दंड- बैठका, शड्डूंचे आवाज थांबले नवेखेड (सांगली) - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउनची स्थिती असल्याने गावोगावची कुस्ती मैदाने थांबली आहेत. कुस्ती क्षेत्रात 10 कोटींहून अधिक रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. पैलवानांची आर्थिक कोंडी झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत.  महापुरानंतर काही दिवसातच आलेल्या कोरोनामुळे जिल्हा लॉकडाउन परस्थिती अनुभवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साठ अधिक कुस्ती मैदाने रद्द झाली आहेत. सध्या तालमींनाही कुलपे लागली आहेत. दंड-बैठका शड्डूंचे गावोगाव घुमणारे आवाज थांबले आहेत. मागील ऑगस्ट महिन्यात कृष्णा व वारणा काठावर मोठा महापूर आला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस, देवराष्ट्रे, बाबवडे, बोरगाव हे कुस्तीची मुख्य मैदाने रद्द झाली. त्यामुळे मल्ल व कुस्ती शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरले. पुढे फेब्रुवारी महिन्यापासून गावोगाव जत्रांचा हंगाम सुरू व्हायचा. तो मे अखेर चालतो. जिल्ह्यात चिंचोली, पाडळी, विटा, बेनापूर त्याचबरोबर साखर कारखान्यांतर्फे कुस्ती मैदान होतात. वर्षभर सराव केलेले मल्ल या गावोगावच्या कुस्ती मैदानात मोठ्या आशेने उतरतात. अलीकडे बऱ्यापैकी बिदागी मिळत असल्याने मल्लही समाधानी असतो. मिळालेल्या या बिदागीतून पुढील वर्षाच्या आपल्या कुस्तीच्या खुरकाचा खर्च भागवला जातो. मैदाने संपली की ते आपापल्या गावाकडे परततात. गावाकडे एक महिना राहून पुन्हा जून पासून आपल्या तालमीत दाखल होतात. आपल्यातील कमतरता शोधत पुन्हा नवउमेदीने कसून सराव करतात; परंतु हे वर्ष त्यांना अडचणीचे ठरले आहे. मैदाने रद्द झाल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पदरमोड करून खर्च भागववा लागेल. अनेक मल्लांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडे मोठी अडचण आहे. त्यांची आर्थिक ओढाताण होणार आहे. या वर्षी जिल्ह्यात साठहुन अधिक मैदाने रद्द झाली. सुमारे 10 कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली. कुस्तीचे धावते समालोचन करणारे निवेदक आर्थिक अडचणीत आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक एक जोडीतील मल्ल असे ः माऊली जमदाडे, विजय गुटाळ, सिकंदर शेख, मारुती जाधव, योगेश बोंबाळे, बाला रफिक शेख, नंदू आबदार, संतोष दोरवड, हसन पटेल, सुरज निकम, भारत मदने, विष्णू खोसे, किरण भगत, गोकुळ आवारे, हर्षद सदगीर, आदर्श गुंड, शिवराज राक्षे, संतोष सुतार, समीर देसाई, गणेश जगताप, योगेश पवार, समाधान पाटील, विजय धुमाळ.  गावोगावी होणारी मैदाने रद्द झाल्याने पैलवानांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचबरोबर व्यायाम ही थांबला आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या स्पर्धांवर होईल.  - माऊली जमदाडे, पैलवान  मैदाने रद्द झाल्याने पैलवानांची आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. व्यक्ती व सहकारी संस्थांनी पुढे येऊन खुराकासाठी वस्तूरुपात मदत करावी.  - ज्योतीराम वाजे, कुस्ती निवेदक  मैदाने रद्द झाल्याने पैलवान व कुस्ती अडचणीत आहे. गरीब कुटुंबातील मल्लांना खुराकासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे.  - पैलवान विकास पाटील, कुस्ती मार्गदर्शक बोरगाव (ऑल इंडिया चॅम्पियन)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 26, 2020

दंड- बैठका, शड्डूंचे आवाज थांबले नवेखेड (सांगली) - कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउनची स्थिती असल्याने गावोगावची कुस्ती मैदाने थांबली आहेत. कुस्ती क्षेत्रात 10 कोटींहून अधिक रुपयांची होणारी उलाढाल थांबली आहे. पैलवानांची आर्थिक कोंडी झाल्याने ते अडचणीत सापडले आहेत.  महापुरानंतर काही दिवसातच आलेल्या कोरोनामुळे जिल्हा लॉकडाउन परस्थिती अनुभवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साठ अधिक कुस्ती मैदाने रद्द झाली आहेत. सध्या तालमींनाही कुलपे लागली आहेत. दंड-बैठका शड्डूंचे गावोगाव घुमणारे आवाज थांबले आहेत. मागील ऑगस्ट महिन्यात कृष्णा व वारणा काठावर मोठा महापूर आला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कुंडल, पलूस, देवराष्ट्रे, बाबवडे, बोरगाव हे कुस्तीची मुख्य मैदाने रद्द झाली. त्यामुळे मल्ल व कुस्ती शौकिनांच्या उत्साहावर पाणी फिरले. पुढे फेब्रुवारी महिन्यापासून गावोगाव जत्रांचा हंगाम सुरू व्हायचा. तो मे अखेर चालतो. जिल्ह्यात चिंचोली, पाडळी, विटा, बेनापूर त्याचबरोबर साखर कारखान्यांतर्फे कुस्ती मैदान होतात. वर्षभर सराव केलेले मल्ल या गावोगावच्या कुस्ती मैदानात मोठ्या आशेने उतरतात. अलीकडे बऱ्यापैकी बिदागी मिळत असल्याने मल्लही समाधानी असतो. मिळालेल्या या बिदागीतून पुढील वर्षाच्या आपल्या कुस्तीच्या खुरकाचा खर्च भागवला जातो. मैदाने संपली की ते आपापल्या गावाकडे परततात. गावाकडे एक महिना राहून पुन्हा जून पासून आपल्या तालमीत दाखल होतात. आपल्यातील कमतरता शोधत पुन्हा नवउमेदीने कसून सराव करतात; परंतु हे वर्ष त्यांना अडचणीचे ठरले आहे. मैदाने रद्द झाल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पदरमोड करून खर्च भागववा लागेल. अनेक मल्लांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्याकडे मोठी अडचण आहे. त्यांची आर्थिक ओढाताण होणार आहे. या वर्षी जिल्ह्यात साठहुन अधिक मैदाने रद्द झाली. सुमारे 10 कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली. कुस्तीचे धावते समालोचन करणारे निवेदक आर्थिक अडचणीत आहेत. महाराष्ट्राचा क्रमांक एक जोडीतील मल्ल असे ः माऊली जमदाडे, विजय गुटाळ, सिकंदर शेख, मारुती जाधव, योगेश बोंबाळे, बाला रफिक शेख, नंदू आबदार, संतोष दोरवड, हसन पटेल, सुरज निकम, भारत मदने, विष्णू खोसे, किरण भगत, गोकुळ आवारे, हर्षद सदगीर, आदर्श गुंड, शिवराज राक्षे, संतोष सुतार, समीर देसाई, गणेश जगताप, योगेश पवार, समाधान पाटील, विजय धुमाळ.  गावोगावी होणारी मैदाने रद्द झाल्याने पैलवानांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचबरोबर व्यायाम ही थांबला आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या स्पर्धांवर होईल.  - माऊली जमदाडे, पैलवान  मैदाने रद्द झाल्याने पैलवानांची आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. व्यक्ती व सहकारी संस्थांनी पुढे येऊन खुराकासाठी वस्तूरुपात मदत करावी.  - ज्योतीराम वाजे, कुस्ती निवेदक  मैदाने रद्द झाल्याने पैलवान व कुस्ती अडचणीत आहे. गरीब कुटुंबातील मल्लांना खुराकासाठी आर्थिक मदत देण्याची गरज आहे.  - पैलवान विकास पाटील, कुस्ती मार्गदर्शक बोरगाव (ऑल इंडिया चॅम्पियन)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2x9YwxJ

No comments:

Post a Comment