मुळा पाण्यासाठी वरचे आले टेलच्या मुळावर, भराव टाकून चारीच अडवली अमरापूर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनाचे पाणी "टेल'च्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू नये, यासाठी भातकुडगाव व तेलकुडगाव येथील काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, जेसीबीच्या साह्याने भराव टाकून चारी बंद केली आहे. त्यामुळे आवर्तन अंतिम टप्प्यात असताना भातकुडगाव शाखा कालव्यांतर्गत 11 गावांतील एक हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाळी पिकासाठी मुळा धरणाचे आवर्तन 20 मार्चपासून सुरू आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला, तरी सामनगाव, लोळेगाव, जोहरापूर, मळेगाव, खामगाव, हिंगणगाव, गुंफा, आखतवाडे, भातकुडगाव या भागातील पाणीवापर संस्थांना व शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही. सतरा पाणीवापर संस्थांनी आठ लाख रुपये पाणीपट्टी भरून पाणीमागणी केलेल्या एक हजार 800 हेक्‍टरपैकी "टेल'चे एक हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. हेही वाचा - भाजपचा आमदार जयकुमार गोरेंना वाटतेय भिती भातकुडगावच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांनी पुढे "टेल'ला जाणारी चारी जेसीबीच्या साह्याने भराव टाकून बंद केली आहे. त्यातून तेथील व वरील भागातील पिकांचे एकाच आवर्तनातून तीन वेळा भरणे झाले आहे. मात्र, "टेल'च्या आठ संस्थांना पैसे भरूनही पाणी मिळालेले नाही. त्यामुळे भुईमूग, कांदा, ऊस, चारापिके जळून खाक झाली आहेत. "टेल टू हेड' हा भरण्याचा नियम डावलून पाटबंधारे विभागाचे अधिकारी केवळ "वरचे शेतकरी ऐकत नाहीत, कर्मचारी व बंदोबस्त पुरेसा नाही' असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी "हेड' विरुद्ध "टेल' असा संघर्ष शेतकऱ्यांमध्ये पेटवून देण्याचाही प्रयत्न होत आहे. गस्तीवर कर्मचारी नसल्याने देडगाव ते भातकुडगाव या 15-20 किलोमीटरच्या वितरिकेत अनधिकृत वीजपंप, पाइप टाकून, चारी फोडून दंडेलशाही करत सर्रासपणे पाणी उचलले जात असल्याने खालचे शेतकरी मात्र हताशपणे पाण्याची वाट पाहत आहेत.  पाण्यापासून वंचित संस्था व क्षेत्र  स्वामी समर्थ (सामनगाव-लोळेगाव)- 350हेक्‍टर  हनुमान (आखतवाडे)- 200 हेक्‍टर  ज्ञानेश्वर (भातकुडगाव)- 140 हेक्‍टर  जिजामाता (जोहरापूर)- 130 हेक्‍टर  त्रिमूर्ती (भातकुडगाव)- 100 हेक्‍टर  हरिप्रसाद (खामगाव-हिंगणगाव)- 15 हेक्‍टर  हरितक्रांती (जोहरापूर)- 65 हेक्‍टर  किसानक्रांती (जोहरापूर)- 7 हेक्‍टर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 21, 2020

मुळा पाण्यासाठी वरचे आले टेलच्या मुळावर, भराव टाकून चारीच अडवली अमरापूर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनाचे पाणी "टेल'च्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू नये, यासाठी भातकुडगाव व तेलकुडगाव येथील काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, जेसीबीच्या साह्याने भराव टाकून चारी बंद केली आहे. त्यामुळे आवर्तन अंतिम टप्प्यात असताना भातकुडगाव शाखा कालव्यांतर्गत 11 गावांतील एक हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. उन्हाळी पिकासाठी मुळा धरणाचे आवर्तन 20 मार्चपासून सुरू आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला, तरी सामनगाव, लोळेगाव, जोहरापूर, मळेगाव, खामगाव, हिंगणगाव, गुंफा, आखतवाडे, भातकुडगाव या भागातील पाणीवापर संस्थांना व शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही. सतरा पाणीवापर संस्थांनी आठ लाख रुपये पाणीपट्टी भरून पाणीमागणी केलेल्या एक हजार 800 हेक्‍टरपैकी "टेल'चे एक हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे. हेही वाचा - भाजपचा आमदार जयकुमार गोरेंना वाटतेय भिती भातकुडगावच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांनी पुढे "टेल'ला जाणारी चारी जेसीबीच्या साह्याने भराव टाकून बंद केली आहे. त्यातून तेथील व वरील भागातील पिकांचे एकाच आवर्तनातून तीन वेळा भरणे झाले आहे. मात्र, "टेल'च्या आठ संस्थांना पैसे भरूनही पाणी मिळालेले नाही. त्यामुळे भुईमूग, कांदा, ऊस, चारापिके जळून खाक झाली आहेत. "टेल टू हेड' हा भरण्याचा नियम डावलून पाटबंधारे विभागाचे अधिकारी केवळ "वरचे शेतकरी ऐकत नाहीत, कर्मचारी व बंदोबस्त पुरेसा नाही' असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी "हेड' विरुद्ध "टेल' असा संघर्ष शेतकऱ्यांमध्ये पेटवून देण्याचाही प्रयत्न होत आहे. गस्तीवर कर्मचारी नसल्याने देडगाव ते भातकुडगाव या 15-20 किलोमीटरच्या वितरिकेत अनधिकृत वीजपंप, पाइप टाकून, चारी फोडून दंडेलशाही करत सर्रासपणे पाणी उचलले जात असल्याने खालचे शेतकरी मात्र हताशपणे पाण्याची वाट पाहत आहेत.  पाण्यापासून वंचित संस्था व क्षेत्र  स्वामी समर्थ (सामनगाव-लोळेगाव)- 350हेक्‍टर  हनुमान (आखतवाडे)- 200 हेक्‍टर  ज्ञानेश्वर (भातकुडगाव)- 140 हेक्‍टर  जिजामाता (जोहरापूर)- 130 हेक्‍टर  त्रिमूर्ती (भातकुडगाव)- 100 हेक्‍टर  हरिप्रसाद (खामगाव-हिंगणगाव)- 15 हेक्‍टर  हरितक्रांती (जोहरापूर)- 65 हेक्‍टर  किसानक्रांती (जोहरापूर)- 7 हेक्‍टर  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34S1TWG

No comments:

Post a Comment