहरात नियुक्त केले आहेत. यामुळे त्यांची माहिती पोलिस यंत्रणेने घेतली आहे. या सर्व स्वयंसेवकांची यादी त्या त्या प्रभागात प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडता या स्वयंसेवकांना घरातील जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या सर्व जीवनावश्‍यक वस्तू घरपोच आणून द्याव्यात अगर व्यवस्था करून द्यावी, असेही पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.  परवानगीचा गैरवापर  पालिका प्रशासनाकडून काही चारचाकींना परवानगी दिली आहे. ही परवानगी चारचाकींना असताना दुचाकी घेऊन अनेक व्यक्ती शहरात बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यांची कार्डे ताब्यात घेतली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांचीही जबाबदारी त्या त्या प्रभागात राहून जनतेची कामे करण्याची आहेत. ही कामे न करता वैयक्तिक कामासाठी स्वयंसेवक फिरताना दिसून आल्यास त्यांचीही कार्ड जमा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, April 6, 2020

स्वयंसेवकांकडून नियम धाब्यावर, मग पोलिसांचा इंगा मालवण (सिंधुदुर्ग) - शहरात तब्बल 122 स्वयंसेवक आणि 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत सामावून घेण्याचा पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे. शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्डे जप्त करण्याची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.  जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात दुचाकी बंदी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाला अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींना आणि इतर लोकांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. या अधिकारातून येथील पालिका प्रशासनाने 212 दुचाकींना अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करून परवानगी दिली आहे. यात तब्बल 122 जणांना स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने कोणत्या निकषाने ही यादी निश्‍चित केली याची माहिती द्यावी, अशी सूचना पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केली आहे.  शहरातील काही स्वयंसेवक कामाशिवाय फिरत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी ही कार्ड जप्तीची कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.  तालुक्‍यातील प्रत्येक गावात स्वयंसेवक नियुक्त करून त्यांनी गावातील इतर लोकांच्या मदतीसाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. संबंधित स्वयंसेवकांना कार्ड वितरणाची जबाबदारी त्या त्या स्थानिक प्रशासन प्रमुखांकडे सोपविली होती. तहसीलदारांकडून ग्रामीण भागात फक्त सात ते आठ जणांना स्वयंसेवक म्हणून कार्डे दिली आहेत; मात्र पालिका क्षेत्रात तब्बल 212 दुचाकींना अशा प्रकारे कार्ड वितरीत केल्याने पोलिस प्रशासनाकडून नाराजी व्यक्त होत आहे.  शहरातील दुचाकी वाहतूक कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असताना अशा प्रकारे एकाच वेळी जर 212 गाड्या पालिकेच्या परवानगीने शहरात फिरू लागल्या तर लॉकडाउनला अर्थ काय राहणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाकडून पोलिसांनी मागितलेल्या माहितीनंतर स्वयंसेवक कार्ड देण्याचे थांबविण्यात आले असल्याची माहिती मिळाली. तसेच दिलेल्या 212 कार्डमध्ये तब्बल 122 स्वयंसेवक संपूर्ण शहरात नियुक्त केले आहेत. यामुळे त्यांची माहिती पोलिस यंत्रणेने घेतली आहे. या सर्व स्वयंसेवकांची यादी त्या त्या प्रभागात प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांना घराबाहेर न पडता या स्वयंसेवकांना घरातील जीवनावश्‍यक वस्तू घरपोच देण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या सर्व जीवनावश्‍यक वस्तू घरपोच आणून द्याव्यात अगर व्यवस्था करून द्यावी, असेही पोलिस निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.  परवानगीचा गैरवापर  पालिका प्रशासनाकडून काही चारचाकींना परवानगी दिली आहे. ही परवानगी चारचाकींना असताना दुचाकी घेऊन अनेक व्यक्ती शहरात बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहेत. त्यांची कार्डे ताब्यात घेतली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. स्वयंसेवकांचीही जबाबदारी त्या त्या प्रभागात राहून जनतेची कामे करण्याची आहेत. ही कामे न करता वैयक्तिक कामासाठी स्वयंसेवक फिरताना दिसून आल्यास त्यांचीही कार्ड जमा करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34gUNup

No comments:

Post a Comment